Home /News /astrology /

Numerology : आज 'या' गोष्टी करणं टाळा; काय करणं तुमच्या फायद्याचं ठरेल पाहा अंकशास्त्र

Numerology : आज 'या' गोष्टी करणं टाळा; काय करणं तुमच्या फायद्याचं ठरेल पाहा अंकशास्त्र

Numerology 07 June 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आर्थिक बाबतीत तुमचं विश्लेषण आणि अंदाज अगदी योग्य ठरतील. येणारी नवीन संधी सोडू नका. प्रॉपर्टीशी संबंधित वाद सोडवण्यासाठी तुम्हाला एखादी व्यक्ती भेटेल. थिएटर आर्टिस्ट, सोनार, वकील, डिफेन्स ऑफिसर्स, ट्रेनर आणि आयटी क्षेत्रातल्या व्यक्तींना एखादी नवी ऑफर मिळेल. त्यांनी ती नक्कीच स्वीकारावी. आज कृपया चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. सूर्याला जल अर्पण करणं, तसंच सूर्यमंत्राचा जप करणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : नारिंगी शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 आणि 3 दान : गरिबांना संत्री दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज दुसऱ्यांना उसने पैसे देणं टाळा, तसंच कर्ज घेणंही टाळा. आज ऑफिसमध्ये एखादी मोठी जबाबदारी घ्या. तुमच्या प्रगतीसाठी हे फायद्याचं ठरेल. आज रोमँटिक भावनांना आवर घाला. कारण मनात भरपूर संशय आणि गुंतागुंत असणार आहे. बिझनेस कमिटमेंट्स आरामात पार पडतील. छोट्या ब्रँड्ससोबत पार्टनरशिप करण्याची ही योग्य वेळ आहे. राजकीय व्यक्तींनी कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घ्यावी. शुभ रंग : अॅक्वा शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना दहीभात दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज पालकांसोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. एखादं नवं नातं तयार होऊ शकतं. तुमचं नशीब आज जोरावर राहील; मात्र मित्रांसोबत असताना आपल्या खासगी गोष्टींबाबत चर्चा करणं टाळा. कॉस्मेटिक्स व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, फार्मासिस्ट, डॉक्टर, संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, वृत्त निवेदक, राजकीय नेते, अभिनेते, कलाकार, गृहिणी आणि लेखकांना आज करिअर संबंधी एखादी चांगली बातमी मिळेल. शुभ रंग : लाल शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरजूंना लेमन राइस दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रवास आणि जनसंपर्क करण्यासाठी आजचा दिवस अतिशय योग्य आहे. तुमची सर्व कामं अगदी वेळेत पूर्ण होतील. गरजूंना चादर दान केल्याने लाभ होईल. मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्ती आणि ब्रोकर्स यांनी आज कागदपत्रांवर सही करणं टाळावं. ब्युरोक्रॅट, वैज्ञानिक, खेळाडू, राजकीय नेते आणि अभिनेत्यांनी आज मनातल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : निळा शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरजूंना चादर किंवा चपला दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींवर विश्वास ठेवायला शिकणं गरजेचं आहे. आज तुमच्या कामाचं भरपूर कौतुक होईल. प्रॉपर्टी किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज उत्तम दिवस. खेळाडू आणि ट्रॅव्हलर्ससाठी आज भाग्याचा दिवस आहे. परीक्षेला जाताना हिरवे वा पिवळे कपडे घातल्यास लाभ होईल. आज गणपती मंदिरात जाऊन आशीर्वाद घेणं उत्तम. शुभ रंग : सी ग्रीन शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया वृद्धाश्रमांमध्ये रोपं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला फसवणूक आणि विश्वासघाताचा सामना करावा लागेल. तुमच्या प्रामाणिकपणाला आज धक्का बसण्याची शक्यता आहे. विश्वासार्हता आणि वचनबद्धता ही तुमची ताकद आहे, इतरांना त्याचा गैरफायदा घेऊ देऊ नका. आज व्यावहारिक राहा आणि भावनांना आवर घाला. आज रोमान्स आणि वचन देण्याची इच्छा मनात असेल; मात्र फसवणूक होण्यापासून सावध राहा. बिझनेसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी इतरांवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. हॉटेलिअर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टर्सना आज त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आजचा दिवस या व्यक्तींसाठी भाग्याचा असेल. खेळामध्ये प्रशिक्षकांचा सल्ला मोलाचा ठरेल. शुभ रंग : निळा शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज इतरांवर प्रमाणापेक्षा अधिक विश्वास ठेवणं टाळा. तसंच तुमच्या भावनिक स्वभावाला आवर घाला. आज काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तुमचे नेतृत्वगुण आणि विश्लेषण कौशल्य हे तुमच्या स्वभावाचे मजबूत घटक आहेत. आज पैशांच्या व्यवहारांमध्ये उत्तम निर्णय घ्याल. कृपया कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. अन्यथा तुमच्या प्रतिमेला धक्का बसेल. प्रेमाच्या बाबतीत कोणत्याही कमिटमेंट्स करणं टाळा, कदाचित तुमचा अपेक्षाभंग वा अपमान होऊ शकतो. आज कोणत्याही कागदपत्रांवर विश्वास ठेवू नका. कोर्ट, थिएटर, टेक्नॉलॉजी, सरकारी कंत्राट, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरिअर, धान्य अशा गोष्टींशी संबंधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. बिझनेस रिलेशन योग्य राहण्यासाठी पार्टनरशिप टाळा. शुभ रंग : नारिंगी आणि निळा शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया पिवळ्या रंगाचं कापड दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भरपूर कामांमध्ये व्यग्र राहाल. तब्येतीकडे लक्ष देण्याची, आणि हेल्दी लाइफस्टाइल स्वीकारण्याची वेळ आता आली आहे. बिझनेसमधले व्यवहार दुपारच्या जेवणानंतर सुरळीत पार पडतील. कौन्सिलिंग, फॅमिली फंक्शन, प्रेझेंटेशन, सरकारी करार किंवा इंटरव्ह्यू अशा गोष्टींना आवर्जून उपस्थित राहा. आज कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे. कृपया प्रवासाचे बेत टाळा. मेडिटेशन करण्यासाठी आणि प्रेमसंबंध अधिक बळकट करण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : सागरी निळा शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना हिरव्या रंगाचे कपडे दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्हाला आयुष्यात नवीन फायद्याच्या संधी समोर येतील. मीडिया, खेळ, बांधकाम, राजकारण, मेडिकल आणि ग्लॅमर या क्षेत्रांमधील व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. शिक्षण आणि क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी आज भरपूर यश मिळवण्याचा आणि आर्थिक फायद्याचा दिवस आहे. बिझनेस वाढवण्यासाठी, सरकारी मदत घेण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. आज पाकिटात लाल रुमाल ठेवणं भाग्याचं ठरेल. शुभ रंग : लाल शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया महिलांना केशरी कापड दान करा. 7 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : एकता कपूर, महेश भूपती, अमृता राव, जॉर्ज क्लूनी, निर्मला देवी
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology

पुढील बातम्या