Home /News /astrology /

Numerology : आज खरं प्रेम मिळण्याची शक्यता; भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम आहे दिवस

Numerology : आज खरं प्रेम मिळण्याची शक्यता; भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम आहे दिवस

Numerology 12 May 2022 : जन्मतारखेनुसार ठरणाऱ्या अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य जाणून घ्या.

2ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज टीमलीडर्स बक्षिसासह घरी येतील. कामाच्या ठिकाणच्या, तसंच रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींना तुमच्याप्रति मोठा आदर असेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्केटिंगच्या कौशल्याचं प्रदर्शन घडवण्याचा आजचा दिवस आहे. टेंडर्स घेणं, इव्हेंट्सना उपस्थित राहणं, क्रीडा स्पर्धांत भाग घेणं, कर्ज घेणं, इंटरव्ह्यूसाठी अर्ज करणं यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रॉपर्टी खरेदी करणं आणि मालमत्तेची विक्री करणं या गोष्टी लांबणीवर टाकाव्यात. सौर ऊर्जा, रिटेलिंग, अन्न, प्रवास, अभिनय, बांधकाम आदी क्षेत्रांतल्या बिझनेससाठी चांगला दिवस. आज तुम्हाला खरं प्रेम मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. पुस्तकं, डिजिटल मार्केटिंग, प्रशिक्षण, ज्वेलरी, स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीज आदी व्यवसायांना उत्तम नफा मिळेल. क्रीडापटूंना नाव आणि प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Orange & Green शुभ दिवस : रविवार, बुधवार शुभ अंक : 3 दान : महिलेला केशरी रंगाचं कापड दान करावं. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा लेखी संवाद स्पष्ट हवा. कारण अन्यथा त्यातून मोठा गोंधळ होऊ शकतो. तुम्हाला आधीच बऱ्याच जबाबदाऱ्यांचं ओझं असल्यासारखं वाटत असेल. त्यामुळे आणखी गुंतवणूक करू नका. लीगल कमिटमेंट्स कोणत्याही तडजोडीशिवाय पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही वरिष्ठांच्या डॉमिनेशनखाली असाल; मात्र तरीही नशिबाची साथ असल्यामुळे उत्तम कामगिरी करू शकाल. महिलांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आजचा दिवस जबाबदाऱ्या वाटून देण्यासाठी पैशांचा वापर करण्याचा आहे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस, केमिकल बिझनेस, डॉक्टर्स, शिक्षक, राजकीय नेते, स्टॉक मार्केट आदी नवी उंची गाठतील. उच्च कामगिरीसाठी विद्यार्थी आणि खेळाडूंना एखादा दिवस थांबावं लागेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : अनाथाश्रमात दूध दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आई, देव आणि गुरू यांच्या आशीर्वादामुळे तुमचा चांगला विकास होईल. आजचा दिवस तुमच्या क्षमतेचं आणि कामाचं दर्शन घडवण्याचा आहे. आज तुमच्या भाषणाने लोक आश्चर्यचकित आणि प्रभावित होतील. आज नियोजन केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींना एकमेकांसाठी उभं राहावंसं वाटेल. अशा व्यक्तींनी गिफ्ट्सच्या देवाणघेवाणीतून आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. सरकारी अधिकारी आणि कोणत्याही क्षेत्रातल्या कलाकारांनी पैसा आणि प्रसिद्धी मिळण्यासाठी रिस्क घेतली पाहिजे. दिवसाची सुरुवात करताना तुमच्या गुरूचं नाव घ्यायला विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : महिला मदतनीसाला केशर दान करावं. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातल्या विविध उपक्रमांमध्ये मिळालेलं यश साजरं करण्याचा आजचा दिवस आहे. खासकरून राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांसाठी आजचा दिवस प्रवासाकरिता चांगला आहे. सरकारी अधिकारी, बँकर्स, शेफ्स, हॉटेलियर्स, बांधकाम आणि वैद्यकीय क्षेत्रातले उद्योजक यांना वेगवान सकारात्मक हालचाली अनुभवता येतील. विद्यार्थी लवकरच उद्दिष्ट साध्य करतील. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती त्यांची महिनाअखेरीची टार्गेट्स पूर्ण करू शकतील. आज नॉन-व्हेज आहार आणि मद्यपान टाळावं. सकाळी उठल्यानंतर आपलं अंथरूण-पांघरूण आवरून ठेवायला विसरू नका. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना ब्लँकेट किंवा कपडे दान करणं अत्यावश्यक आहे. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आणि उद्दिष्टं गाठण्याचा आहे. आज तुम्हाला प्रेम, पैसा, प्रसिद्धी, समृद्धी, सुखसोयी हे सगळं मिळेल, तुमची दखल घेतली जाईल. कर्जासारख्या गोष्टींच्या सापळ्यात अडकू नका. नशीब त्याचं काम करील आणि तुम्ही केवळ कामाच्या खऱ्या मार्गावर लक्ष केंद्रित करावं. सेल्स आणि खासकरून क्रीडा क्षेत्रात असलेल्या व्यक्तींसाठी वेगवान हालचाली अनुकूल ठरतील. आज विद्यार्थी शैक्षणिक यशाचा आनंद घेतील. प्रेमात असलेल्या व्यक्ती रिलेशनशिपचा आनंद लुटतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : हिरवी फळं, भाजीपाला दान करावा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी क्रिएटिव्ह दृष्टिकोन वापरल्यास आज त्याचा जादुई उपयोग होईल. नात्यांच्या बाबतीत मागचं सगळं विसरून पुढे चला. जोडीदार आणि मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस आहे. विद्यार्थी, नर्तक, गायक, लेखक, संगीतकार, डिझायनर्स, राजकीय नेते, रिटेलर्स, डरमॅटॉलॉजिस्ट्स, ब्युटिशियन्स, रेस्तराँचे मालक आदींना आर्थिक लाभ होण्यासारखी नवी संधी समोर येईल. प्रॉपर्टी घेऊ इच्छित असलेल्या व्यक्तींचं डील यशस्वी होईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : आश्रमात पांढरी मिठाई दान करावी. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) न्यायालयीन खटले जिंकण्यासाठी अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांसोबत चर्चा करून निष्कर्ष काढावेत. वादविवाद न करता नातेसंबंध पुनरुज्जीवित होतील. शहाणपण उच्च पातळीवर राहण्यासाठी गुरुमंत्र वाचला पाहिजे, पठण केला पाहिजे. क्रीडापटूंना पुरस्कार मिळेल, त्यांची दखल घेतली जाईल. अभिनेते आणि राजकीय नेत्यांना सार्वजनिक सभांना उपस्थित राहून पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्यासाठी चांगला दिवस. पैसे कर्जाऊ देणाऱ्या व्यक्ती, तसंच बँकर्सनी आज सावध राहावं. शुभ रंग : Teal शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : तांबं किंवा कासं या धातूचा तुकडा कोणत्याही स्वरूपात दान करावा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) खासकरून डॉक्टर्स आणि मॅन्युफॅक्चरर्सकरिता प्लॅनिंग आणि अंमलबजावणीसाठी उत्तम दिवस आहे. ज्या देवामुळे तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, शहाणपण, आदर आणि कुटुंबीयांचं प्रेम या गोष्टी मिळाल्या, त्या देवाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जावं. उद्दिष्ट गाठण्यासाठी कामात प्रचंड बिझी असाल; मात्र त्या दिशेचा प्रवास आरामदायी भासेल. तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं आणि समाधानकारक वाटेल. यशस्वी ऑपरेशन्ससाठी डॉक्टर्स, फायनान्सर्सचं कौतुक होईल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभ होईल. तुमच्या रोमँटिक भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्यांना कलिंगड दान करावं. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पब्लिक फिगर्सकरिता लोकप्रियता मिळवण्याचा दिवस. विद्यार्थी, डॉक्टर्स, अभिनेते, आर्किटेक्ट्स, क्रीडापटू आदींचं त्यांच्या टॅलेंटसाठी कौतुक होईल. टेंडर्स आणि प्रॉपर्टीसाठी मध्यस्थाकडे जाण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडू, बिझनेसमन, शिक्षक, बँकर्स, संगीतकार, अभिनेते, विद्यार्थी आदींनी डॉक्युमेंटेशनसाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण ते अनुकूल ठरेल. स्टॉक मार्केटमध्ये असलात, तर मोठ्या प्रमाणात स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली जात आहे. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 दान : घरगुती मदतनीस महिलेला लाल साडी दान करावी. 12 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अदा खान, जे. कृष्णमूर्ती, प्रियांका फोगट, व्ही. पी. सिंग बडनोरे
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Zodiac signs

पुढील बातम्या