मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : जन्मतारखेनुसार आज करा हे छोटेसे उपाय; आयुष्यातील बऱ्याच समस्या दूर होतील

Numerology : जन्मतारखेनुसार आज करा हे छोटेसे उपाय; आयुष्यातील बऱ्याच समस्या दूर होतील

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य जाणून घेण्यासाठी पाहा आजचं अंकशास्त्र.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुळशीच्या रोपाकडे दिवा लावा. जुनी प्रॉपर्टी किंवा जुन्या वादांवर पुन्हा चर्चा करून ते सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रॉपर्टी खरेदी करण्यापेक्षाही सध्याचा काळ मालमत्तेच्या विक्रीसाठी चांगला आहे. खेळांमध्ये विजय मिळण्याची शक्यता मोठी आहे. बांधकाम साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, कृषिविषयक पुस्तकं, औषधं आणि फायनान्स या क्षेत्रांतल्या व्यवसायांमध्ये वसुली सुरळीतपणे होईल. महत्त्वाच्या असाइनमेंट्स आज सूर्यास्तापूर्वी संपवाव्यात. शुभ रंग : Orange शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : भिकाऱ्यांना पिवळ्या डाळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची निष्ठा आणि बुद्धिमत्ता यांचा आज तुमच्या बॉसवर चांगला प्रभाव पडेल. तुम्ही कायम वचनबद्ध आणि प्रामाणिक आहात; मात्र या गोष्टीही तुम्हाला दुखावू शकतात. त्यामुळे आज भावनिक असंतुलनाला सामोरं जाण्यासाठी कणखर बना. लीगल कमिटमेंट्स अगदी सहजपणे पूर्ण केल्या जातील. आज कोणी तरी तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. महिलांनी सार्वजनिक व्यासपीठांवर उपस्थित राहून लोकप्रियता मिळवावी. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आणि राजकीय नेते नवी उंची गाठतील. शुभ रंग : Peach शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : आश्रमात साखर दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या कामाच्या ठिकाणी ईशान्य दिशेला पिवळी, कृत्रिम सूर्यफुलं ठेवा. तुमच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता आहे आणि तुम्ही सक्रिय आहात. त्यामुळे तुम्ही काही शत्रू तयार करण्याची शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूच्या माणसांना तुमच्याबद्दल असूया वाटते. त्यावर उपाय म्हणून तुम्ही संध्याकाळी दुधाच्या पाण्याने आंघोळ करा. कामाच्या ठिकाणी प्रमोशन किंवा अप्रैझल होईल. तुमचं ज्ञान आणि भाषण यांमुळे माणसं प्रभावित होतील. आज घेतलेले सर्व निर्णय तुम्हाला अनुकूल होतील. खासकरून शिक्षणतज्ज्ञ, संगीतकार, बँकर्स, लेखक यांना हे लागू होईल. आज केलेल्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या भावना खुल्या दिलाने व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व व्यवहारांमध्ये नशीब साथ देईल. दिवसाची सुरुवात करताना तुमच्या गुरूचं नाव घ्यायला आणि कपाळावर चंदन लावायला विसरू नका. शुभ रंग : Orange & Violet शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : भिकाऱ्यांना पिवळा भात दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घराच्या पूर्वेकडच्या बाजूला पाण्याचं कारंजं ठेवा. तुमची कामातली अचूकता आणि समर्पण वृत्ती खूप उच्च आहे. त्यामुळे यश खूप जवळ आहे. सध्या रिलॅक्सेशनचा काळ नाही. भविष्यासाठी आजच बीजारोपण करणं ही आजची अपेक्षित कृती आहे. क्रीडा, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांकरिता आजचा दिवस प्रवासासाठी चांगला आहे. बांधकाम किंवा स्टॉक मार्केट बिझनेसमध्ये वृद्धी होईल. माध्यम, धातू, वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रात नव्या संधी मिळतील. विद्यार्थी आणि मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती आपलं महिनाअखेरीचं उद्दिष्ट पूर्ण करतील. आज मांसाहार टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना कपडे दान करावेत. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज दुधाच्या पाण्याने आंघोळ करा. तुम्ही सर्वांचे लाडके आहातच आणि दीर्घ काळपर्यंत राहाल. पूर्वी केलेल्या कामाची दखल घेतली जाण्याचा आणि त्याचे लाभ घेण्याचा दिवस. जुना मित्र किंवा नातेवाईक मदतीसाठी दार ठोठावेल आणि तुम्ही साह्य केलं पाहिजे. बँकर्स, खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते आदींना नशीब खास साथ देईल. विक्री आणि खासकरून क्रीडा क्षेत्रात असलेल्यांच्या आयुष्यात वेगवान, अनुकूल घडामोडी घडतील. विद्यार्थी आज शैक्षणिक यशाचा आनंद घेतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथाश्रमात दूध दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) चामड्याच्या वस्तू टाळा आणि धातूचा पट्टा असलेलं घड्याळ वापरा. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे स्टार आहात, तसंच कामाच्या ठिकाणीही अनेकांचे लाडके आहात. कौटुंबिक सोहळ्यांना उपस्थित राहण्यासाठी, एंगेजमेंटसाठी, प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी, प्रवासाला जाण्यासाठी, कौशल्यं दर्शवण्यासाठी, प्रेझेंटेशन देण्यासाठी, मास मीडियाला सामोरं जाण्यासाठी, विजय साजरा करण्यासाठी चांगला दिवस आहे. मुलं आणि जोडीदारासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस. व्हिसाची वाट पाहत असलात, तर पाठपुरावा करण्याची गरज आहे. नवी फॅक्टरी उभारण्यासाठी प्रॉपर्टीच्या शोधात असलेल्या व्यक्ती एक पर्याय निश्चित करू शकतील. अभिनेते, माध्यमकर्मी यशाचा आनंद घेतील. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना केशरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) विजयामध्ये तुमचा अनुभव महत्त्वाची भूमिका निभावेल. आजच्या दिवसाचे तुम्ही हिरो असाल. बिझनेसमध्ये रिस्क घ्या. कायदेविषयक प्रकरणांमध्ये तुमची बुद्धिमत्ता आणि विश्लेषण करण्याची क्षमता वापरावी लागेल. आज तुमचा चमकण्याचा काळ आहे. त्यामुळे खेळ आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये विजय मिळणं शक्य आहे. नातेसंबंध बहरतील. विरुद्धलिंगी व्यक्ती आज तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. गुरुमंत्राचं पठण करा. राजकीय नेत्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे; मात्र मृदू बोलणं महत्त्वाचं ठरेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यायला आणि त्यांची सेवा करायला विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात सोयाबीन तेल दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) हट्टीपणा कमी करा आणि प्रवास टाळा. आज जिथे जिथे कष्टांची गरज असेल, तिथे नशीब आणि स्थिरता या गोष्टी महत्त्वाची भूमिका निभावतील. पैसे येण्याच्या मार्गावर आहेत; मात्र त्यात काही मॅनिप्युलेशन्स होतील. ब्रँड जेवढा मोठा असेल, तेवढं यश मोठं असेल. खासकरून तुम्ही मॅन्युफॅक्चरर असलात, तर तुमच्या गुडविलच्या जोरावर संध्याकाळपर्यंत तुमचा गौरव होईल. उच्च पातळीचं ज्ञान प्राप्त करण्यात तुम्ही अधिक वेळ व्यतीत कराल. सेवा पुरवताना डॉक्टर्सचं कौतुक होईल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सोहळ्यांसाठी येण्याचं वचन देऊ नका. कारण तेवढा वेळ मिळेल असं वाटत नाही. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) महिलांना कुंकू देऊन दिवसाची सुरुवात केल्यास मंगळ ग्रहाची साथ मिळेल. वर्किंग किंवा नॉन-वर्किंग महिला आज इम्प्रेशन पाडण्यात यशस्वी ठरतील आणि आयकॉन बनतील. आजचा दिवस कौतुकाचा आणि प्रगतीचा आहे. अचानक यश मिळण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे. सरकारी ऑर्डर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याकरिता चांगला दिवस आहे. आजचा दिवस चांगला असल्याने खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी पुढचं पाऊल टाकून संधी मिळवल्या पाहिजेत. शेफ, अभिनेत्री, गायक, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेलियर्स आदींना नशीब साथ देईल. शुभ रंग : Red & Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3, 9 दान : घरगुती मदतनीस किंवा भिकाऱ्यांना डाळिंबं दान करा. 21 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सुधा चंद्रन, करीना कपूर, नूरजहाँ, गुलशन ग्रोव्हर, हरिसिंह, अतली कुमार
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology

पुढील बातम्या