Home /News /astrology /

Numerology : 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींनी आज चुकूनही गिफ्ट स्वीकारू नका; कारण...

Numerology : 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींनी आज चुकूनही गिफ्ट स्वीकारू नका; कारण...

Numerology 08 June 2022 : अंकशास्त्रानुसार 8 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला तुमच्या कामाची पद्धत बदलावी लागेल. प्रसंगी परिस्थितीसमोर झुकण्याची वेळ येऊ शकते. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार रखडतील. आर्थिक फायदे अपेक्षेपेक्षा कमी होतील; मात्र कोणत्याही वादाशिवाय सुरळीत सर्व व्यवहार पार पडतील. आज झेपेल तितकंच काम करा. मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मेडिकल क्षेत्रातल्या व्यक्ती, स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन, सोलार बिझनेसमधल्या व्यक्ती, इंजिनीयर आणि सरकारी अधिकाऱ्यांना एखादी चांगली ऑफर मिळेल. शेती आणि शिक्षणामध्ये नफा होईल. राजकीय व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ, सोनार आणि कॉर्पोरेट टीम लीडर असणाऱ्यांनी एखादी ऑफर आल्यास नकार द्यावा. शुभ रंग : Blue and Yellow शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 9 दान : कृपया आश्रमामध्ये गहू दान करावेत. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रामाणिकपणा आणि निष्ठा हे गुण तुमच्या स्वभावातच आहेत. त्यामुळे लोक तुम्हाला मनापासून फॉलो करतात. अगदी वरिष्ठांमध्येही तुमची चांगली छाप आहे. आज मात्र तुमच्या याच प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घ्या. डॉक्टर, इंजिनीअर, ब्रोकर आणि ट्रॅव्हल एजन्सी, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, स्टॉक मार्केट आणि पार्टनरशिप फर्म या व्यवसायातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. एखाद्या सहकाऱ्याकडून वा जोडीदाराकडून दुखावले जाल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया गायी-गुरांना तेल द्या. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या जीवनशैलीमधली लवचिकता आणि तुमच्यात असलेली क्षमता हे पाहून करिअरमध्ये लवकरच एक नवीन ऑफर चालून येणार आहे. विचारांची सर्जनशीलता आणि मधुर वाणी यामुळे कामाच्या ठिकाणी बॉसवर आणि घरी कुटुंबीयांवर छाप पाडाल. कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करण्याची तुमची तयारी असल्यामुळे यश लवकरच मिळेल. आज पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या. क्रिएटिव्ह व्यक्ती आणि पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. खेळाच्या प्रशिक्षकांना यश आणि आर्थिक लाभ मिळतील. शेती आणि बांधकामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य दिवस. सकाळी कपाळावर चंदनाचा टिळा लावणं उत्तम. शुभ रंग : Orange and Blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया गरिबांना सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज पैसे कमावण्यासाठी विविध आयडिया डोक्यात येतील. त्यांपैकी काही कल्पनांवर सध्या खरोखर काम करू शकता. उच्चपदावर असणाऱ्या व्यक्तींचं आणखी प्रमोशन होऊ शकतं. पैशांसंबंधी तुमच्या योजना कोणालाही सांगू नका. विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज दाखल करावा, फायदा होईल. हिरव्या पालेभाज्या दान केल्यामुळे भाग्य उजळेल. खेळाडू आणि सर्जन असणाऱ्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी आणि आर्थिक फायदा मिळेल. आज कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत बराच वेळ व्यतीत कराल. त्यांचं म्हणणं आज आवर्जून ऐकून घ्या. दानधर्म करणं उत्तम. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना चपला दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी आज थोडा कठीण दिवस आहे. प्रोफेशनल लाइफमध्ये मात्र भरपूर प्रगती होईल. तुमच्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. मशिनरी खरेदी करणं, प्रॉपर्टी विक्री करणं, कागदपत्रांवर सही करणं किंवा सहलीला जाण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वृत्तनिवेदक, अभिनेते, हस्तकला कलाकार, इंजिनीअर या सर्वांना भरपूर प्रसिद्धी मिळेल. आज भेटवस्तू घेणं टाळा. कारण ही तुमच्या शत्रूची एखादी चाल असू शकते. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथाश्रमातल्या मुलांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सहलीला जाण्यासाठी आणि नव्या संधी शोधण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या ध्येयाच्या दिशेने मेहनतीने काम केल्यास अपेक्षित परिणाम दिसून येतील. आज तुम्ही जे कराल त्याला नशिबाचा पाठिंबा असेल, त्यामुळे तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी योग्य दिवस. कुटुंबीयांचं भरपूर प्रेम आणि आधार मिळेल. जबाबदाऱ्या पार पडण्यात आणि ऐशोआरामात दिवस निघून जाईल. रिटेलर्स, शिक्षक, ज्वेलर्स, कॉस्मेटिक व्यापारी, डिझायनर्स, वकील, तंत्रज्ञ, राजकीय नेते आणि अभिनेत्यांना आज विशेष अप्रैझल मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 9 दान : कृपया गरिबांना पांढरे तांदूळ दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या जवळच्या व्यक्तींना जज करणं टाळा. तसंच बोलणं मृदू ठेवा. चांगला परफॉर्मन्स, चांगली रिलेशनशिप आणि भरपूर आर्थिक फायदा हे सगळं तुमच्या वाट्याला लवकरच येणार आहे. आज बिझनेसमध्ये नातेवाईक आणि मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका. खेळाडूंनी वाद टाळण्यासाठी प्रतिस्पर्ध्यापासून दूर राहणं उत्तम. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरू शकते. आज भगवान शंकराला अभिषेक केल्यास उत्तम. शुभ रंग : Yellow and Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 3 दान : कृपया पिवळ्या डाळी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज घाईघाईत कोणताही निर्णय घेणं टाळा. मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्याप्रति निष्ठावान आहेत. त्यामुळे टीमचं उत्तम प्रकारे नेतृत्व करू शकाल. आज तब्येतीकडे लक्ष देण्याची आणि कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करण्याची गरज आहे. आज दानधर्म केल्याचा भरपूर फायदा होईल. कृपया काही काळ निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करा. करिअरसंबंधीचे तुमचे निर्णय भविष्यासाठी फायद्याचे ठरतील; मात्र तुमच्या मेंटॉरचं मार्गदर्शन नक्की घ्या. शुभ रंग : Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना छत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस भरपूर प्रसिद्धीचा, आनंदाचा आणि उत्साहपूर्ण असा असणार आहे. तुमच्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी याचा वापर करून घ्या. आर्थिक व्यवहार आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरळीत पार पडेल. एकमेकांप्रति विश्वास असल्यामुळे नातेसंबंध अधिक बळकट होतील. शिक्षक, अभिनेते, अ‍ॅस्ट्रॉलॉजर्स, कौन्सिलर्स, पायलट, वकील, शेफ, हॉटेलिअर्स, डॉक्टर, हीलर्स, फार्मासिस्ट, सर्जन, राजकीय नेते, वैज्ञानिक आणि खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी आणि यश मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना लाल मसूर डाळ दान करा. 8 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : शिल्पा शेट्टी, राजेंद्र नाथ, डिंपल कपाडिया, अतिशी, रणदीप राय
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Zodiac signs

पुढील बातम्या