Home /News /astrology /

Numerology : 5 तारखेला जन्मलेल्यांमध्ये असतात हे खास गुण; तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचं भविष्य

Numerology : 5 तारखेला जन्मलेल्यांमध्ये असतात हे खास गुण; तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचं भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 5 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 5 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घेऊ या. तत्पूर्वी 5 नंबरचं वैशिष्ट्यं जाणून घेऊ या. #नंबर 5 : कोणत्याही महिन्याच्या पाच तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा नंबर 5 असतो. 5 हा आकडा बुध ग्रहाशी निगडित आहे. त्यामुळे 5 नंबरशी संबंधित तारखेला जन्मलेल्या व्यक्ती बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. 5 नंबर विविधतेशी निगडित आहे. या जन्मजात क्षमतेमुळे या व्यक्तींना अमर्याद स्वातंत्र्य उपभोगता येतं, ज्याबद्दल बहुतांश व्यक्ती केवळ स्वप्नच पाहू शकतात. मुख्य समस्या ही आहे, की या व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या टॅलेंटनुसार कायम काम मिळतंच असं नाही. त्यामुळे या व्यक्ती आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी करत राहतात. त्यात त्यांचा पेशा अर्थात प्रोफेशनही बदलतं. यापैकी बहुतांश व्यक्तींना प्रवास आवडतो आणि त्या खरोखरच्या धाडसी असतात. कामाचं एखादं ठरावीक क्षेत्र निवडणं त्यांच्यासाठी कठीण असतं. त्याचं कारण ते त्यांच्यासाठी साजेसं नसतं असं नव्हे, तर ते लवकर कंटाळतात आणि त्यांच्या अपेक्षा बदलतात. या व्यक्तींना अनपेक्षित संधी मिळतात. त्यामुळे या व्यक्ती नशीबवान असतात. या व्यक्ती प्रॅक्टिकल निर्णय घेतात आणि त्यांची वृत्ती विश्लेषक असते. या व्यक्ती कर्ज घेण्याबद्दल साशंक असतात; मात्र त्यांच्याकडे पैसे मिळवण्याच्या उत्तमोत्तम कल्पनांना तोटा नसतो. या व्यक्ती रोमँटिक आणि मनाने तरुण असतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि चार्मिंग असतं. आपल्याकडचे पैसे दुप्पट कसे करायचे, हे त्यांना माहिती असतं. कारण ते जोखीम पत्करण्यास कधीही तयार असतात. आयुष्याकडे पाहण्याच्या त्यांच्या बोल्ड दृष्टिकोनामुळे अन्य व्यक्ती दुखावल्या जातात. त्यामुळे या व्यक्तींनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. आयुष्याचं सौंदर्य वाढण्यासाठी या व्यक्तींनी कायम हिरव्या आणि फिकट रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत. आयुष्याकडून त्यांना हव्या असलेल्या बहुतांश सर्व गोष्टी त्यांना मिळतात; मात्र तरीही त्यांनी छोटी छोटी अपयशं पचवायला शिकलं पाहिजे. अभिनय, प्रवास, हवाई दल, लष्कर, पोलिस, लोकप्रिय खेळ, राजकारण, जाहिरात, डॉक्टरी आदी क्षेत्रं या व्यक्तींसाठी लकी ठरतात. लकी रंग : हिरवा, पांढरा लकी दिवस : बुधवार लकी आकडे : 5, 6 दान : गरिबांना हिरव्या रंगाचे कपडे किंवा हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात. - या व्यक्तींनी मद्य, नॉन-व्हेज आहार, तंबाखू या गोष्टी टाळाव्यात. - या व्यक्तींनी पैसा कमावण्यासाठी शॉर्ट-कट्स वापरणं टाळावं. - या व्यक्तींनी प्रत्येक बुधवारी श्री गणेशाच्या मंदिरात जावं. ...............अंकशास्त्रानुसार 5 मे 2022 रोजीचं भविष्य #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) करिअर ग्रोथ खूप चांगली होईल आणि बिझनेस कमिटमेंट्स पूर्ण होतील, असे संकेत आहेत. आजचा दिवस नेत्यांना लोकप्रियता वाढण्याचा आणि जागतिक पातळीवर दखल घेतली जाण्याचा आहे. भावनाही नशीब आणि अनुकूलतेचा आनंद घेतील. आजचा दिवस चेहऱ्यावर हसू खुलण्याचा आहे. गिफ्ट्स, प्रपोझल्स, बक्षिसं आणि प्रिय व्यक्तींचा पाठिंबा मिळण्याचा आजचा दिवस आहे. शुभ रंग : Green & Yellow शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1, 5 दान : गरिबांना केळी दान करावीत. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पुरुषांना आज त्यांच्या टीम-मेंबर्सचं सहकार्य मिळेल. महिलांना आज त्यांच्या समाजातल्या प्रतिमेचा आनंद घेता येईल. स्टॉक मार्केट रिटर्न्सला उशीर होईल. पालकांना त्यांच्या मुलांबद्दलची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आताचा काळ योग्य आहे. रोमान्समुळे कपल्सची रिलेशनशिप मजबूत होईल. महत्त्वाच्या मीटिंग्ज किंवा इंटरव्ह्यूमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. जुन्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करा. पुढे मदत मागण्यासाठी उपयोग होईल. दिवसाच्या उत्तरार्धात भावनांवर नियंत्रण ठेवायला विसरू नका. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2, 6 दान : गरिबांना मीठ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणच्या अन्य व्यक्तींचं तुमच्या निर्णयाबद्दलचं मत प्रतिकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहावं. संवाद साधला नाहीत, तर आज रिलेशनशिप धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आज मूक राहू नका. क्रिएटिव्ह व्यक्तींना गुंतवणूक आणि परताव्यासाठी उत्तम काळ. क्रिएटिव्ह क्लासेसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास आज यशस्वीरीत्या करणं शक्य आहे. शिक्षणज्ज्ञ, प्रशिक्षक, सरकारी अधिकारी, संगीतकार, राजकीय नेते आदींना आज प्रसिद्धी मिळेल. आज दुपारी जेवणानंतर बिझनेसमन क्लायंट्सना भेटतील आणि डील्स पक्की होतील. शुभ रंग : Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : आश्रमात ब्राउन राइस दान करावा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैशांशी संबंधित प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा दिवस लकी आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजीजवर कृती सुरू ठेवा आणि नशिबाला त्याची खेळी खेळू द्या. आजचा दिवस बिझी आणि उद्दिष्टहीन वाटत असला, तरी आज घराकडे दुर्लक्ष करून बिझनेसच्या कामासाठी घराबाहेर पडलं पाहिजे. तरुण कपल्स आपल्या प्रेमभावना व्यक्त करतील. नॉन-व्हेज टाळावं आणि व्यायाम करावा. आयुष्यात तुम्हाला बराच सकारात्मक बदल पाहायला मिळेल. तुम्ही तुमचं उद्दिष्ट कागदावर लिहिलं असेल आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली असेल, तर आताचा काळ उद्दिष्टपूर्तीचा असेल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : सॉल्टेड, ग्रीन व्हेज फूड गरिबांना दान करावं. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्हाला चांगल्या संधींचं वरदान लाभलं आहे आणि चांगले टीम मेंबर्स मिळाले आहेत. रिलेशनशिपचा आनंद घेण्यासाठी उत्तम दिवस. कारण रोमँटिक वातावरण आहे. आज एखादा आरामदायी छोटा प्रवास कराल. एखाद्या स्पेशल व्यक्तीशी भेट होण्याची खूप जास्त शक्यता आहे. आज तुम्हाला छोटी-मोठी जी गोष्ट वाटेल, ती खरेदी करा. सर्व गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल ठरतील. स्टॉक किंवा प्रॉपर्टीमध्ये नक्की गुंतवणूक करा. आव्हानं स्वीकारा, सार्वजनिक बैठकांना उपस्थित राहा, स्पर्धेत उतरा, बिझनेस रिस्क घ्या. प्रमोशन आणि अप्रैझलच्या मंजुरीसाठी जाण्याचा दिवस. तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती मिळेल आणि करिअरमध्ये स्थैर्यही. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : हिरव्या वनस्पती दान कराव्यात. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घरून काम करत असलात, तर आज समृद्धतेने दिवस एंजॉय करा. आज मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज सर्व उद्दिष्टांची पूर्ती होईल. त्यामुळे एखाद्या विजेत्यासारखी तुमची प्रतिमा तयार होईल. खेळाडूंना मॅचेसमध्ये विजय मिळेल. गृहिणींना कुटुंबीयांकडून मिळत असलेला आदर आणि प्रेम यामुळे परमेश्वराप्रति कृतज्ञता वाटेल. सरकारी अधिकाऱ्यांना नवं प्रोफाइल आणि प्रमोशन मिळेल. कलाकार जनतेवर प्रभाव टाकू शकतील. प्रॉपर्टी डील्स सहज हाताळली जातील. लग्नाची प्रपोझल्स वाटेवर आहेत. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6, 2 दान : अनाथाश्रमातल्या मुलांना दूध दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आरोग्य आणि लाइफस्टाइलबद्दल दक्ष राहा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रेममय वातावरणामुळे आज तुमची स्वप्नं पूर्ण होतील. आज पिवळे तांदूळ दान करायला विसरू नका. मोठ्या ब्रँड्सऐवजी छोट्या ब्रँड्ससोबत कोलॅबोरेशन करावं. आज जे निर्णय घ्याल, त्यांचा आर्थिकदृष्ट्या फेरआढावा घ्यावा लागेल. कारण आज तुमच्या ऑडिटर्सवर विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही. कायद्याच्या प्रकरणांत जिंकू शकाल; मात्र सेटलमेंटसाठी पैसे लागतील. उदारपणा जागृत ठेवा आणि शिस्तबद्ध जीवनशैली राखा. तुमचा आत्मविश्वास आणि ज्ञान मॅग्नेटिक आहे. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : गरिबांना पिवळी फळं दान करावीत. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस खूप कष्टांचा आहे; मात्र दिवसाच्या शेवटी यश मिळेल. आज कोणत्याही संकटातून बाहेर येण्यासाठी आत्मविश्वास तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. गायी-गुरांना खाऊ-पिऊ घालण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कपल्समधले प्रेमाचे नातेसंबंध हेल्दी राहतील. डॉक्टर्स, मॅन्युफॅक्चरर्सना आर्थिक लाभ होतील. मशिनरी खरेदी करण्यासाठी आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ताणामुळे शारीरिक फिटनेसवर परिणाम होईल. त्यामुळे झोपण्यापूर्वी योगासनं करावीत. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही पब्लिक फिगक असलात, तर यश आणि समाधान या दोन्ही गोष्टी मिळतील. आज तरुणांना त्यांच्या पार्टनर्सना प्रभावित करण्यासाठी चांगला दिवस आहे. क्रिएटिव्ह तरुणांनी त्यांच्या प्लॅन्सवर कृती करावी. सार्वजनिक भाषण, सोहळ्याला उपस्थित राहणं, पार्टी आयोजित करणं, ज्वेलरी खरेदी करणं, स्पर्धा परीक्षा देणं आदींसाठी आजचा दिवस चांगला आहे. अभिनेते, रिटेलर्स, रेस्तराँचालक, डिझायनर्स, बिल्डर्स, ट्रेनर्स, आयटी प्रोफेशनल्स, डॉक्टर्स आदींना पैसे आणि वेळाच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल. शुभ रंग : ब्राउन शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : लहान मुलीला लाल हातरुमाल दान करावा. 5 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : ग्यानी झैलसिंग, कृष्णा पूनिया, गुरू अमर दास, मनोहरलाल खट्टर, गुलशनकुमार
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या