ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 1 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
लकी दिवसाची सुरुवात करताना कपाळावर चंदन लावा. आजचा दिवस ज्ञान वाटण्याचा आणि ऑथोरिटीचा आहे. आज तुमच्याकडे कोणतंही आव्हान स्वीकारण्यासाठी पुरेशी ऊर्जा आणि उत्साह आहे. खासकरून शिक्षण क्षेत्रातल्या उद्योगामध्ये पुढे येऊन जोखीम घ्यायला हरकत नाही. यश मिळण्यासाठी तुमचे गुरू आणि सूर्यदेवाचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तुमच्या सभोवती असलेल्या अनेक व्यक्ती तुमच्या यशावर जळतात. त्यामुळे संध्याकाळी पाण्यात दूध मिसळून आंघोळ करा. क्रीडापटूंना मोठा विजय मिळेल. आज एका खास नेत्याची भेट होईल. गायन क्षेत्रातल्या महिला आवाजाने मनं जिंकतील. सूर्यदेवाला अर्घ्य द्या.
शुभ रंग : Yellow & Blue
शुभ दिवस : रविवार, गुरुवार
शुभ अंक : 1
दान : सूर्यफूल तेल दान करावं.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज पूर्ण लवचिकता आणि संयमाची गरज आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. आज मुत्सद्देगिरीचा उपयोग होईल. आजचा दिवस मित्र आणि नातेवाईकांसोबत व्यतीत करण्यासाठी उत्तम आहे. गुंतवणुकीवर मिळणारा परतावा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत लांब झेप घेण्याचा प्रयत्न करा. हिरे, लिक्विड्स, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, पुस्तकं, कृषी, डिसइन्फेक्टंट्स, रसायनं आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींच्या फायद्याच्या अनुषंगाने खास घोषणा होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : Blue & Peach
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2
दान : गरिबांना दूध दान करावं.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कोणत्याही क्षेत्रात असलात तरी तुमच्या क्रिएटिव्हिटीचं प्रदर्शन घडवा. तुम्ही तुमच्या टीमचे लोकप्रिय नेते ठराल. आज विद्यार्थ्यांना खूप यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल; मात्र तुमच्या मेंटॉरला धन्यवाद द्यायला विसरू नका. तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी उत्तम दिवस. तुमच्या प्रिय व्यक्तीला लग्नासाठी प्रपोझ करण्याकरिता चांगला दिवस. खेळाडू जुन्या प्रशिक्षकांच्या साह्याने जिंकतील. तुम्ही राजकीय क्षेत्रात असलात किंवा सरकारी अधिकारी असलात, तर आज जनतेचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी आणि इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी गुरुमंत्राचं पठण करणं गरजेचं. महिलांनी गुरूसाठी संध्याकाळी दिवा लावावा.
शुभ रंग : Orange
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3, 1
दान : पुस्तकं किंवा वह्या दान कराव्यात.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज कठोर जीवनशैलीचा अवलंब करा आणि प्रवास टाळा. तांत्रिक कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग, स्टील, शिक्षण, फायनान्स, बांधकाम आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींना नवी संधी मिळण्याची शक्यता. चांगल्या इंट्यूशनसाठी काही काळ व्यायाम जरूर करा. बराच काळ प्लॅनिंगमध्ये व्यतीत केला पाहिजे. सौर ऊर्जा, चित्रपट दिग्दर्शन, कला, मॅन्युफॅक्चरिंग, कुकिंग आदी क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींनी आज मशीन्स काळजीपूर्वक हाताळावीत. वैयक्तिक नातेसंबंधांना रोमँटिक वळण मिळेल. संवाद कायम राखा. हिरव्या रंगाचे पदार्थ खाणं गरजेचं. हिरव्या झाडांना पाणी घाला.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : गरिबांना हिरवी धान्यं दान करावीत.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचा जोडीदारावर खूप प्रभाव पडतो. त्यामुळे दिवस तुमच्या इच्छेनुसार व्यतीत करा. आजचा दिवस लीडरशिपचा आहे. गटामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना विजय मिळेल. स्वातंत्र्याचा उपयोग चुकीच्या मार्गाने करू नका. मित्र, नातेवाईक यांच्याशी तर्कनिष्ठ वागा. ग्लॅमर, मीडिया, फॉरीन कमॉडिटीज, क्रीडा आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींचं स्पेशल अप्रैझल होईल. आज महिलांनी केशरी, तर पुरुषांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले, तर लकी ठरेल. आज पार्टी टाळा आणि साधं जेवण घ्या. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुम्हाला अनुकूल ठरतील. क्रीडा क्षेत्रात विजय मिळतील.
