Home /News /astrology /

Numerology : महिलांसाठी भाग्याचा आहे आजचा दिवस; जन्मतारखेनुसार पाहा अंकशास्त्र

Numerology : महिलांसाठी भाग्याचा आहे आजचा दिवस; जन्मतारखेनुसार पाहा अंकशास्त्र

Numerology 02 July 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कोणत्याही आव्हानावर मात करून तुम्ही यश मिळवाल. महिलांनी कुटुंबातलं सौख्य कायम ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या चुकांकडे दुर्लक्ष करावं. आज तुमचा दिवस आहे, त्यामुळे स्वतःच्या अटींवर काम करा. तुम्हाला भरपूर आत्मविश्वास असेल; मात्र नातेसंबंधांमध्ये विश्वास मिळवणं थोडं अवघड जाईल. आज यश मिळवण्यासाठी थोडं डिप्लोमॅटिक राहण्याची गरज आहे. क्लायंट किंवा ग्राहकासोबत लाँग टर्म रिलेशनशिप प्रस्थापित करण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Beige शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया आज पिवळ्या डाळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज घरून काम करणं टाळा. तुमच्या दयाळू स्वभावामुळे भरपूर संधी उपलब्ध होतील. आज दिवसाची सुरुवात चंद्रदेवाचा आशीर्वाद घेऊन करा. पांढरे कपडे घातल्यास फायदा होईल. जनसंवाद आणि शॉपिंग करण्यासाठी उत्तम दिवस. विवाहस्थळ पाहण्यासाठी वा पार्टनरशिप सुरू करण्यासाठी चांगला दिवस. आज बोलताना डिप्लोमॅटिक राहणं फायद्याचं ठरेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत वेळ व्यतीत करणं उत्तम. तुमची स्वप्नं सत्यात उतरण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. त्यामुळे दिवसाच्या शेवटी जास्त ताण न घेता, थोडा आराम करा. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सकाळी कपाळावर चंदनाचा टिळा लावून दिवसाची सुरुवात करा. एखाद्या मध्यस्थाच्या मदतीने जुने वाद मिटतील. मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. त्यांच्यावर छाप पाडण्याची संधी मिळेल. कौन्सेलिंग, खेळ, शिक्षण, जनसंवाद, डान्स, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय, बँकिंग, मार्केटिंग किंवा ऑडिटिंग क्षेत्रांमध्ये असलेल्या व्यक्तींना आपली पर्सनॅलिटी दाखवण्याची संधी मिळेल. फायनान्स आणि योग क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. कन्सल्टन्सी फर्म्ससाठी फायद्याचा दिवस. शुभ रंग : Peach शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरात पिवळी मोहरी दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भरपूर यश आणि समाधान मिळवण्याचा दिवस आहे. तुमची मजबूत विचारशक्ती ही तुमची जमेची बाजू आहे. क्लायंट मीटिंग किंवा प्रेझेंटेशन उत्तम होईल. त्याचं कौतुकही होईल. आजचा बराचसा वेळ पैसे कमावण्याच्या आयडिया, व्यायाम, ऑडिटिंग, कौन्सिलिंग आणि मार्केटिंगसाठी व्यतीत करा. उत्पादन, मशीनरी, इलेक्ट्रॉनिक्स, हीलिंग, अभिनय, खेळ किंवा राजकारण या क्षेत्रांतील व्यक्तींनी नवीन पार्टनरशिप सुरू करणं फायद्याचं ठरेल. वैयक्तिक नातेसंबंध चांगले राहतील. आज डाळिंब खाणं फायद्याचं ठरेल. तसंच, स्वतःसाठीदेखील थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज गणपतीची पूजा करून आशीर्वाद घेणं फायद्याचं ठरेल. आज केलेली गुंतवणूक भरपूर परतावा देईल. कामाच्या ठिकाणी होत असलेली हालचाल ही तुमच्या यशाची किल्ली असेल. त्यामुळे बैठकांसाठी बाहेर पडा. तुमच्या डॉमिनेटिंग स्वभावावर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मीटिंगला जाताना Aqua रंगाचे कपडे घातल्यास फायदा होईल. प्रवासाची आवड असणाऱ्यांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या आयुष्यातल्या जोडीदाराचा विश्वास संपादन कराल. त्यामुळे अगदी आनंदात असाल. नवीन मित्रांना भेटण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यावर भरभरून प्रेम करतात. कुटुंबातल्या व्यक्ती, मित्र, नातेवाईक, मुलं आणि अगदी बिझनेस पार्टनर या सर्वांच्या बाबतीत तुम्ही अगदी नशीबवान आहात. त्यामुळे या सर्वांना केलेल्या कमिटमेंट्स पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्या दारावर कित्येक नव्या संधी चालून येतील. मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल. तुमची आवडती अ‍ॅक्टिव्हिटी कराल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल. ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा अप्रैझल होण्याची शक्यता आहे. रोमँटिक डेटवर जाल. त्यामुळे नातेसंबंध अधिक बळकट होतील. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात चांदीचे नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस प्रवासाचा आणि बिझनेस टार्गेट पूर्ण करण्याचा आहे. वैयक्तिक आयुष्यात गोंधळावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मॉडेलिंग, राजकारण, हीलिंग, लॉ, मेडिकल, मीडिया, एक्सपोर्ट-इम्पोर्ट आणि आयटी या क्षेत्रांतल्या महिलांसाठी भाग्याचा दिवस. तुमची जबाबदारी वाढवण्याचं टाळा; मात्र प्रॉपर्टीमध्ये गुंतवणू करू शकता. तुमच्या बॉसने दिलेला सल्ला स्वीकारण्याचा प्रयत्न करा. बिझनेसमध्ये तुमच्या ऑडिटरचा सल्ला स्वीकारा. सहलीचे बेत पुढे जाऊ शकतात. विवाहासाठी येणाऱ्या प्रस्तावांवर विचार करू शकता. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास फायदा होईल. शुभ रंग : Yellow and Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना किंवा गायींना केळी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस अगदी ऐशोआरामाचा आहे; मात्र त्यामुळे आळशीपणा करू नका. आज भरपूर संधी चालून येतील. ओळखीतून तडजोड करून कायदेविषयक प्रकरणं निकालात काढाल. बिझनेस डील पूर्ण करण्यासाठी वक्तशीरपणा आणि मेहनत करावी लागेल. तुमचा अहंकार बाजूला ठेवल्यास उत्तम. तुमचा प्रामाणिकपणा आणि निरासगतेची छाप जोडीदारावर पडेल. विद्यार्थी आणि खेळाडूंनी दानधर्म करणं गरजेचं आहे. आजचा दिवस पैशांचे व्यवहार करण्यात जाईल. त्यामुळे दिवसाच्या शेवटी समाधानी असाल. आज तब्येत जपण्यासाठी मांसाहार टाळा. वृद्धाश्रमात जाऊन सेवा करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस तुमचा आहे. नवीन नातेसंबंधांची सुरुवात, मुलाखत देणं, नवीन घर खरेदी करणं, पार्टी आणि शॉपिंग या सर्व गोष्टी फायद्याच्या ठरतील. शिक्षण, औषध, अभिनय, हिरे आणि ज्वेलरी, तसंच स्टॉक मार्केट या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आज भाग्याचा दिवस आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आज आपल्या जोडीदारास प्रपोज करणं उत्तम. राजकारण, मीडिया, फायनान्स किंवा शिक्षण क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची भरभराट होईल. आज बिझनेस व्यवहार आरामात पार पडतील. सरकारी अधिकाऱ्यांना काही कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रामाणिक राहून आपल्या वरिष्ठांवर छाप पाडणं उत्तम ठरेल. डिझायनिंग इंडस्ट्रीमधल्या व्यक्तींनी मुलाखती वा स्पर्धा परीक्षा टाळू नयेत. पालकांना आज आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांनी जोडीदारावर विश्वास ठेवावा आणि अधिक प्रश्न विचारणं टाळावं. शुभ रंग : Brown शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गायी-गुरांना ब्राउन ब्रेड दान करा. 2 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : मोहम्मद अजीज, गौतमी, रझा मुराद, लिंडसे लोहान, अनुपमा वर्मा
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Zodiac signs

पुढील बातम्या