ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 4 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्ही टीमलीडर आहात; मात्र आज तुम्हाला एकट्याने नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे हे लक्षात घ्या. परिस्थितीनुसार तुम्हाला लवचीक राहावं लागणार आहे. कायदेशीर प्रकरणं, घराचं रिनोव्हेशन, डिजिटल मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट, मशीन खरेदी आणि शेतजमीन खरेदी अशा गोष्टींमध्ये फायदा होईल. खेळामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मशिनरी, उत्पादन, कॉस्मेटिक्स, हस्तकला, बांधकाम, शेती, साहित्य, औषधं आणि फायनान्स क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस आहे. लहान मुलांचं शिक्षक वा प्रशिक्षकांकडून कौतुक होईल. आज वाणी मधुर ठेवल्यास उत्तम.
शुभ रंग : Blue and Yellow
शुभ दिवस : शुक्रवार आणि रविवार
शुभ अंक : 3
दान : कृपया मंदिरात सूर्यफुलाच्या बिया दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्या मनातली भावना मनातच ठेवा. एखादी महत्त्वाची वा गोपनीय गोष्ट ई-मेल करणार असाल तर खबरदारी घ्या. कायदेशीर कमिटमेंट आरामात पूर्ण होतील. तुमच्या ओळखीतली एखादी व्यक्ती तुमचा स्वाभिमान दुखावू शकते, तेव्हा काळजी घ्या. महिलांनी वरिष्ठांशी जुळवून घेणं गरजेचं आहे. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. एक्सपोर्ट-इम्पोर्ट, केमिकल, डॉक्टर, बांधकाम व्यवसाय आणि राजकारण या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल.
शुभ रंग : Sky Blue and White
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 6
दान : कृपया पक्षी किंवा गायी-गुरांना पाणी द्या.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्या मनात गोंधळाची परिस्थिती असेल; मात्र घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहा. सरकारी काम किंवा कंत्राट सुरू करण्यासाठी उत्तम दिवस. राजकीय व्यक्तींना आपली हुशारी आणि कौशल्यं दाखवण्याची मोठी संधी मिळेल. कामाच्या शोधात असलात, तर चांगली बातमी मिळेल. तुमच्या बोलण्याची आणि हुशारीची लोकांवर छाप पडेल. राजकारण, संगीत, इलेक्ट्रॉनिक्स, मीडिया, ऑटोमोबाइल बिझनेस आणि लेखन क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. प्रेमात असलेल्यांनी दिलखुलासपणे आपल्या मनातली भावना व्यक्त करावी. सरकारी अधिकाऱ्यांना डील्समध्ये फायदा होईल. आज पिवळे कपडे घातल्यास उत्तम. आपल्या गुरूचं नामस्मरण करायला विसरू नका.
शुभ रंग : Blue and Orange
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3 आणि 1
दान : कृपया महिला मदतनीस व्यक्तीला केशर दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस भरपूर यश मिळवण्याचा आहे. त्यामुळे तुमचं ध्येय गाठण्यासाठी भरपूर प्रयत्न करा. शेती, उत्पादन, हस्तकला, दिग्दर्शन, कोचिंग, खेळाचं साहित्य, बँकिंग आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांतल्या व्यक्तींना आर्थिक फायदा संभवतो. आज शिस्त आणि परिपूर्णतेवर लक्ष ठेवा. आज केलेल्या कामाचं भविष्यात फळ मिळेल हे लक्षात ठेवा. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी तणावाचा दिवस. मेडिकल आणि शेती क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. विद्यार्थ्यांना ग्रुप स्टडी केल्याने फायदा होईल. आज कृपया मांसाहार टाळा.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : शनिवार
शुभ अंक : 9
दान : कृपया भिक्षेकऱ्यांना कच्ची केळी दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या बोलण्यामुळे एखाद्याचं मन दुःखावणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आजूबाजूच्या सर्वांवर छाप पडेल. तुमच्या कामासाठी प्रशंसा आणि फायदे मिळवण्याचा आजचा दिवस आहे. एखादा मित्र वा नातेवाईक लवकरच तुमची मदत मागेल. त्याला टाळू नका. बँकिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं नशीब जोरावर राहील. सेल्स आणि खेळातल्या व्यक्तींनी जलद कामं केल्यास फायदा होईल. विद्यार्थ्यांनाही मोठं यश मिळेल.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : कृपया हिरव्या पालेभाज्या दान करा.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या मनात ज्या योजना असतील, त्या अगदी तुमच्या इच्छेप्रमाणे पार पडतील. तुमच्या मेहनतीमुळे इतर अनेकांना यश मिळेल. प्रपोज करण्यासाठी, कमिटमेंट करण्यासाठी, ऐशोआरामासाठी, प्रवासासाठी, प्रेझेंटेशन देण्यासाठी आणि यश साजरं करण्यासाठी उत्तम दिवस. आज नवीन संधीचं सोनं कराल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस आहे. फॅक्टरी सुरू करण्यासाठी जागा पाहत असाल तर आज चांगला पर्याय समोर येईल. अभिनेते आणि माध्यम क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. व्हिसाची वाट पाहत असाल तर चांगली बातमी समजेल.
शुभ रंग : Teal
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया गरिबांना पांढरी मिठाई दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कृपया इतरांसाठी अती विश्वासार्ह बनू नका. अशाने लोक तुम्हाला गृहित धरण्यास सुरुवात करतील. खेळ, कोर्ट-कचेरी, बिझनेस डील, मुलाखती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मोठं यश मिळू शकतं. यासाठी तुमच्या वरिष्ठांचा आशीर्वाद फायद्याचा ठरेल. आज रागावर नियंत्रण ठेवणं आणि गुरू मंत्राचा जप करणं आवश्यक आहे. वाणी मधुर ठेवलीत, तर सर्व क्षेत्रांत यश मिळेल. तंबाखू किंवा मद्यापासून दूर राहा. आज मांसाहार टाळणं उत्तम.
शुभ रंग : Orange
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीचे नेहमीच योग्य भान असतं. त्यामुळे सध्या मिळालेल्या यशात समाधान माना आणि तक्रार करणं टाळा. मोठं यश मिळवण्यासाठी आणखी मेहनत करण्याची गरज आहे. दिवसाच्या शेवटी तुमच्या कामाबद्दल कौतुक केलं जाईल. आज ज्ञानार्जनात भरपूर वेळ व्यतीत कराल. डॉक्टरांना सेवेसाठी पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना संध्याकाळपर्यंत आर्थिक फायदा होईल. आज व्यायाम आणि दानधर्म करणं फायद्याचं ठरेल. तसंच सकाळी उठल्याबरोबर चादरीची घडी घालणंदेखील फायद्याचं ठरेल.
शुभ रंग : Sea blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया एखाद्या भिक्षेकऱ्याला लिंबूवर्गीय फळं दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचे स्पर्धक तुमचा मत्सर करत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आजचा दिवस भरपूर कौतुकाचा आणि प्रगतीचा आहे. अचानक मोठा धनलाभ वा यश मिळू शकतं. सरकारी ऑर्डर घेण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी कागदपत्रांशी संबंधित कामं आज करून घ्यावीत. हीलर्स, पब्लिक स्पीकर्स, शेफ, मीडिया क्षेत्रातील व्यक्ती, अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेल व्यवसायातल्या व्यक्तींसाठी आज अगदी भाग्याचा दिवस आहे.
शुभ रंग : Red and Orange
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 3 आणि 9
दान : कृपया घरगुती मदतनीस महिलेला लाल बांगड्या दान करा.
4 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अनिल अंबानी, कृष्णराज वाडियार चतुर्थ, एस. बालसुब्रह्मण्यम, नूतन, अशोक सराफ
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.