Home /News /astrology /

Numerology : ऑफिसमध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठांशी हातमिळवणी करा; अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य

Numerology : ऑफिसमध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठांशी हातमिळवणी करा; अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

    नवी दिल्ली, 11 जून : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा तुमचा आहे. तुम्ही आज जो काही निर्णय घ्याल तो तुमच्या फायद्याचा ठरेल. नवी गुंतवणूक, नवीन ऑफर वा प्रपोझल, काँट्रॅक्ट, प्लॅनिंग, सल्ला घेणं, नवीन नातेसंबंध जोडणं किंवा मुलाखतीची तयारी करणं अशा सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती पाहून सहकाऱ्यांमध्ये असूया निर्माण होईल. ऑफिसमध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठांशी हातमिळवणी करणं फायद्याचं ठरेल. वैयक्तिक आयुष्यात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. नवीन गुंतवणूक हुशारीने कराल. आज सूर्यदेवाचं नामस्मरण करणं फायद्याचं राहील. शुभ रंग : Sea green शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया आज पिवळी फळं दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस जोडीदारासोबत व्यतीत कराल. दिवसाची सुरुवात चांगली गाणी वा संगीत ऐकून केल्यास उत्तम. जोडीदारासोबत शॉपिंगला जाल. वातावरण रोमँटिक राहील. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी डिप्लोमॅटिक राहणं फायद्याचं ठरेल. आज तुमची स्वप्नं सत्यात उतरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्या बाबतीत संयम बाळगणं गरजेचं आहे. पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. भगवान शंकर आणि चंद्रदेवाची पूजा केल्यास उत्तम. शुभ रंग : White and Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना किंवा गायी-गुरांना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं नशीब तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमचं नेटवर्क वाढवण्यासाठी वापरल्यास उत्तम. आजूबाजूच्या वातावरणातून बरंच काही शिकायला मिळेल. तुमच्या वस्तूंची काळजी घेणं गरजेचं आहे. भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरून, मनमोकळेपणाने संवाद साधल्यास उत्तम परिणाम दिसतील. तुम्ही डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय, शिक्षण किंवा ऑडिटिंग अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत असलात, तर तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी आज मिळेल. फायनान्स आणि सरकारी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. शुभ रंग : Peach and Aqua शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरामध्ये कुंकू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज जुने वादविवाद मिटवण्याचा आणि वैयक्तिक संशय दूर करण्याचा दिवस आहे. बिझनेस प्लॅन्ससंबंधी चर्चा करण्यात दिवसाचा बराचसा वेळ जाईल. क्लायंटसमोर केलेली प्रेझेंटेशन्स उत्तम होतील. आजचा बराचसा वेळ मार्केटिंग, प्रॉपर्टी पाहणं, अ‍ॅग्रीमेंट साइन करणं यात जाईल. प्रवास करणार असलात किंवा मशीन्ससोबत काम करत असाल तर खबरदारी घेण्याची गरज आहे. वैयक्तिक नातेसंबंध सामान्य राहतील. आज लिंबूवर्गीय फळं आणि केशरयुक्त मिठाई खाणं गरजेचं आहे. काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करणं उत्तम. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना हिरवं धान्य दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं रखडलेलं प्रमोशन किंवा अप्रैझल लवकरच पूर्ण होईल. तुमचा पैसा आणि एनर्जी यांचा अतिवापर टाळा. आज तुमच्या सहकाऱ्यांपासून सावध रहा. स्टॉक मार्केट, बिडिंग, स्पोर्ट्स, ग्लॅमर, मीडिया आणि सरकारी नोकरी या क्षेत्रांमधल्या व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे धडाक्याचे निर्णय घेणं आज फायद्याचं ठरेल. आज केलेली गुंतवणूक रिस्क-फ्री असेल, तेव्हा चिंता करण्याची गरज नाही. महत्त्वाच्या मीटिंगला जाताना Sea Green रंगाचे कपडे घातल्यास उत्तम. मुलाखती आणि प्रपोझल्सना निडरपणे सामोरे जा. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार सुरळीत पार पडतील. प्रवासाची आवड असणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. आज खाण्या-पिण्यावर ताबा असणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला सर्व बाजूंनी आधार आणि पाठिंबा मिळेल. दिलेल्या सर्व कमिटमेंट्स पूर्ण करून मोठं यश मिळवण्याचा आजचा दिवस आहे. लहान मुलं आणि सहकारी पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे असतील. ग्लॅमर, ट्रेनिंग, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, कापड, रिअल इस्टेट आणि महागड्या वस्तूंसंबंधी व्यवसायांतल्या व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस आहे. गाडी, घर, मशीन किंवा दागिने खरेदीसाठी उत्तम दिवस. शेअर मार्केटमधली गुंतवणूक फायद्याची ठरेल. संध्याकाळी एखादी रोमँटिक डेट तुमची स्वप्नं सत्यात उतरवेल. लवकरच काही मोठ्या संधी चालून येणार आहेत. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात किंवा गरिबांना साखर दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जुन्या ओळखी वापरून बिझनेस डील्समध्ये यश मिळवण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. आज भावनिक न होता व्यावहारिक विचार करून निर्णय घ्यावेत. तुमचा जे आदर करतात, केवळ त्यांच्याप्रति सद्भावना व्यक्त करा. पार्टनर किंवा क्लायंटसमोर कोणतीही तडजोड करू नका. आज वकिलांचा सल्ला ऐकणं फायद्याचं ठरेल. विवाहेच्छुक व्यक्तींना योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे. आज भगवान शंकराच्या मंदिरात अभिषेक केल्याने कुंडलीतला नेपच्यून ग्रह मजबूत स्थितीत येईल. यामुळे मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sea green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना मीठ दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टीने थोडं नमतं घ्यावं लागेल. त्याचा जास्त विचार करू नका. आज स्वभाव थोडा लवचिक आणि मुद्रा प्रसन्न ठेवण्याची गरज आहे. सरकारी ओळखींचा फायदा करून घ्याल. कायदेशीर प्रकरणं चर्चेने वा पैशांच्या मदतीने सुटतील. बिझनेस डील करताना तुमचं अंतर्मन काय सांगतं त्यानुसार वागल्यास फायदा होईल. तुमच्या साधेपणाची छाप तुमच्या जोडीदारावर पडेल. विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळेल. दिवसभरात भरपूर व्यवहार पार पडतील. त्यामुळे दिवसाच्या शेवटी समाधान वाटेल. आज गायी-गुरांना खाऊ घालणं, त्यांच्यासाठी दानधर्म करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जुने वाद-विवाद सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंनी विश्वास दाखवणं गरजेचं आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आज आपल्या जोडीदाराला प्रपोझ करणं उत्तम. बिझनेस डील्समध्ये नशीब साथ देईल. राजकारण, लिक्विड, औषधं, मीडिया, फायनान्स वा शिक्षण क्षेत्रांतल्या व्यक्तींना भरपूर फायदा होईल. अभिनेते, राजकीय नेते, मार्केटर, पब्लिक फिगर वा मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज रिस्क घेणं फायद्याचं ठरेल. तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती कायमची तुमच्यापासून दूर जाईल. जोडप्यांनी आज बोलून आपल्यातला वाद मिटवून घ्यावा. खेळाडूंच्या आई-वडिलांना आपल्या पाल्याचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरामध्ये लाल कापड दान करा. 11 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : लालूप्रसाद यादव, महाबली शेरा, ज्युलिया मार्गारेट, रामप्रसाद बिस्मिल, राजमोहन रेड्डी
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya

    पुढील बातम्या