शुभ रंग : Green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : मुलांना रोपं दान करा.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्ही इतरांना मार्गदर्शन कराल. इतरांचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी तुम्ही हे कौशल्य वापरायला हवं. आई-वडिलांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटेल. मुलांचा पाठिंबा, सहकार्य मिळाल्याबद्दल खूप चांगलं वाटेल. स्वतःसाठी वेळ काढायला हवा. कामाच्या ठिकाणी इतरांचं काऊन्सलिंग करायला हवं. सरकारी टेंडर्समध्ये जोखीम घेण्याइतपत तुम्हाला नशीब साथ देईल. नव्या कोर्सला प्रवेश घेणं, वाहनं, मोबाइल, घर आदींची खरेदी किंवा छोटी ट्रिप आयोजित करण्यासाठी उत्तम दिवस. रोमान्सचा आज वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संवाद टाळा.
शुभ रंग : Aqua
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : पांढरं नाणं दान करावं.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात असलात, तर इन्सेन्टिव्ह्जमधून मोठं उत्पन्न मिळेल. आज उत्तम कामगिरी होण्यासाठी शहाणपणाने वागा आणि टीमवर्क करा. तुमचा सारखं जोखण्याचा दृष्टिकोन यशामध्ये अडथळा ठरेल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सूचना स्वीकारण्यासाठी तुमचं मन खुलं करा. सॉफ्टवेअरशी संबंधित बिझनेस डील्स खूप यशस्वी होतील. भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन पूजाविधी केल्यास आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल.
शुभ रंग : Yellow
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : मंदिरात पिवळी मोहरी दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बिझनेससाठी प्रवास आखत असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अवघड आणि व्यग्र असेल. त्यामुळे ते टाळा. ज्ञान आणि पैशांची ताकद वापरून विरोधकांना नामोहरम करा. कायदेशीर वाद तडजोडीतून सुटतील. दानधर्म आणि मृदू बोलणं या गोष्टी आज आवश्यक आहेत. फायनान्सर्स, बँकर्स, डिफेन्स ऑफिसर्स, सर्जन्स आदींना संधी मिळतील. खेळाडू आपल्या कष्टांतून प्रशिक्षकांना प्रभावित करतील.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : शनिवार
शुभ अंक : 6
दान : गरजूंना चपला दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
काऊन्सलर्स आणि शिक्षक यांनी कामगिरीच्या दृष्टीने पाहिलं स्वप्नं आज पूर्ण होतील. कलाकार, अभिनेते, गृहिणी, खेळाडू, लेखक, डिझायनर, कापड व्यासायिक आणि बँकर आदींनी नव्या बिझनेस ऑफर्सचा शोध घेतला पाहिजे. कपल्सनी रिलेशनशिपमध्ये अधिक निष्ठा आणि विश्वास प्राप्त केला पाहिजे. सरकारी करारांवर सहज सह्या होतील. ग्लॅमर, शिक्षण, सॉफ्टवेअर, ऑकल्ट सायन्स, संगीत, माध्यमं, वैद्यकीय आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींना लोकप्रियता मिळेल. भविष्यातल्या राजकीय नेत्यांना आज काही पदांची ऑफर मिळेल. सार्वजनिक भाषण, इंटरव्ह्यूज, स्पर्धा परीक्षा आदींसाठी आजच्या दिवसाचा उपयोग करावा.
शुभ रंग : Orange & Red
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : गरिबांना डाळिंबं दान करावीत.
1 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : रिया चक्रवर्ती, व्यंकय्या नायडू, ब्रायन जॉर्ज, अखिलेश यादव, हरिप्रसाद चौरसिया
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.