Home /News /astrology /

Numerology : आज या गोष्टी टाळणंच तुमच्या हिताचं; जन्मतारखेनुसार जाणून घ्या अंकशास्त्र

Numerology : आज या गोष्टी टाळणंच तुमच्या हिताचं; जन्मतारखेनुसार जाणून घ्या अंकशास्त्र

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आपली हुशारी आणि समजूतदारपणा यामुळे आज जो निर्णय घ्याल तो योग्यच ठरेल. एखादी नवीन संधी चालून येताना दिसल्यास तिचा स्वीकार करा. प्रॉपर्टीसंबंधी वाद सोडवण्यासाठी नवीन ओळखी उपयोगी पडतील. थिएटर आर्टिस्ट, सोनार, वकील, डिफेन्स ऑफिसर, ट्रेनर्स आणि आयटी क्षेत्रातील लोकांनी येणारी ऑफर नक्की स्वीकारावी. आज सूर्याला अर्घ्य वाहणं फायद्याचं ठरेल. चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 आणि 3 दान : कृपया गरीबांना संत्री दान करा. # नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज पैसा आणि वेळ दोन्ही खर्च करण्यापूर्वी थोडा विचार करा. ऑफिसमध्ये ग्रोथ वाढवण्यासाठी नवी जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करा. रोमँटिक भावनांवर ताबा ठेवा. सध्याचा काळ हा गुंतागुंतीचा आणि संशयाचा आहे. बिझनेससंबंधी दिलेल्या कमिटमेंट्स आरामात पूर्ण कराल. लहान ब्रँड्सशी पार्टनरशिप करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. राजकारण्यांनी कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घ्यावी. शुभ रंग : अ‍ॅक्वा (Aqua) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरीबांना तांदूळ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कोणत्याही क्षेत्रातील सेल्समन असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अगदीच फलदायी आहे. आज नवीन डील फायनल होऊ शकते, तसंच टार्गेटही पूर्ण होऊ शकतं. लवकरच नव्या रिलेशनशिपमध्ये अडकू शकता. आज नशीब तुमची साथ देईल, मात्र आपल्या खासगी बाबी मित्रांसोबत शेअर करणं टाळा. कॉस्मेटिक्स व्यापार, हॉटेल व्यवसाय, फार्मासिस्ट, डॉक्टर, संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, राजकारणी, कलाकार, अभिनेते, गृहिणी आणि लेखकांना आज करिअरसंबंधी एखादी खास बातमी मिळण्याची शक्यता आहे. शुभ रंग : लाल (Red) शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरजूंना कच्ची हळद दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस प्रवासासाठी आणि अनेकांना भेटण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे राजकारणी लोकांनी आज आपली एखादी योजना राबवल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. आज गरजूंना चादर दान केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. हातात असलेली सर्व कामं पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे. मशीन, मेटल, सॉफ्टवेअर या व्यवसायांमध्ये असलेल्या व्यक्तींनी तसंच ब्रोकर्सनी नवीन अ‍ॅग्रीमेंटवर सही करणं टाळावं. पालकांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. प्रोफेशनल लाईफमध्येही आज भरपूर प्रगती होईल. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरजूंना चादर किंवा चप्पल दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एकमेकांप्रती विश्वास, आणि कष्टाची तयारी या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर आजचा दिवस यशाचा आहे. कामामध्ये शॉर्टकट घेणं टाळा, तुमच्या कष्टाचं चीज नक्की होईल. तुमच्या कामाचं आज सर्वांसमोर कौतुक होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस, काही काळातच याचे फायदे दिसून येतील. खेळाडू आणि ट्रॅव्हलर्ससाठी आजचा दिवस अगदी उत्तम आहे. परीक्षेला जाताना हिरवे किंवा पिवळे कपडे घातल्यास नशीब चमकेल. आज गणपती मंदिरात जाऊन गणेशाचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग : समुद्री हिरवा (Sea Green) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया वृद्धाश्रमात रोपं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) खासगी आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही नेहमीच प्रामाणिक राहता, मात्र याचा परतावा तुम्हाला मिळत नाही. लोक तुमच्यावर अवलंबून राहू शकतात, तुम्हीदेखील आलेल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडता. मात्र, याच गोष्टीचा कित्येक लोक फायदा घेऊ शकतात. तसं होऊ नये याची काळजी घ्या. आज मनात रोमान्सचा विचार असेल, मात्र तुमची फसवणूकही होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वा व्यवसायात आपल्या सर्वच सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास टाकू नका, ते तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवू शकतात. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हलर, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टरांसाठी आजचा दिवस लकी आहे. खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षकांकडून सल्ला घ्यावा, हा सल्ला भविष्यात तुम्हाला अतिशय फायद्याचा ठरेल. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया चांदीचं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आपला ताठपणा बाजूला ठेऊन, भूतकाळात आलेली एखादी ऑफर स्वीकारा. पैशांसंबंधी व्यवहार विचारपूर्वक कराल. तुमचे नेतृत्वकौशल्य आणि योग्य विश्लेषण करण्याचे कौशल्य या दोन्हीचा फायदा होईल. आज वाद टाळा. प्रेमप्रकरणात अपमान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज कमिटमेंट करणं टाळा. आज कागदपत्रांवर सही करणंही टाळल्यास उत्तम. कोर्ट, थिएटर, टेक्नॉलॉजी, सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, शाळा, इंटिरियर, धान्य व्यापार अशा क्षेत्रांतील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. बिझनेस रिलेशन्स चांगले राहतील, मात्र पार्टनरशिप टाळा. शुभ रंग : केशरी आणि निळा (Orange and Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया पिवळे कापड दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा व्यवसाय छोटा असो वा मोठा, आज भरपूर प्रगती होणार आहे. आजचा दिवस तब्येतीकडे लक्ष देण्याचा आहे. हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारा. दुपारच्या जेवणानंतर केलेले व्यवहार फायदेशीर ठरतील. काउन्सिलिंग सेशन, फॅमिली फंक्शन, प्रेझेंटेशन, मीटिंग, सरकारी अ‍ॅग्रीमेंट किंवा मुलाखती आजिबात टाळू नका. आज कुटुंबियांसोबत नक्की काही वेळ रहा. प्रवासाची योजना असेल तर ती टाळा. आज प्रेमसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी, आणि मेडिटेशन करण्यासाठी उत्तम दिवस आहे. शुभ रंग : समुद्री निळा (Sea Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरीबांना हिरवे कापड दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मीडिया, स्पोर्ट्स, बांधकाम, मेडिकल, राजकारण आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमधील लोकांना आज भरपूर प्रसिद्धी मिळेल. आजचा दिवस बरंच काही साध्य करण्याचा आहे. शिक्षण किंवा क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातील लोकांना आर्थिक फायदा होईल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये फायद्यासाठी जर सरकारी मदत घेण्याचा विचार करत असाल, तर आज त्यासाठी योग्य दिवस आहे. सकारात्मक परिणाम मिळतील. आपल्या पाकिटात आज लाल रूमाल ठेवल्यास नशीब चमकेल. शुभ रंग : लाल (Red) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया महिलांना केशरी कापड दान करा. 7 मे रोजी जन्मलेले सेलिब्रिटीज: रवींद्रनाथ टागोर, सिद्धार्थ मल्या, एस. पी. जननाथन, संदीप किशन.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या