Home /News /astrology /

Numerology : आज गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल; जन्मतारखेनुसार तुमचं भविष्य पाहा

Numerology : आज गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल; जन्मतारखेनुसार तुमचं भविष्य पाहा

Numerology

Numerology

Numerology 02 June 2022 : अंकशास्त्रानुसार आज तुमचा आर्थिक फायदा नक्की होईल.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस अगदी उत्साहाचा राहणार आहे. कित्येक संधी तुम्हाला चालून येतील. आज तुमच्या मनात येईल ते नक्की करा. कारण चंद्र आणि शुक्र दोघांची साथ तुम्हाला असणार आहे. आज तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण कराल. आर्थिक फायदे संभवतात. ऑफिसमध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्याल. एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी प्रवास करावा लागेल. क्लायंट आणि नातेवाईकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला डिप्लोमॅटिक राहावं लागेल. नव्या गुंतवणुकीसाठी तुमची हुशारी कामी येईल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया आज दही दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा भावनिक, रोमँटिक आणि ऐशोआरामाचा आहे. आज देवाचे आणि घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे आभार मानाल. भरपूर लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि शॉपिंगसाठी आजचा दिवस उत्तम आहे. एखादं नवं कंत्राट घेणं फायद्याचं ठरू शकतं. आज तुमच्या बोलण्यातला मुत्सद्दीपणा तुमच्या कामी येईल. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत भावनिक वेळ व्यतीत करण्यासाठी आज चांगली संधी आहे. तुमची स्वप्नं सत्यात येण्यासाठी काही वेळ लागेल, त्यामुळे आज थोडा आराम करा. आज पांढरे कपडे घातल्याने नशीब उजळेल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना किंवा गायींना दूध द्या. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) एखाद्या व्यक्तीसोबत वाद झाला असेल, तर तो आज मिटवा. स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी आज चांगला दिवस आहे. विनाकारण आडून आडून बोलण्यापेक्षा तुमच्या मनात जे आहे ते खरं खरं बोलल्याने फायदा होईल. तुमच्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करून त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस. शिक्षक, पब्लिक स्पीकर, डान्सर, कुक, डिझायनर, अभिनेते, बँकर, आणि मार्केटिंग, ऑडिटिंग व सेल्स या क्षेत्रांतल्या व्यक्तींना आज आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. अर्थ आणि योग क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Peach शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरात हळद दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मित्र किंवा पार्टनरसोबत वेळ व्यतीत कराल. तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवण्याची चांगली संधी मिळेल. भविष्याबाबत नियोजन करण्यासाठी आज बराच वेळ जाईल. क्लायंटसोबतच्या मीटिंग्ज वा प्रेझेंटेशन उत्तमरीत्या पार पडेल. आजच्या दिवसाचा बराचसा वेळ पैसे कमावण्याचं नियोजन करण्यात, व्यायाम करण्यात, ऑडिटिंग, कौन्सिलिंग आणि मार्केटिंग करण्यात व्यतीत केल्यास उत्तम. उत्पादन, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स, हीलिंग, अभिनय, खेळ वा राजकारण या क्षेत्रांतल्या व्यक्तींनी नवीन पार्टनरशिपची संधी सोडू नये. वैयक्तिक नातेसंबंध चांगले राहतील. आज केशरयुक्त मिठाई खाणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस भाग्याचा आहे. आज केलेली गुंतवणूक भरपूर फायदा देईल. वैयक्तिक गोष्टी स्वतः सांभाळण्याची मानसिक ताकद तुम्हाला मिळेल. आज मुलाखती वा प्रपोझल्स टाळू नका. महत्त्वाच्या बैठकीसाठी अ‍ॅक्वा रंगाचे कपडे घालणं उत्तम. प्रॉपर्टीसंबंधी निर्णयही फायद्याचे ठरतील. ज्यांना फिरायला आवडतं अशा व्यक्तींना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. आज तुमच्या जीवनशैलीत नीटनेटकेपणा असणं गरजेचं आहे. आज तुमच्या प्रोफेशनल किंवा पर्सनल जोडीदाराचा विश्वास संपादन कराल. एखादा जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे. शुभ रंग :Aqua and Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचे कुटुंबीय आणि नातेवाईक सर्वांमध्ये तुम्ही पहिल्यापासूनच अगदी लाडके आहात. आज सर्वांकडून तुम्हाला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळेल. आज तुमची कर्तव्यं पार पाडण्याचा आणि भरपूर एंजॉय करण्याचा दिवस आहे. तुम्हाला आज भरपूर संधी मिळतील. कुटुंबीयांसोबतच मित्र आणि सहकाऱ्यांचाही भरपूर पाठिंबा राहील. ऑफिसमध्ये अप्रैझल किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. बिझनेससंबंधी जो काही निर्णय घ्याल तो योग्य ठरेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. आज पार्टनरसोबत वेळ व्यतीत कराल. रोमँटिक डेट प्लॅन केल्याने नातेसंबंध बळकट होतील. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना वा लहान मुलांना साखर दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही नेहमीच उत्साह भरलेले असता. आज हाच उत्साह तुमच्या भरपूर कामी येईल. थोडासा भावनिक गोंधळ राहील; मात्र तो लवकरच दूरही होईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. आज प्रवासाचा आणि बिझनेस टार्गेट पूर्ण करण्याचा दिवस आहे. हीलिंग, लॉ प्रॅक्टिस, मेडिकल, मीडिया, एक्सपोर्ट-इम्पोर्ट आणि राजकारण या क्षेत्रांमधल्या महिलांसाठी आज भाग्याचा दिवस आहे. विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला सल्ला स्वीकारा. आर्थिक बाबतीत सीएची मदत घ्या. लग्नासाठी स्थळ आल्यास ते स्वीकारण्याबाबत विचार करा. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास फायदा होईल. शुभ रंग : Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना हिरवे मसाले दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस तुमची सर्व स्वप्नं सत्यात उतरवण्याचा आहे. बिझनेससंबंधी तुमच्या मनात ज्या काही योजना असतील, त्या आज राबवा. कायदेशीर प्रकरणं पैशांच्या मदतीने सुटतील. बिझनेस डीलसंबंधी बोलणी करताना लवचिक राहून तुमचा अहंकार बाजूला ठेवल्यास उत्तम. तुमच्या विनोदी स्वभावाची जोडीदारावर छाप पडेल. विद्यार्थी आणि खेळाडूंनी देवाचे आभार मानावेत तसंच दानधर्म करावा. आजचा दिवस पैशांचे व्यवहार करण्यात जाईल. दिवसाच्या शेवटी समाधान वाटेल. आज तब्येत सांभाळण्यासाठी मांसाहार टाळा. एखाद्या वृद्धाश्रमात दान केल्यास उत्तम. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना तेल दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा चंचल स्वभाव आज थोडा नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. नवीन ऑफर स्वीकारणं, नव्या ठिकाणी राहायला जाणं, नवी नाती जोडणं, नवं घर घेणं किंवा मुलाखतीला जाण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी खुल्या मनाने आपल्या जोडीदाराला प्रपोज करावं. बिझनेस डील्स आरामात पार पडतील. राजकारण, मीडिया, फायनान्स किंवा शिक्षण क्षेत्रांतल्या व्यक्तींना भरपूर फायदा होईल. सरकारी अधिकाऱ्यांना चौकशांना सामोरं जावं लागू शकते, तेव्हा प्रामाणिकपणा दाखवून आपल्या वरिष्ठांवर छाप पाडा. डिझायनिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी मुलाखत वा स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करावा. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. बिझनेसमध्ये विरुद्धलिंगी व्यक्तीवर टाकलेला विश्वास फायद्याचा ठरेल. शुभ रंग : Brown शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया लहान मुलांना निळं पेन दान करा. 2 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सोनाक्षी सिन्हा, नितीश भारद्वाज, मणिरत्नम, इलैयाराजा, सौंदर्यराजन
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology

पुढील बातम्या