मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : अंकशास्त्रानुसार शॉपिंगसाठी आजचा दिवस चांगला; तुम्ही 'या' वस्तू खरेदी करा

Numerology : अंकशास्त्रानुसार शॉपिंगसाठी आजचा दिवस चांगला; तुम्ही 'या' वस्तू खरेदी करा

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 23 सप्टेंबर 2022चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) खेळाचे सामने आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विजयी व्हाल; मात्र बेटिंग किंवा स्टॉक मार्केटपासून दूर राहा. तुमच्या युनिक लीडरशिपच्या माध्यमातून तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी, नोकरीत उच्च पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा आत्मविश्वास आहे आणि तुम्ही स्वतंत्र आहात. सिंगल व्यक्तींना प्रेम सापडण्यासाठी संघर्ष करावा लागेल. जोडीदारावर तुमचा प्रभाव पडेल आणि तो/ती तुम्हाला मदत करील. आजचा दिवस बक्षिसं, प्रपोझल, गौरव किंवा प्रिय व्यक्तींकडून पाठिंबा मिळण्याचा आहे. अभिनय, सौर ऊर्जा, कला, कॉस्मेटिक्स, कृषी आणि प्रॉपर्टी या क्षेत्रातल्या व्यक्ती आज बाजारपेठेत आघाडीवर असतील. शुभ रंग : Teal शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1, 5 दान : गरिबांना केळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस भावना लपवल्या पाहिजेत. प्रोफेशनल लाइफमध्ये नशीब तुम्हाला मोठ्या प्रमाणावर साथ देतं; मात्र पर्सनल रिलेशनशिपमधल्या त्रयस्थ व्यक्तीवर लक्ष ठेवा. महिलांनी नव्या नोकरीसाठी अर्ज करण्याकरिता किंवा नव्या बिझनेसची सुरुवात करण्याकरिता आजचा दिवस वापरावा. आज महिला बिझनेसमध्ये गुंतवणूकही करू शकतात. मुलं आत्मविश्वास आणि कष्टांचा आनंद घेतील. त्यांना नशीब साथ देईल आणि त्यांची कामगिरी आकर्षक होईल. आपल्या मुलांच्या खेळातल्या आणि शैक्षणिक कामगिरीबद्दल आई-वडिलांना अभिमान वाटेल. रोमान्समुळे कपल्समधले नातेसंबंध दृढ होतील; मात्र गर्दी आणि पार्टीजपासून दूर राहा. महत्त्वाच्या इंटरव्ह्यूजमध्ये Sea Green रंगाचे कपडे घालतल्यास नशीब उजळेल. माध्यमकर्मी, राजकीय नेते, डिझायनर्स, डॉक्टर्स, अभिनेते आपल्या विशेष यशाचा आनंद घेतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2, 6 दान : मंदिरात दोन नारळ अर्पण करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) केळीच्या झाडाला साखरेचं पाणी घालावं. तुमच्या शत्रूंनी तुम्हाला मागे खेचण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सगळं काही सुरळीत होईल; मात्र दुर्लक्ष करू नका. रिलेशनशिपमध्ये काही समस्या येणार नाही. आज रात्री जेवायला बाहेर जा. कलाकारांसारख्या सर्जनशील व्यक्तींना गुंतवणुकीसाठी आणि परतावा मिळवण्यासाठी चांगला काळ आहे. नवं व्हेंचर सुरू करण्याचा विचार आज यशस्वीरीत्या केला जाऊ शकतो. खेळाडू, स्टॉक ब्रोकर्स, विमान कंपनीचे कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातले कर्मचारी, शिक्षणतज्ज्ञ, हॉटेलियर्स, संगीतकार आणि राजकीय नेते आदींची प्रसिद्धी होईल. शुभ रंग : Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : आश्रमात गहू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज नशीब तुम्हाला अनुकूल आहे. प्रलंबित किंवा रखडलेली कामं आज पूर्ण होतील. आर्थिक आणि मार्केटिंग धोरणं कृतीत उतरवा आणि रिटर्न्सचा आनंद घ्या. आजचा दिवस दमवणारा आहे. सकाळपासूनच रिझल्ट्स तुमच्या बाजूने लागतील. तरुणांनी आपल्या प्रेमभावना व्यक्त कराव्यात. मैत्री किंवा रिलेशनशिपमध्ये विश्वासघात टाळावा. मांसाहार आणि मद्यपान टाळा. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना किंवा गायींना हिरव्या पालेभाज्या खाऊ घाला. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्या. आज तुम्हाला सुदैवी असल्यासारखं वाटेल. बराचसा काळ प्रवास, आनंद घेणं, शॉपिंग, पार्टी आणि सेलिब्रेशन यामध्ये व्यतीत होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती व्हायला हवी असेल, तर वेळ वाया घालवणं थांबवा आणि जास्तीत जास्त रिसोर्सेचा वापर करा. रिलेशनशिप्स, पर्यटन आदींचा आनंद घेणं, रिस्क घेणं, प्रॉपर्टी खरेदी करणं, सामने खेळणं, स्पर्धेला उपस्थित राहणं यांसाठीचा आहे. आज छोटा, पण आरामदायी प्रवास कराल. एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची खूप जास्त शक्यता आहे. जी काही छोटी-मोठी वस्तू हवी असेल, ती आज खरेदी करा. सगळ्या वस्तू चांगल्या निघतील. सिंगल व्यक्तींना आज अनुरूप जोडीदार मिळू शकेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गरिबांना किंवा गायींना हिरवं धान्य दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या निरागसपणाचा बाकीच्या व्यक्ती फायदा घेतील आणि त्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर ढकलतील; पण तुम्ही ते टाळावं. कारण तुम्हाला गृहीत धरलं जातं. उच्च शिक्षण, नवं घर, जॉब, नवी रिलेशन्स, आर्थिक लाभ, प्रवास, पार्टी अशा काही गोष्टींचा आनंद आज घेऊ शकाल. कमिटमेंट्स खूप मोठ्या आहेत; पण तुम्ही त्यांचा आनंद घ्याल. आज सर्व उद्दिष्टं पूर्ण होतील. तुम्ही एखाद्या स्टारप्रमाणे तुमची ओळख निर्माण कराल. राजकीय नेते, क्रीडापटू, ब्रोकर्स, रिटेलर्स, हॉटेलियर्स, विद्यार्थी त्यांची उद्दिष्टं पूर्ण करून विजयी होतील. गृहिणी आणि शिक्षकांना कुटुंबीयांकडून आदर आणि प्रेम मिळेल. सरकारी अधिकाऱ्यांना नवं प्रोफाइल आणि प्रमोशन मिळेल. प्रॉपर्टी डील्स सहजपणे हाताळली जातील. प्रलंबित असलेले लग्नाचे प्रस्ताव आज प्रत्यक्षात येऊ शकतील. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6, 2 दान : मुलांना निळ्या पेन्सिल्स किंवा पेन दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जुन्या स्रोतांकडून पैसे मिळवण्याचा आजचा दिवस आहे. आजचा दिवस गुरूमंत्राचा जप करून सुरू करा. तसंच पूर्वजांचं स्मरणही करा. पुरुषांना व्यवसायात कदाचित संघर्ष करावा लागेल; मात्र महिलांची प्रगती होईल. आज केवळ विश्वास या घटकाची मोजणी केली जाऊ शकेल. त्यामुळे भाषण करण्यापूर्वी त्यातल्या मुद्द्यांची उजळणी आणि विश्लेषण करा. घरून काम करणं टाळा आणि पिवळ्या डाळी दान करा. छोट्या ब्रँड्सना मोठ्या ब्रँड्सच्या तुलनेत अधिक फायदा होईल. वकील, सॉफ्टवेअर तंत्रज्ञांनी घरून काम करणं टाळावं आणि ऑफिसला जावं. शुभ रंग : Orange & Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : अनाथांना स्टेशनरीच्या वस्तू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकाळी शनिमंत्राचा जप करा. उद्दिष्टाच्या दिशेने काम करणं सुरू ठेवा. कारण उद्दिष्ट जवळ आलं आहे. आत्मविश्वास आणि खूप कष्ट या दोन गोष्टी आज तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर काढतील. आजचा दिवस गायींसाठी दानधर्म करण्याकरिता उत्तम आहे. कपल्समध्ये आनंदाचे क्षण येतील. डॉक्टर्स, बिल्डर्स, नाट्य कलावंत, फार्मासिस्ट्स, इंजिनीअर्स आणि मॅन्युफॅक्चरर्सना आर्थिक लाभ होईल. मशिनरी, इन्व्हेंटरी, फर्निचर आदींच्या खरेदीसाठी, तसंच धातू किंवा जमिनीत गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. बिझी दिवस असेल. त्यामुळे शारीरिक तक्रारी उद्भवू शकतील. आज हिरवाईच्या सान्निध्यात काही वेळ घालवा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : अनाथाश्रमात मोहरीचं तेल दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकाळी ध्यानधारणा करा. त्यामुळे आज घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या घरगुती समस्यांवर उपाय निघू शकेल. अभिनेते, गायक, डिझायनर्स, राजकीय नेते, डॉक्टर्स, लेखक, इतिहासकार, माध्यमकर्मी आदींना आज प्रसिद्धी, संधी, स्थिरता, समृद्धी आणि आराम या सगळ्या गोष्टी मिळतील. सोन्यासारख्या धातूत किंवा जमिनीत बिझनेस इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आदर्श दिवस. तरुणांना त्यांच्या पार्टनर्सना प्रभावित करण्यासाठी अनुकूल दिवस. हॉटेलिंग, कार्यक्रमाला उपस्थित राहणं, पार्टी आयोजित करणं, ज्वेलरीची खरेदी करणं, कौन्सेलिंग करणं किंवा खेळ खेळणं आदींसाठी आजचा दिवस चांगला. शुभ रंग : Brown शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : गरिबांना टोमॅटो दान करा. 23 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : कुमार सानू, प्रेम चोप्रा, तनुजा, राहुल वैद्य, अंबाती रायुडू, रामधारी सिंग दिनकर
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या