ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 14 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या स्वभावात नेतृत्तवगुण आहेत. बिझनेससंबंधी मोठे निर्णय घेताना तुमच्या सहकाऱ्यांची साथही मोलाची आहे हे लक्षात घ्या. स्वतंत्रपणेदेखील महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आहे. आज असाच एखादा निर्णय घ्याल. याचा फायदा तुमच्या स्वतःच्या बिझनेससाठी होईल किंवा कामाच्या ठिकाणी बढती मिळण्यासाठीदेखील होऊ शकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी लकी आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तींकडून भरपूर प्रशंसा, प्रेम आणि सहकार्य मिळेल. प्रेमात असलेल्यांना समोरून प्रपोजल येण्याची शक्यता आहे. ज्वेलर्स, इंजिनीअर आणि इलेक्ट्रॉनिक, मेटल, सोलर, धान्य, कॉस्मेटिक्स, कापड अशा व्यवसायांमध्ये असलेल्या व्यक्तींना फायदा होईल.
शुभ रंग : हिरवा आणि पिवळा (Green and Yellow)
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 1 आणि 5
दान : कृपया मंदिरात सूर्यफुलाचं तेल दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
पुरूषांनी आज महिला सहकाऱ्यांपासून सावध रहा. महिलांनीदेखील आज कोणतंही चुकीचं काम करणं टाळा. लहान मुलांना आज भरपूर आत्मविश्वास राहील, मात्र केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळायला थोडा वेळ लागेल. आपल्या मुलांसाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. जोडप्यांनी आपल्या आयुष्यातील रोमान्स पुन्हा ताजा केल्यास नातेसंबंध बळकट होतील. आज महत्त्वाची मीटिंग वा मुलाखत असेल तर शेवाळी (Sea Green) रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. आज आपल्या जुन्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करा. भविष्यात कदाचित तुम्हाला त्यांची मदत भासू शकते. वकील आणि अभिनेत्यांसाठी आजचा दिवस लकी आहे.
शुभ रंग : शेवाळी (Sea Green)
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2 आणि 6
दान : कृपया गरिबांना मीठ दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
समाजात आणि नातेवाईकांमध्ये पत वाढेल. नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी संवाद साधणं गरजेचं आहे. त्यामुळे आज बोलणं टाळू नका. क्रिएटिव्ह लोकांसाठी गुंतवणूकीतून मोठा फायदा संभवतो. एखादा उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शिक्षणतज्ज्ञ, हॉटेल व्यावसायिक, संगीतकार आणि राजकारण्यांना आज भरपूर प्रसिद्धी मिळेल. बिझनेस करणाऱ्यांनी दुपारच्या जेवणानंतर आपल्या क्लाएंट्सना भेटावं.
शुभ रंग : तपकिरी (Brown)
शुभ दिवस : गुरूवार
शुभ अंक : 3 आणि 1
दान : कृपया आश्रमामध्ये पिवळा तांदूळ दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
एखादा मोठा निर्णय, मोठी योजना जर पार पाडायची असेल तर त्यासाठी आजच्यासारखा दिवस नाही. आज जे काही सुरू कराल, ते दीर्घकाळ टिकून राहील. मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुमचं नशीब जोरावर असेल. दिवसभर कदाचित सर्वकाही निरर्थक वाटेल, मात्र दिवसाच्या शेवटी तुम्ही केलेल्या कामाचं चीज झाल्याचं दिसून येईल. तरुणांनी मैत्रीचा किंवा रिलेशनशिपचा गैरफायदा घेणं टाळावं. तसंच, आज मांसाहार किंवा मद्यपान टाळा.
शुभ रंग : हिरवट निळा (Teal)
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : कृपया गरिबांना लिंबूवर्गीय शाकाहारी फळ दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
करिअरमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात प्रगती संभवते. मात्र, आज रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. रिलेशनशिप, शॉपिंग, शेअर्स विकत घेणं यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज थोडी रिस्क घेण्यात हरकत नाही. आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत छोटासा प्रवास घडेल. तसंच एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याचीही दाट शक्यता आहे. आज शॉपिंग करताना जे आवडेल ते घ्या, त्याचा भविष्यात फायदाच होईल. शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. खूप दिवसांपासून वाट पाहत असलेले प्रमोशन किंवा पगारवाढ आज होण्याची शक्यता आहे. एखादा खास मित्र वा गाईड यांची भेट होईल.
शुभ रंग : शेवाळी (Sea green)
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : कृपया हिरवी रोपं दान करा.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या पडतील, मात्र त्या आनंदाने स्वीकाराल. तुमचं टार्गेट पूर्ण झाल्यामुळे इतरांसाठी आदर्श ठराल. राजकारणी लोक आपल्या क्षेत्रात विजय मिळवतील. गृहिणींना कुटुंबाकडून भरपूर प्रेम आणि आदर मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना नवं पद किंवा प्रमोशन मिळेल. कलाकारांना भरपूर प्रसिद्धी मिळू शकते. आज प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार सुरळीत पार पडतील. विवाहेच्छुकांना लवकरच लग्नाची मागणी येऊ शकते.
शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue)
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6 आणि 2
दान : कृपया लहान मुलांना निळं पेन किंवा पेन्सिल दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बिझनेस डील करताना भिन्नलिंगी व्यक्तीशी कराल तर फायदा संभवतो. आज तुमची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रेम आणि सहकार्य मिळेल. दिवसाच्या सुरुवातीला वडिलधाऱ्यांचा आणि कुलदेवी-देवतेचा आशीर्वाद घ्या. आज पिवळी डाळ दान केल्याने फायदा होईल. मोठ्या ब्रँड्सपेक्षा लहान ब्रँड्सना आज जास्त फायदा होईल. आज कोणताही निर्णय घेतल्याचा फायदा दिसून येईल. सहकाऱ्यांवर विश्वास ठेवू शकता.
शुभ रंग : केशरी (Orange)
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : कृपया तांब्याचं भांडं दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
भूतकाळात केलेलं एखादे काम आणि तुमचा आत्मविश्वास याच्या बळावर कोणत्याही संकटाला मात देऊ शकाल. आज गायींसाठी काही दानपुण्य कराल तर त्याचा फायदा होईल. जोडप्यांमधील प्रेमसंबंध अधिक बळकट होतील. डॉक्टर, फार्मासिस्ट, इंजिनीअर आणि उत्पादन क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक फायदा संभवतो. मशिनरी विकत घेण्यासाठी किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. झोपण्यापूर्वी योग केल्यास फायदा होईल.
शुभ रंग : निळा (Blue)
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे, मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक टाळा. आपल्या वस्तूंची योग्य काळजी घ्या. तरुण वर्ग आपल्या पालकांवर चांगली छाप पाडू शकेल. मोठ्या सभा, इव्हेंट आयोजित करण्यासाठी किंवा एखादी पार्टी होस्ट करण्यासाठी आजचा दिवस साधारण आहे. आज ज्वेलरी शॉपिंग, काऊन्सिलिंग किंवा एखादा खेळ खेळण्याचा बऱ्यापैकी फायदा होईल.
शुभ रंग : तपकिरी (Brown)
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9 आणि 6
दान : कृपया एखाद्या लहान मुलीला लाल रूमाल दान करा.
14 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: मानुषी छिल्लर, प्रणव मिस्त्री, छत्रपती संभाजी महाराज, वहिदा रेहमान, बॉब वूल्मर
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.