Home /News /astrology /

Numerology : कशा असतात 6 जन्मांक असलेल्या व्यक्ती? जन्मतारखेनुसार जाणून घ्या स्वभाव, गुण आणि भविष्य

Numerology : कशा असतात 6 जन्मांक असलेल्या व्यक्ती? जन्मतारखेनुसार जाणून घ्या स्वभाव, गुण आणि भविष्य

Numerology 15 May 2022 : राशीप्रमाणे तुमच्या जन्मतारेखवरूनही तुमचं भविष्याचा अंदाज बांधता येतो.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. तत्पूर्वी 15 तारखेचा शुभांक म्हणजेच 6 या आकड्याशी संबंधित वैशिष्ट्यं जाणून घेऊ या. सहा या क्रमांकावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे हा जन्मांक असलेल्यांवरही पूर्णपणे शुक्राचा प्रभाव असतो. अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रेम, जिव्हाळा आणि नातेसंबंधांना भरपूर महत्त्व देतात. या व्यक्ती आदर्शवादी आणि आनंदी असतात. विरुद्धलिंगी व्यक्ती यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. दुसऱ्या कोणाच्या प्रभावापासून दूर राहिल्यास या व्यक्ती स्वतःचं अस्तित्व आणि आकर्षण कायम ठेवण्यात यशस्वी होतात. या व्यक्तींनी कला क्षेत्रात करिअर केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक असते. संगीत, कला, लेखन, नाटक आणि ब्युटी प्रॉडक्ट्स अशा क्षेत्रांमध्ये सहा जन्मांकाच्या व्यक्तींना भरपूर यश मिळू शकते. काही घटनांमुळे वा नातेवाईकांमुळे या व्यक्तींचं आयुष्य सुरुवातीला खडतर असतं; मात्र सर्व अडचणींवर मात करून या व्यक्ती यशस्वी होतात. सहा जन्मांक असलेल्या व्यक्तींना क्लास आणि दिसण्याबाबत चांगली जाण असते. आयुष्यात त्यांना प्रॉपर्टी, लॉटरी अशा गोष्टींमधून अनपेक्षित लाभ होण्याची संधी मिळते. करिअरमध्ये त्यांना प्रसिद्धी आणि आर्थिक स्थिरता मिळते. त्यांचं सोशल स्टेटस चांगलं राहतं. लोकांच्या मनात त्यांची चांगली प्रतिमा असते. इंटिरिअर डिझाइन, फॅशन डिझायनिंग, पेंटिंग, अभिनय, क्रिकेट, हॉटेल, पत्रकारिता, प्रवास आणि प्रकाशन अशा व्यवसायांमध्ये असलेल्या सहा जन्मांकाच्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळते. सहा जन्मांक असलेल्या व्यक्तींनी चामड्याच्या पट्ट्याऐवजी सिल्व्हर मेटॅलिक घड्याळ वापरावं. तसंच, भडक रंगाचे कपडे वापरणं टाळावं. या व्यक्तींनी दर शुक्रवारी लक्ष्मी जप करावा. तसंच, या व्यक्तींनी मांसाहार आणि मद्यपान टाळावं. शुभ रंग : निळा, पांढरा आणि गुलाबी (Blue, White and Pink) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 2 दान : कृपया चांदीचं नाणं दान करावं. .......... 15 मे 2022 रोजीचं अंकशास्त्रानुसार भविष्य #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भूतकाळात केलेल्या गोष्टींचा परतावा आज तुम्हाला मिळेल. देवाचे आशीर्वाद सोबत राहतील. त्यामुळे तुमची भरपूर प्रशंसा होईल. समाजात पत वाढेल. एखादा जुना मित्र वा मैत्रीण काही ऑफर करेल, त्याचा स्वीकार करा. एखादा कायदेशीर प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणारी व्यक्ती भेटेल. अभिनेत्यांनी आज येणाऱ्या ऑफर्स टाळू नयेत. कृपया चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. शुभ रंग : Teal शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 6 दान : कृपया आश्रमात रोपं दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आवडत्या व्यक्ती आणि मुलांसोबत नातेसंबंध चांगले राहतील. आपल्या मनातील रोमँटिक गोष्ट, भावना सत्यात आणण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. बिझनेससंबंधी बोलणी सुरळीत पार पडतील. एखाद्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्यासाठी हीच वेळ आहे. राजकीय नेत्यांनी कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घ्यावी. कोणत्याही सेवा क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीबाबत काही निर्णय घेताना भावनांवर आवर घाला. शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना पांढरा तांदूळ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) राजकीय नेते आणि पब्लिक डीलर्स असणाऱ्या व्यक्तींसाठी आज उत्तम दिवस आहे. नाटक कलाकारांनी नव्या कामाची सुरुवात करावी. आज नशीब जोरावर राहील; मात्र मित्रांसोबत असताना आर्थिक चर्चा टाळा. संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, राजकारणी, कलाकार, गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि लेखकांना आपल्या करिअर संबंधी खास बातमी मिळेल. शुभ रंग : लाल (Red) शुभ दिवस : गुरूवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरजूंना हळद दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) गुंतवणूक केलेल्या गोष्टींचे फायदे मिळण्यासाठी थोडा संयम बाळगावा लागेल. शेअर्स सध्या खाली गेले असतील, तरीही होल्ड करा. भविष्यात याचा फायदा होईल. तुमच्या असाइनमेंट्स अगदी वेळेत पार पडतील. आज कापड किंवा चपला दान केल्यास त्याचे भविष्यात उत्तम परिणाम दिसतील. बांधकाम, मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर अशा व्यवसायात असलेल्यांनी आणि ब्रोकर्सनी आज करारावर सह्या करणं टाळावं. पालकांसाठी आज अभिमानाचा दिवस आहे. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया अनाथाश्रमात कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज प्रवासाचे बेत असतील तर ते यशस्वी होतील. कामातली प्रगती दिसण्यास थोडा वेळ लागेल; मात्र तुमच्या कामाचं लोकांमध्ये कौतुक होईल. आज प्रॉपर्टी किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा दिसेल. खेळाडू आणि ट्रॅव्हलर्ससाठी आजचा दिवस उत्तम आहे. महत्त्वाच्या बैठकीसाठी हिरवे कपडे घातल्यास नशीब चमकेल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला प्रपोझ करण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Sea green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरिबांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस धावपळीचा आहे. वैयक्तिक आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी भरपूर घडामोडी घडतील. फॅमिली फंक्शन, मित्रांशी भेटीगाठी, एखाद्या कार्यक्रमात परफॉर्मन्स किंवा पिकनिक, तसंच शॉपिंगचे प्लॅन्स ठरू शकतात. डिझायनर्स, डान्सर, ज्वेलर्स, कलाकार, जॉकी आणि डॉक्टरांना आजचा दिवस फायद्याचा आहे. आज तुमची कौशल्यं दाखवण्यासाठी उत्तम दिवस आहे. वडील आपल्या मुलांना भविष्यासाठी मार्गदर्शन करतील. त्याचा मुलांना फायदा होईल. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया चांदीचं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस बराचसा निरर्थक वाटेल; मात्र कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तुमची कामं सुरळीत पार पडतील. पैशांसंबंधी व्यवहार करताना तुमच्या हुशारीचा फायदा होईल. भूतकाळात केलेल्या काही कामांमुळे नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि पत वाढेल. आज कोणत्याही कागदपत्रांवर सही करणं टाळा. सरकारी टेंडर्स, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरिअर, धान्य यासंबंधी व्यवसायातील नागरिकांना फायदा होईल. भावनिक स्वभावाला आवर घातल्यास बिझनेस रिलेशन्स चांगली राहतील. शुभ रंग : केशरी आणि निळा (Orange and Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भूतकाळ विसरून पुढे जाण्याची ही वेळ आहे. आपला आडमुठा स्वभाव सोडून वडिलधाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐका. तुम्ही आता बऱ्याच जबाबदाऱ्या स्वीकारू शकता. दुपारच्या जेवणापूर्वी केलेले व्यवहार यशस्वी होतील. आज एखादा करार वा मुलाखत नियोजित असेल तर टाळू नका. मात्र, प्रवासादरम्यान खबरदारी घ्या. आज कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करा. आज पैसे आणि प्रेम दोन्ही भरपूर प्रमाणात मिळेल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गायींना हिरवा चारा खाऊ घाला. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मेडिकल सायन्स, संशोधन, ग्लॅमर इंडस्ट्री, फायनान्स, अ‍ॅस्ट्रोलॉजी आणि आर्किटेक्चर क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. क्रिएटिव्ह आर्टमधल्या व्यक्तींना आज भरपूर प्रशंसा आणि प्रसिद्धी मिळेल. एखाद्या कामासाठी सरकारी ओळखीची मदत घ्याल. आज लाल रंगाचे कपडे घातल्यास नशीब जोरावर राहील. डान्सर्स, सिंगर्स, डिझायनर्स, पेंटर्स आणि गृहिणींनी तब्येतीची काळजी घ्यावी. कृपया मांसाहार टाळावा. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया गरिबांना लाल फळं दान करा. 15 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : जी किशन रेड्डी, माधुरी दीक्षित, राम पोथिनेनी, शायनी आहुजा, परिधी शर्मा, सुखेव थापर
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Zodiac signs

पुढील बातम्या