मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : मदत करून तुम्हीच अडचणीत याल; आज जरा सांभाळूनच राहा

Numerology : मदत करून तुम्हीच अडचणीत याल; आज जरा सांभाळूनच राहा

Numerology 16 July 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

Numerology 16 July 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

Numerology 16 July 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचा विश्वास ज्याच्यावर असेल अशाच व्यक्तीला तुमचे भविष्याविषयीचे प्लॅन्स सांगा. नाही तर तुमच्याबद्दल गैरसमज होतील. तुमच्या पैशांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अकाउंट्समधले व्यवहार चेक करा. आजचा दिवस संवाद सुरू करण्यात पुढाकार घ्या. तसंच हीलिंग सेशन्स, सरकारी काँट्रॅक्ट्स, काही इव्हेंट्स प्रायोजकत्व घेणं आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणं यामध्ये आजचा दिवस जाणार आहे. तुमच्या मजबूत पार्श्वभूमीमुळे तुम्ही तुमचे मित्र किंवा नातेवाईक यांना कायदेशीर किंवा कार्यालयीन समस्या सोडवायला मदत केली पाहिजे. लक्ष वेधून घेण्यासाठी लेदरच्या वस्तू वापरणं टाळा.

शुभ रंग : Beige

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 7

दान : आश्रमात गहू दान करा

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तुम्हीच अडचणीत येऊ शकता. तेव्हा आज त्याची काळजी घ्या. आज तुम्ही खासगी समस्यांकडे थोडं दुर्लक्ष करा आणि प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या स्वप्नातल्या भावना प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस जरा कठीण आहे. त्यामुळे वाट पाहणं हेच महत्त्वाचं आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्या तुम्ही अगदी योग्य तऱ्हेने निभावाल आणि त्याचे परिणामही उत्तम दिसतील. एखाद्या छोट्या कंपनीसोबत भागीदारी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. भविष्यातल्या कोणत्याही योजना कोणालाही सांगू नका. राजकीय नेत्यांनी कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी काळजी घेणं आवश्यक आहे.

शुभ रंग : Sky Blue and Creme

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2 आणि 6

दान : मंदिरात किंवा गरिबांना साखर दान करा

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचे पूर्वज, गुरू-शिक्षक, मार्गदर्शक, ज्येष्ठ व्यक्ती आणि तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात प्रचंड यश मिळणार आहे. तुमचा स्टेजवरचा वावर अत्यंत आकर्षक असेल. थिएटर म्हणजे रंगभूमीवरच्या कलाकारांनी कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात करावी. तुमच्या या मार्गात तुमचा कुणाशीतरी नवीन नातेसंबंध जुळून येऊ शकतो. सार्वजनिक जीवनातल्या व्यक्ती आणि वकील यांना नशिबाची साथ मिळणार आहे. संगीतकार, डिझायनर्स, स्टुडंट्स, नवीन अँकर्स, राजकीय नेते, अभिनेते-कलाकार, आर्टिस्ट, गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि लेखक यांच्या करिअर वाढीच्या दृष्टीने एखादी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : आश्रमामध्ये पुस्तकं आणि स्टेशनरी साहित्य दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

पुढे जाण्यासाठी व्यावहारिक बना आणि भूतकाळ विसरा. कर्मचाऱ्यांना जुन्या आणि नवीन कामाच्या जबाबदारीमुळे कामाचा ओझं वाढेल.

