मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : जोडीदारासोबत तुमचा आजचा दिवस कसा? अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य.

Numerology : जोडीदारासोबत तुमचा आजचा दिवस कसा? अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य.

Numerology 09 June 2022 : जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा आहे पाहा.

Numerology 09 June 2022 : जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा आहे पाहा.

Numerology 09 June 2022 : जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा आहे पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 9 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज एखाद्या हिरोप्रमाणे सर्वत्र विजयी होण्याची शक्यता मोठी आहे. एखाद्या योद्ध्याप्रमाणे स्पर्धा जिंकू शकाल. गॅदरिंगला अवश्य जावं आणि माइक हाती घेण्याची संधी आल्यास सोडू नये. तुमची भाषणाची क्रिएटिव्ह शैली सर्वांवर प्रभाव पाडील. कपल्स प्रेमसंबंधांचा आनंद घेतील, समृद्ध होतील. सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, संगीतकार आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्ती आदींना खूप लोकप्रियता मिळेल. तुमच्या मतांवर आणि निर्णयांवर ठाम राहा. कारण तुम्ही दिलेला निर्णय सर्वत्र स्वीकारला जातो.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : रविवार, मंगळवार

शुभ अंक : 1, 9

दान : गरिबांना लाल फळं दान करावीत.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमच्या मनावर रोमँटिक भावनांचं राज्य असेल. त्यामुळे बाहेर जा आणि दिवसाचा आनंद घ्या. सध्या तुमचं इंट्यूशन खूप उच्च पातळीवर आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी डोळे बंद करून तुमच्या मनाचं ऐका. तुम्ही खूप निरागस आहात. त्यामुळे तुम्ही सहज दुखावले जाऊ शकता. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला, तसंच एक्स्पोर्ट बिझनेस डील्स करायला हरकत नाही. नातेसंबंधांतला रोमान्स वाढीला लागेल, समृद्धी मिळेल; मात्र अंधविश्वास ठेवला जाणार नाही याची काळजी घ्या.

शुभ रंग : Pink

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : भिकाऱ्यांना दूध दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस सर्व क्षेत्रांतले कलाकार आणि क्रिएटिव्ह व्यक्तींना समर्पित आहे. तुम्ही केलेल्या कामाचा आर्थिक लाभ घेण्याची ही वेळ आहे. तुम्हाला नाव-प्रसिद्धी मिळेल; मात्र तुमच्या गुरूंचं नामस्मरण करायला, त्यांना आदर द्यायला विसरू नका. तुमचे गुरू, देव यांच्यासाठी दिवा लावा. राजकीय नेते आणि वकील यांच्यासाठी आजचा दिवस विशेष प्रभावाचा आहे. खरेदी, प्रवेश घेणं, घर किंवा वाहन, कपडे किंवा डेकॉर आदींची खरेदी आदींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. डिझायनर्स, हॉटेलियर्स, अँकर्स, प्रशिक्षक, फायनान्सर्स, संगीतकार आदी व्यक्ती आज त्यांच्या स्पेशल अचीव्हमेंट्सचा आनंद घेतील. आजच्या दिवसाची सुरुवात पिवळा भात खाऊन करावी.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3, 9

दान : मंदिरात चंदन दान करावं.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बऱ्याच काळाच्या कष्टांनंतर आजचा दिवस सोपा, नशिबाचा, लक्झरियस, नफ्याचा आणि यशाचा असेल. कामं सुरळीतपणे करून घेण्यासाठी वैयक्तिक ओळखींचा वापर करून घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. बिझनेस डील्स अगदी लगेच क्रॅक होतील. आर्थिक विषयातले महत्त्वाचे निर्णय फायद्याचे ठरतील. कलाकार, अभिनेते, अँकर्स, डान्सर्स आदींनी ऑडिशन्ससाठी जरूर अर्ज करावा. कारण आज लाभ मिळण्याच्या बऱ्याच संधी आहेत. धातुकाम करणाऱ्या व्यक्ती, बिल्डर्स, वितरक, इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस, आयटी प्रोफेशनल्स, कपड्यांचे व्यापारी आदींचा दिवस मोठ्या फायद्यासह संपेल. आज हिरव्या पालेभाज्या खाणं फायद्याचं ठरेल.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : मुलांना रोपं दान करावीत.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचा संशयी स्वभाव थोडा कमी होईल आणि तुम्हाला आज रिलॅक्स वाटेल. दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. एक्स्पोर्ट-इम्पोर्टमधल्या गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे डोळे उघडण्याची आणि तुमच्या जोडीदाराने दिलेल्या आदराचं स्वागत करण्याची गरज आहे. राजकारण, बांधकाम, अभिनय, स्टॉक मार्केट, एक्स्पोर्ट, संरक्षण, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा आदी क्षेत्रं, तसंच इंटरव्ह्यूमध्ये आज नशीब आजमावायला हवं. आज तुमचा जोडीदार पूर्ण वेळ तुमच्यासाठी उपलब्ध असेल.

शुभ रंग : Green & Orange

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : गरिबांना ब्राउन राइस दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि जीवनाची ध्येयं गाठण्यासाठी वापरा. आजचा दिवस समृद्ध करणारा आणि जीवनाला पूर्णत्व मिळाल्याची भावना देणारा असेल. जोडीदारासोबतच्या समस्या सोडवण्याची आणि बाहेर शॉपिंगला जाण्याची ही वेळ आहे. डिझायनर्स, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ, विद्यार्थी आदींना नव्या असाइनमेंट्स मिळतील आणि त्यातून त्यांच्या विकासाला चालना मिळेल. रोमँटिक रिलेशनशिपमुळे घरात आनंद पुन्हा परतेल.

शुभ रंग : Violet

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : पांढरा हातरुमाल दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्हाला कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून विशेष पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल. वकील, सीए, संरक्षण अधिकारी, ट्रॅव्हलर्स, इंजिनीअर्स, बिझनेस टायकून्स आदींना समाजात मोठी प्रतिष्ठा मिळेल. आज पीअर्सवर संशय घेणं टाळा. आज सगळं काही पर्फेक्ट होणार आहे. मिळालेलं आव्हान स्वीकारा. कारण तुमचं विश्लेषण करण्याचं कौशल्य तुम्हाला सगळीकडे जिंकवू शकतं. कामाच्या ठिकाणी विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सूचना खुल्या दिलाने स्वीकारा. बिझनेस किंवा पर्सोनेलसंदर्भात कोणी प्रपोझल दिलं, तर ते स्वीकारा. कारण त्याचा तुम्हाला भविष्यात उपयोग होईल. नाट्यकलाकार, सीए, सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या व्यक्तींना आज नशिबाची विशेष साथ मिळेल.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7, 9

दान : तांब्याच्या धातूचा छोटा तुकडा दान करावा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

अतिमहत्त्वाकांक्षी होणं टाळा, त्यावर नियंत्रण आणा. कारण त्यामुळे तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि आरोग्य यांवर विपरीत परिणाम होईल. आर्थिक लाभ मोठे असतील. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुम्हाला अनुकूल ठरतील. कायदेशीर वाद मिटवण्यासाठी पैशांची गरज भासेल. मॅन्युफॅक्चरर्स, आयटी कर्मचारी, सरकारी अधिकारी, ब्रोकर्स, ज्वेलर्स, डॉक्टर्स, वक्ते आदींना यश मिळेल आणि अभिमान वाटेल. डोकं शांत ठेवा. कारण जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आज धान्य दान करणं आणि संत्री खाणं आवश्यक आहे.

शुभ रंग : Deep Purple

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गरजूंना छत्री दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्हाला जोडीदाराकडून खूप फायदा होईल आणि तुमच्याकडूनही जोडीदाराला फायदा होईल. आजचा दिवस प्रसिद्धी मिळण्याचा आहे. तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. त्यामुळे लीडरप्रमाणे काम करा. प्रेमात असलेल्यांना त्यांच्या भावना लेखी किंवा तोंडी व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस. बिझनेस रिलेशन्स आणि डील्स उच्च पातळीवर जातील. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियातल्या व्यक्ती प्रसिद्धीचा आनंद घेतील. राजकीय व्यक्तींना आज खूप संधी मिळतील. पब्लिक फिगर्स असलेल्यांनी आजचा दिवस कोलॅबोरेशन आणि प्रगती साध्य करण्यासाठी वापरावा. ट्रेनर्स, बेकर्स, हॉटेलियर्स, स्टॉक ब्रोकर्स, डिझायनर्स, डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर, अभिनेते आदी लोकप्रियतेचा आनंद लुटतील.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : लाल मसूर दान करा.

9 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सोनम कपूर, किरण बेदी, अमिषा पटेल, अनिल मनाभाई नाईक, अनुष्का शंकर

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya