मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : मनसोक्त शॉपिंग करा; तुमच्या जन्मतारखेनुसार आजचा दिवस खरेदीसाठी उत्तम

Numerology : मनसोक्त शॉपिंग करा; तुमच्या जन्मतारखेनुसार आजचा दिवस खरेदीसाठी उत्तम

Numerology 09 July 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. त्यानुसार तुमचा आजचा दिवस कसा?

Numerology 09 July 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. त्यानुसार तुमचा आजचा दिवस कसा?

Numerology 09 July 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. त्यानुसार तुमचा आजचा दिवस कसा?

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 9 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस सर्वसाधारण असेल. बिझनेसमधल्या पूर्वीच्या ऑर्डर्सचे पैसे मिळतील; मात्र नव्या ऑर्डर्स संथ वेगाने येतील. गॅदरिंगला जाऊन स्टेजवर उपस्थिती लावली पाहिजे. तुमच्या भाषणाच्या क्रिएटिव्ह शैलीमुळे इतरांवर खूप प्रभाव पडेल. कपल्स भावनिकदृष्ट्या जोडलेली राहतील; मात्र एकत्र वेळ घालवणं कठीण आहे. सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, संगीतकार, ग्लॅमर इंडस्ट्री आदींमधल्या व्यक्ती टार्गेट पूर्ण करतील. तुमची मतं आणि निर्णयांवर ठाम राहा. कारण तुमचा निर्णय युनिव्हर्सली स्वीकारला जातो.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : रविवार, मंगळवार

शुभ अंक : 1, 9

दान : संत्री दान करावीत.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आपल्या भावना अन्य व्यक्तींकडे व्यक्त करताना सावधगिरी बाळगा. कारण कोणी तरी तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतं. इंट्यूशन उच्च पातळीवर आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना डोळे बंद करा आणि आतल्या आवाजाचं ऐका. तुम्ही खूप निरागस आहात. त्यामुळे सहज दुखावले जाऊ शकता. स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट आणि एक्स्पोर्ट बिझनेस डील्स करावीत. रिलेशनशिपमधला रोमान्स वाढेल आणि समृद्ध व्हाल; मात्र अंधविश्वास ठेवू नका.

शुभ रंग : Pink & Sky Blue

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : भिकाऱ्यांना भात दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमची कल्पनाशक्ती खूप उत्तम आहे; पण त्यामुळे व्यावहारिक जगाकडे दुर्लक्ष करू नका. स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या आणि ऑफर्स स्वीकारा. पूर्वी केलेल्या कामगिरीचे फायदे आज मिळण्याचा, तसंच त्यातून पैसे मिळण्याचा योग आहे. बक्षिसं मिळतील, समाजात चांगलं स्थान मिळेल; मात्र गुरूंना आदर द्यायला विसरू नका. देव किंवा तुमच्या गुरूसाठी दिवा लावा. वकील आणि राजकीय नेत्यांसाठी आजचा दिवस खूप इम्प्रेसिव्ह आहे. खरेदी करणं, प्रवेश घेणं, घर किंवा वाहनाची, तसंच कपडे किंवा डेकॉरची खरेदी करणं यांसाठी चांगला दिवस. डिझायनर्स, हॉटेलियर्स, अँकर्स, प्रशिक्षक, फायनान्सर्स, संगीतकार आज विशेष अचीव्हमेंटचा आनंद घेतील. दिवसाची सुरुवात पिवळा भात खाऊन करा.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3, 9

दान : मंदिरात पिवळ्या मोहरीच्या बिया दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस दमवणारा आणि ताणाचा असेल. तसंच, काम करवून घेण्यासाठी पूर्वजांच्या कनेक्शन्सचा आणि पैशांच्या ताकदीचा वापर करण्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. बिझनेस डील्स विनाविलंब क्रॅक होतील. आर्थिक विषयात घेतलेले महत्त्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील. नाट्यकलाकार, अभिनेते, अँकर्स, डान्सर्स यांनी ऑडिशन्सना अर्ज करायला हवा. कारण आज त्यांना फायदा मिळण्याचे संकेत आहेत. मेटल मॅन्युफॅक्चरर्स, बिल्डर्स, डिस्ट्रिब्युटर्स, इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस, आयटी प्रोफेशनल्स, कपड्यांचे व्यापारी आदींना आज दिवसअखेर मोठा नफा होण्याची शक्यता. आज हिरव्या पालेभाज्या खाणं श्रेयस्कर ठरेल.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : आश्रमात ब्लँकेट्स दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कन्फ्युजन संपेल. तुम्हाला पैसे आणि लोकप्रियता मिळवण्याचा नवा मार्ग सापडेल. दीर्घकालीन समस्या सोडवण्यात तुम्हाला कुटुंबीय आणि मित्रांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता. ट्रॅव्हल, स्टॉक मार्केट, क्रीडा, रिटेल, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आदींमधल्या गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची शक्यता. तुम्ही डोळे उघडण्याची आणि तुमच्या जोडीदाराने दिलेला आदर स्वीकारण्याची गरज आहे. राजकारण, बांधकाम, अभिनय, स्टॉक मार्केट, एक्स्पोर्ट, डिफेन्स, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यूज आदींमध्ये आज नशीब आजमावलं पाहिजे. आज तुम्हाला जोडीदाराबरोबर संपूर्ण दिवस व्यतीत करता येईल.

शुभ रंग : Green & Orange

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : गरिबांना, गायी-गुरांना हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचं सोशल सर्कल वाढत आहे. त्यात अधिकाधिक व्यक्ती येत आहेत. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. आजचा दिवस आरामदायी आहे. आयुष्यात समृद्धी आणि परिपूर्णता येईल. नातेवाईकांसोबत असलेले वाद सोडवण्याची आत्ता वेळ आहे. आज शॉपिंगला जरूर जा. डिझायनर्स, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ, विद्यार्थी आदींना नव्या असाइनमेंट्स मिळतील. त्यातून त्यांची प्रगती होईल. रोमँटिक रिलेशनशिपमुळे घरात आनंद पुन्हा येईल.

शुभ रंग : Violet

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : आश्रमात साखर दान करावी.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

इतरांना जज करणं थांबवा. नव्या संधींसाठी आशावादी राहा. वकील, सीए, डिफेन्स ऑफिसर्स, ट्रॅव्हलर्स, इंजिनीअर्स, बिझनेस टायकून्स आदींची समाजात मोठी दखल घेतली जाईल. सहकाऱ्यांवर संशय घेणं टाळा. आज सगळं काही पर्फेक्ट होणार आहे. दिलेलं आव्हान स्वीकारा. कारण तुमची विश्लेषण कौशल्यं तुम्हाला सर्वत्र विजय मिळवून देऊ शकतात. तुमचे बाहू खुले करा आणि कामाच्या ठिकाणी विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेल्या सूचना स्वीकारा. बिझनेस किंवा पर्सोनेलसंदर्भातलं प्रपोझल स्वीकारायला हरकत नाही. भविष्यात फायद्याचं ठरेल. वकील, नाट्यकलावंत, सीए, सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या व्यक्तींना नशीब विशेष साथ देईल.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7, 9

दान : आश्रमात भांडी दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्ही खूप महत्त्वाकांक्षी आहात. त्यामुळे तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष करता. काही दिवस प्रवास आणि शारीरिक श्रम नियंत्रित करा. आर्थिक लाभ मोठे असतील. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुम्हाला अनुकूल ठरतील. कायदेशीर प्रकरणं सोडवण्यासाठी पैसे घालावे लागतील. मॅन्युफॅक्चरर्स, आयटी कर्मचारी, सरकारी अधिकारी, ब्रोकर्स, ज्वेलर्स, डॉक्टर्स, वक्ते आदींना अचीव्हमेंट्समुळे गौरवपूर्ण वाटेल. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोकं शांत ठेवा. आज धान्य दान करण्याची आणि संत्री खाण्याची गरज आहे.

शुभ रंग : Deep Purple

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गरजूंना कपडे दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्रेमात असलेल्या, तसंच पार्टनरशिपमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी विन-विन सिच्युएशन आहे. आजचा दिवस प्रसिद्धी मिळण्याचा आहे. तुम्ही अनेकांच्या प्रेरणास्थानी आहात. त्यामुळे नेत्यासारखं वागा. प्रेमात असलेल्या व्यक्तींना त्यांच्या भावना लेखी किंवा संवादातून व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस. बिझनेस रिलेशन्स, डील्स या बाबी नवी उंची गाठतील. मीडिया, तसंच ग्लॅमर इंडस्ट्रीत असलेल्या व्यक्ती प्रसिद्धीचा आनंद घेतील. राजकीय नेत्यांना आज उत्तम संधी मिळतील. पब्लिक फिगर्सनी आजचा दिवस कोलॅबोरेशन आणि प्रगती साधण्यासाठी वापरला पाहिजे. ट्रेनर्स, बेकर्स हॉटेलियर्स, स्टॉक ब्रोकर्स, डिझायनर्स, डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर, अभिनेते आदी व्यक्ती लोकप्रियतेचा अनुभव घेतील.

शुभ रंग : Red & Orange

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : गरिबांना कलिंगड दान करा.

9 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : संगीता बिजलानी, संजीव कुमार, सुखबीरसिंग बादल, के. बालचंदर, गुरुदत्त, यू. जी. कृष्णमूर्ती

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya