ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 1 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस अगदी उत्साहाचा राहणार आहे. समोर येणारं कोणतंही आव्हान तुम्ही आत्मविश्वासाने स्वीकाराल. बिझनेसमध्ये रिस्क घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपली मार्केटिंग स्किल्स दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या इतरांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे कामं वेळेत पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यताही आहे. तुमच्या यशामुळे अनेक व्यक्तींना तुमचा हेवा वाटू शकतो. यातून होणारी हानी टाळण्यासाठी संध्याकाळी दुधाच्या पाण्याने अंघोळ करा. गायिकांची आज भरपूर प्रशंसा होईल. खेळाडूंना आज मोठं यश मिळेल. तसंच खेळातली एखादी मोठी व्यक्तीही भेटू शकते. आज सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला विसरू नका. तसंच गरिबांना पिवळ्या रंगाची मिठाई दान करा.
शुभ रंग : पिवळा आणि निळा (Yellow and Blue)
शुभ दिवस : रविवार आणि सोमवार
शुभ अंक : 1
दान : कृपया सूर्यफुलाचं तेल दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज मोठ्या प्रमाणात मूड स्विंग होतील, त्यामुळे एकूणच मनःस्थिती खराब राहील. प्रेमात असलेल्यांना आपलं नातं आणखी पुढे नेण्यास किंवा मनातल्या भावना व्यक्त करण्यास अडचण येईल. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये बरीच ओढाताण होईल. मोठे आर्थिक निर्णय घेणं आज टाळा. लिक्विड्स, इलेक्ट्रॉनिक, औषधं, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, सौर ऊर्जा, शेती आणि केमिकल्स अशा क्षेत्रांमध्ये असणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात नफा संभवतो. आज मुलांसोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस आहे.
शुभ रंग : निळा आणि पांढरा
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2
दान : कृपया भिक्षेकऱ्यांना आणि गायींना पिण्याचं पाणी द्या.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुमच्यातलं कलाकुसरीचं कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या कष्टांची दखल घेतली जाईल. या वेळी तुमच्या मेंटॉरचे आभार माना. विद्यार्थ्यांना आज भरपूर यश मिळेल. आज लेखी स्वरूपाच्या संवादातून आपल्या जोडीदारावर छाप पाडाल. तुमच्या जोडीदाराला लग्नाची मागणी घालण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. खेळाडूंना जुन्या प्रशिक्षकाच्या मदतीने यश मिळेल. तुम्ही राजकीय नेते वा सरकारी अधिकारी असाल, तर लोकांवर तुमची छाप पडेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी आणि मुलाखतीपूर्वी गुरूमंत्राचा जप करणं फायद्याचं ठरेल. महिलांनी संध्याकाळी गुरूसाठी दिवा लावणं शुभ ठरेल.
शुभ रंग : केशरी
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3 आणि 1
दान : कृपया अनाथाश्रमात केशरी रंगाचं पेन वा पेन्सिल दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
टेक्निकल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अगदी फायद्याचा आहे. सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर अशा दोन्ही क्षेत्रांतल्या व्यक्तींना नव्या संधी उपलब्ध होतील. आज कामाचं नियोजन अगदी उत्तम पद्धतीने केल्यामुळे सगळी कामं सुरळीत पार पडतील. सौर ऊर्जा, चित्रपट दिग्दर्शन, नाट्य कलाकार, उत्पादक आणि स्वयंपाकासंबंधी कामं करणाऱ्या व्यक्तींनी आज मशीन्सबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये बोलणं सुरू ठेवल्यास रोमँटिक वळण येण्याची शक्यता आहे. तुमचा छंद जोपासण्यात थोडा वेळ व्यतीत कराल. आज लिंबूवर्गीय फळं खाणं फायद्याचं ठरेल.
शुभ रंग : निळा
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : कृपया गरिबांना हिरवं धान्य दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आयुष्यात कोणताही तणाव नको असेल, तर नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा. आजचा दिवस तुमचे नेतृत्वगुण दाखवण्याचा आहे. तुम्हाला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नका. तुमच्या सहकाऱ्यांशी कोणतंही सीक्रेट शेअर करू नका. मित्रांशी आणि नातेवाईकांशी बोलताना नम्रपणा दाखवा. ग्लॅमर, मीडिया, फॉरीन कमोडिटीज आणि खेळातल्या व्यक्तींना विशेष अप्रैझल मिळेल. पुरुषांना हिरवे आणि महिलांना निळे कपडे घातल्याचा फायदा होईल. कृपया आज प्रवास टाळा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुमच्या हिताचे ठरतील. तसंच खेळामध्ये मोठं यश मिळेल. आज आहार साधा ठेवा.
शुभ रंग : हिरवा
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : कृपया लहान मुलांना रोपं दान करा.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या समोर येणारी आव्हानं आणि संधी खुल्या मनाने स्वीकारा. आज तुम्हाला सर्वोत्कृष्ट जोडीदार मिळाल्याबद्दल तुम्ही देवाचे आभार मानाल. पालकांना आपल्या मुलांबद्दल अभिमान वाटेल. कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांचा भरपूर पाठिंबा तुम्हाला मिळेल. आज ऑफिसमध्ये एखादं प्रेझेंटेशन दिल्यास चांगली छाप पडेल. सरकारी टेंडर मिळवण्यासाठी चांगला दिवस. वाहन, मोबाइल किंवा घर खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस. एखादी छोटी सहल आयोजित करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. आज रोमँटिक वातावरण राहील. जोडीदारासोबत अधिक काळ व्यतीत करा.
शुभ रंग : अॅक्वा
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया पांढरं नाणं दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज पैशांचे व्यवहार टाळा; मात्र कागदपत्रांसंबंधी व्यवहार पार पाडण्यास हरकत नाही. मेडिकल चेकअप करण्याचा सल्ला दिला असल्यास, ते संध्याकाळी पार पाडा. आज परिस्थितीसमोर तुम्हाला थोडीफार तडजोड करावी लागणार आहे. विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला सल्ला ऐका. वकिलाचा सल्ला घेतल्यास पैशांची योग्य बचत होईल. सॉफ्टवेअर क्षेत्रातली बिझनेस डील्स यशस्वी होतील. लग्नासाठी स्थळ आल्यास होकार देण्याचा विचार करा. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा केल्यास फायदा होईल.
शुभ रंग : पिवळा
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : कृपया मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचं नाणं दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज बिझनेसमध्ये बदल घडवण्यासाठी पैशांचा वापर कराल. कायदेशीर प्रकरणं पैशांच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या मदतीने सुटतील. आज बिझनेस डील पार पाडण्यासाठी तुमच्या संबंधांचा वापर कराल. तुमच्या आर्थिक बॅकग्राउंडची जोडीदारावर चांगलीच छाप पडेल. विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्यासंबंधी फी जास्त वाटत असली, तरी भविष्यात होणाऱ्या फायद्याचा विचार करावा. तुमचे आजचे सर्व निर्णय योग्य ठरतील. खेळाडूंना आज मोठं यश मिळेल. प्रवासाचा बेत असल्यास तो पुढे ढकलणं उत्तम. दानधर्म करणं टाळू नका.
शुभ रंग : Sea green
शुभ दिवस : शनिवार
शुभ अंक : 6
दान : कृपया गरजूंना चपला दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस सरकारी टेंडर आणि बिझनेस डील्स पार पाडण्यासाठी उत्तम आहे. ग्लॅमर, सॉफ्टवेअर, ऑक्युल्ट सायन्स, मीडिया किंवा शिक्षण क्षेत्रांतल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. राजकारणात प्रयत्न करणाऱ्यांना नवी संधी वा पद मिळू शकतं. आज मुलाखत, भाषण, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उत्तम दिवस आहे. संगीतकार व्यक्तींच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर आणि शल्यचिकित्सकांचा सत्कार होईल. लहान मुलांना आपल्या भविष्यासाठी योजना आखण्यासाठी उत्तम दिवस.
शुभ रंग : केशरी
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : कृपया लाल मसूर दान करा.
1 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : आर. माधवन, दिनेश कार्तिक, नर्गिस, इस्माईल दरबार, रजत पाटीदार
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.