हिरव्या पालेभाज्या किंवा हिरवे पदार्थ आणि संत्री खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर्स आणि दलाल यांनी आज कोणत्याही करारावर सही करणं टाळा. आज व्यावसायिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल अशी सुंदर घटना घडेल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : गरिबांना तेल दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या आक्रमकतेला आवर घाला, अन्यथा तुम्ही तुमच्या मित्राला दुखवाल. तुम्ही तुमच्या सर्व संधी आणि स्रोतांचा योग्य आणि पुरेपूर फायदा करून घेतला आहे. आता तुम्ही पूर्वी केलेल्या कामाबद्दल तुम्हाला बक्षिसं आणि नावलैकिक मिळणार आहे. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्याचा आर्थिक फायदाही तुम्हाला लवकरच मिळेल. खेळाडू आणि प्रवासी यांना आज भरपूर फायदा होणार आहे. मीटिंगमध्ये नशिबाची साथ मिळण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे घाला. ट्रेनिंग, प्रवास, फूड, क्रीडा आणि ग्लॅमर क्षेत्रातल्या व्यक्तींना करिअरमध्ये भरघोस यश मिळेल.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : गरिबांना पांढरं पीठ दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नातेसंबंध जुळविण्यात बराच संघर्ष करावा लागेल. रोमान्स आणि वचनं आज तुमच्या मनात सतत रुंजी घालतील; पण तुम्हाला कुणी धोका देत नाही ना, तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत नाही ना याकडे लक्ष देणं गरजेचं असल्यानं काळजी घ्या. व्यावसायिक आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल, पण वैयक्तिक समस्या जास्त गुंतागुंतीच्या असतील. त्यामुळे वादावादीपासून दूर राहा. लक्षात ठेवा, एकाच वेळेस तुम्ही सगळ्यांना खूश करू शकत नाही. त्यामुळे एकाच वेळेस तुमच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या घेऊ नका. हॉटेल व्यावसायिक, पर्यटक, ज्वेलर्स, कलाकार, जॉकीज आणि जॉक्टर्स यांना आज त्यांचं कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. क्रीडा क्षेत्रातल्या भविष्यासाठी कोचकडून मार्गदर्शन घ्या.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गायींना किंवा लहान मुलांना दूध दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

लहान मुलांना कागदपत्रांच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं. वकील, सॉफ्टवेअर इंजिनीअर, विद्यार्थी, खेळाडू आणि सीए यांना आजचा दिवस जरा कठीण जाणार आहे. तुमच्यातले नेतृत्वगुण आणि विश्लेषण करण्याचं कौशल्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आजचा दिवस ज्ञान आणि शहाणपणा यांचा वापर करण्याचा आहे. पैशांबाबतचे निर्णयही काळजीपूर्वक घ्या. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. त्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का लागेल. प्रेमसंबंधात विश्वास टिकून राहणं महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसात कागदपत्रांची व्यवस्थित छाननी म्हणजे ऑडिट होणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर विश्वास ठेवू नका. कापड व्यवसाय, थिएटर, तंत्रज्ञान, सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, शाळा, इंटीरिअर, धान्य आदी व्यवसायांत असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही WFH म्हणजे घरून काम करत नाही तोपर्यंत तुमचे व्यावसायिक संबध चांगले राहतील.

शुभ रंग : Orange and Blue

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : गायी किंवा गरिबांना शेंगदाणे दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

इतर कुणाच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू नका. छोटी उद्दिष्टं तुम्ही पूर्ण करू शकाल; पण दीर्घकालीन ध्येयं मात्र तुम्हाला पुन्हा नव्याने तयार करावी लागतील. आरोग्याची काळजी घ्या आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचं पालन करा. दुपारच्या जेवणाआधी केलेले व्यावसायिक आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. कौटुंबिक कार्यक्रम, प्रेझेंटेशन्स, सरकारी करार आणि मुलाखतींना अवश्य हजर राहा. आज कुटुंबाबरोबर वेळ घालवणं अत्यावश्यक आहे. लाँग ड्राइव्हला जाणं कृपया टाळा. आज मेडिटेशन पॉवर आणि प्रेमसंबंध वाढवणं एकत्र होऊ शकतं.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना चपला दान करा

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मास कम्युनिकेशमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कठीण आहे. प्रसिद्धी, लोकप्रियता हा तुमच्या कामाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे लोकांमध्ये राहण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्त्व आणखी आकर्षक बनवा. मीडिया, स्पोर्ट्स, बांधकाम, वैद्यकीय, राजकारण आणि ग्लॅमर क्षेत्रातल्या व्यक्तींना यशाची नवी उंची गाठता येईल. शैक्षणिक आणि क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातल्या व्यक्तींना आजचा दिवस नवीन ध्येय साध्य करण्याचा आणि आर्थिकदृष्ट्याही उत्तम असणार आहे. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल, तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तसंच कौटुंबिक संबंधांच्या दृष्टीनेही आजचा दिवस उत्तम आहे. आजच्या दिवसाची सुरुवात करताना लाल रंगाचे कपडे घाला.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9 आणि 6

दान : घरकाम करणाऱ्यांना लाल रंगाची साडी दान करा.

16 जुलै रोजी जन्मलेल्या सेलिब्रिटीज : अमना शरीफ, धनराज पिल्ले, पवनकुमार बन्सल, पॅरिस लक्ष्मी, अरुणा असफ अली.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology