ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 6 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज थोडी चिडचिड होईल, तसेच काही प्रमाणात खर्च वाढण्याची शक्यता आहे. नवीन संधी चालून आल्यास तिचा खुल्या मनाने स्वीकार करा. कामाबाबत किंवा कोर्ट कचेरीबाबतचं प्रकरण सोडवण्यासाठी सरकारी कार्यालयात ओळख असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची मदत होईल. एखाद्या नातेवाईकामार्फत या व्यक्तीशी भेट घडून येईल. अभिनय आणि हार्डवेअर ट्रेडिंग क्षेत्रातील लोकांना आज महत्त्वाची ऑफर मिळू शकते, ही नक्की स्वीकारा. वैयक्तिक आय़ुष्यात आज असमाधानी रहाल, मात्र संयम बाळगा. चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळा.
शुभ रंग : पिवळा आणि निळा (Yellow and Blue)
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 9
दान : कृपया आश्रमामध्ये पिवळ्या रंगाची फळे दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस हा जबाबदारी घेण्याचा आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, किंवा सुशोभिकरणासाठी पैसे खर्च कराल. तुमच्या मनातील भावना प्रत्यक्षात आणण्यासाठी आज एकदम रोमँटिक असा दिवस आहे. व्यवसायामध्ये केलेल्या कमिटमेंट्स आरामात पार पाडाल. एखाद्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्याची हीच संधी आहे. राजकारणी लोकांनी आज प्रतिस्पर्ध्यांपासून सांभाळून रहावे आणि प्रवास टाळावा. डेलिगेटिंग टाळण्याचा प्रयत्न करा.
शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue)
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2 आणि 6
दान : कृपया गरीबांना पांढऱ्या रंगाची मिठाई दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कोणत्याही क्षेत्रातील कलाकार व्यक्तींसाठी आजचा दिवस अगदी कौतुकाचा आहे. लवकरच एखाद्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. नशीब तुमची चांगली साथ देत आहे, मात्र नात्यांमध्ये गांभीर्य बाळगा. राजकारणी, सरकारी अधिकारी, विद्यार्थी, न्यूज अँकर, गृहिणी, लेखक, डिझायनर्स, डान्सर्स, हॉटेल मालक किंवा हॉटेल व्यवसायातील व्यक्ती इत्यादींना आपल्या व्यवसायासंबंधी एखादी चांगली बातमी मिळेल.
शुभ रंग : लाल (Red)
शुभ दिवस : गुरूवार
शुभ अंक : 3 आणि 1
दान : कृपया गरजूंना कच्ची हळद (Raw turmeric) दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
देशभक्तीची भावना आज तुमच्या मनात राहील. समाजासाठी काहीतरी करण्याचा, किंवा दान करण्याचा विचार तुम्ही कराल. तुमच्या मनातील दयाळूपणा आणि तुमची हुशारी ही तुम्हाला इतरांपासून वेगळं करते. आज अन्नदान केल्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. कंस्ट्रक्शन, मशीनरी, मेटल, सॉफ्टवेअर क्षेत्रातील लोक आणि ब्रोकर्स यांनी आज नवीन करार करणे टाळावे. तुम्ही चांगले पालक असल्याचा दाखला आज द्याल.
शुभ रंग : निळा (Blue)
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : कृपया गरीबांना कपडे आणि अन्न दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
वैयक्तिक जीवनात पूर्णत्व प्राप्त करायचा आजचा दिवस आहे. आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर ठेवा. आज तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल, तसेच बक्षीसही मिळू शकते. शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवलेले पैसे काही काळातच चांगला परतावा देतील. खेळाडू, सिनेदिग्दर्शक, ज्वेलर्स, फायनान्सर्स, ट्रॅव्हलर्स यांसोबतच एक्सपोर्ट व्यवसाय आणि रिटेल बिझनेसमध्ये असलेल्या लोकांसाठी आज उत्तम दिवस. बैठकींमध्ये नशीबाने तुमची साथ द्यावी यासाठी हिरवे कपडे घाला. प्रेयसीला वा प्रियकराला प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस सर्वात चांगला आहे.
शुभ रंग : निळसर हिरवा (Sea Green)
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : कृपया एखाद्या अनाथाश्रमाला हिरवी रोपे दान करा.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्या मनामध्ये केवळ रोमान्स आणि वचनं असतील. आजचा दिवस हा आलेल्या संधीचं सोनं करण्याचा, मान सन्मान मिळवण्याचा आणि ऐशोआरामाचा आहे. पालकांना मुलांची साथ आणि मुलांना पालकांचे शुभाशिर्वाद मिळतील. अर्थात, हरखून जात आपल्या खांद्यावर नको तितक्या जबाबदाऱ्या घेऊ नका. लक्षात घ्या, तुम्ही एकाच वेळी सर्वांना आनंदात नाही ठेऊ शकत. ज्वेलर्स, डॉक्टर्स, जॉकी आणि अभिनेत्यांना आज आपली कौशल्यं दाखवण्याची संधी मिळेल. वडिलांना आपल्या मुलांना भविष्यासाठी मार्गदर्शन करण्याची संधी मिळेल.
शुभ रंग : निळा (Blue)
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया एखाद्या मंदिरात चांदीचे नाणे दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस पैशासंबंधी व्यवहाराचा ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद टाळा. नातेसंबंधांमध्ये तुमच्या प्रामाणिकपणाच्या बदल्यात तुम्हाला विश्वास आणि आदर मिळेल. आजच्या दिवस समोर येणार्या कागदपत्रांवर विश्वास ठेऊ शकता. सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, इंटेरिअर, ग्रेन्स, बिझनेस रिलेशन किंवा शाळा अशा ठिकाणी काम करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. मात्र, आपल्या भावनांना आवर घालणं गरजेचं आहे.
शुभ रंग : केशरी आणि निळा (Orange and Blue)
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : कृपया आज पिवळे कापड दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तब्येतीला जपण्याचा दिवस आहे. व्यापारामध्ये केलेले व्यवहार अगदी यशस्वी ठरतील, मात्र कामाच्या गडबडीत तब्येतीकडे लक्ष देणे टाळू नका. एखादी मुलाखत वा करार आज होणार असेल, तर त्याला नक्की हजेरी लावा. कुटुंबियांसोबत वेळ व्यतित केल्याने आनंदी व्हाल. आज बाहेर खाणे टाळा. आज पैसे आणि प्रेमसंबंध या दोन्हीमध्ये वाढ होताना दिसून येईल.
शुभ रंग : समुद्री निळा (Sea Blue)
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया गायींना हिरवा चारा खाऊ घाला.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
ग्लॅमर आणि मेडिकल इंडस्ट्रीमधील लोकांसाठी आजचा दिवस भलताच फलदायी ठरणार आहे. सोबतच, क्रिएटिव्ह आर्ट्स क्षेत्रातील लोकांसाठी आज खूप काही मिळवण्याचा दिवस आहे. आज अप्रेझल होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी पत वाढावी यासाठी जुन्या मित्रांना वा सहकाऱ्यांना भेटण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आज चांगला दिवस आहे. दिवसाच्या सुरुवातीला लाल रंग परिधान करा. मेटल व्यवसायात असलेल्यांनी उत्तरदायीत्व स्वीकारणे गरजेचे आहे, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात नफा होऊ शकतो.
शुभ रंग : लाल (Red)
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9 आणि 6
दान : कृपया महिलांना केशरी कपडा दान करा.
6 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : मोतीलाल नेहरू, विंदू दारा सिंह, गगन नारंग, अब्दुल गनी लोन
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.