मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : जन्मतारखेनुसार ठरवा तुमच्या प्रेमाची पुढील स्टेप; आज काय करणं योग्य ठरेल पाहा

Numerology : जन्मतारखेनुसार ठरवा तुमच्या प्रेमाची पुढील स्टेप; आज काय करणं योग्य ठरेल पाहा

प्रेमात पडला असाल तर आजचं अंकशास्त्र जरूर पाहा. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

प्रेमात पडला असाल तर आजचं अंकशास्त्र जरूर पाहा. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

प्रेमात पडला असाल तर आजचं अंकशास्त्र जरूर पाहा. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 30 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज एखादी मोठी संधी चालून येईल. सेल्स आणि राजकारण क्षेत्रातल्या व्यक्ती इतरांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतील. आज दिवसभर ताण राहिल; मात्र भरपूर कौतुकही होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातला राजकीय रंग दाखवण्याचा आजचा दिवस आहे. कौटुंबिक कार्यक्रम, म्युझिक कॉन्सर्ट अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू शकता. इव्हेंट अरेंज करण्यासाठी किंवा मुलाखत देण्यासाठी उत्तम दिवस. प्रॉपर्टी खरेदी करताना तसंच संपत्ती विक्री करताना तडजोड करावी लागेल. त्यामुळे या गोष्टी टाळल्यास उत्तम. स्टेशनरी, हॉटेल, समुपदेशन, साहित्य, शाळा, डिजिटल मार्केटिंग, मेटल, क्रिएटिव्ह क्लासेस आणि क्रीडा या व्यवसायांमधल्या व्यक्तींना भरपूर नफा होईल. मुलांवर अभ्यासाचा ताण वाढेल. शुभ रंग : Yellow and Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 दान : कृपया मंदिरात चंदन दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजूबाजूच्या काही लोकांकडून तुमच्यावर टीका होऊ शकते. त्यासाठी तयार राहा. तुमच्या साध्या स्वभावामुळे तुम्हालाच त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोडं कठोर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या खांद्यावर आधीपासूनच भरपूर जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आणखी गुंतवणूक करणं टाळा. कायदेशीर प्रकरणं कोणत्याही तडजोडीविना पार पडतील. प्रेम संबंधांमध्ये जोडीदार तुम्हाला कंट्रोल करत आहे असं वाटेल. महिलांनी आज वरिष्ठांकडून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करावं. तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी खर्च करावा लागेल. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट व्यवसाय आणि राजकारण क्षेत्रांतल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. विद्यार्थी, उत्पादक, रिटेलर, ब्रोकर आणि खेळाडूंना चांगल्या परफॉर्मन्ससाठी वाट पाहावी लागेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया अनाथाश्रमात दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) लेखक आणि संगीतकारांसाठी अगदी सुंदर दिवस. तुमची क्रिएटिव्हिटी आणि कल्पनाशक्ती आज भरपूर कामी येईल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी ऑफर केली जाईल. तुमच्या संवादकौशल्यामुळे लोक प्रभावित होतील. तुम्ही आज घेतलेले निर्णय भविष्यात तुमच्या फायद्याचे ठरतील. सध्या इतरांसोबत तुमच्या आर्थिक योजनांबाबत चर्चा करणं टाळा. शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळण्यास वेळ लागेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आपल्या मनातल्या भावना जोडीदारासमोर व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकाऱ्यांनी नवीन व्यक्तींबाबत खबरदारी घ्यावी. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या गुरूंचं नामस्मरण अवश्य करा. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया महिला मदतनीस व्यक्तीस केशर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सध्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ताण-तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी मेडिटेशनची मदत घ्या. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी प्रवास फायद्याचा ठरेल. पैसे कमावण्याच्या संधी येतील; मात्र सोबतच जबाबदाऱ्याही वाढतील. बांधकाम व्यवसाय आणि मेडिकल क्षेत्रात वेगाने बदल घडतील. शेअर मार्केटमध्ये हळूहळू, मात्र सकारात्मक बदल घडतील. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होण्यासाठी मेडिटेशनची मदत घ्यावी. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती जेवढा जास्त प्रवास करतील, तेवढ्या जास्त यशस्वी होतील. कृपया आज मांसाहार आणि मद्यपान टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया भटक्या जनावरांना अन्न दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कमी जबाबदाऱ्या आणि भरपूर फायदा असा दिवस आहे. तुमच्या जवळच्या मित्रासोबत किंवा जोडीदारासोबत मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस. कामाच्या ठिकाणी तुमच्या हुशारीने भरपूर फायदा करून घ्याल. कर्जासारख्या जबाबदाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका. दुपारनंतर नशीब तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे महत्त्वाची कामं दुपारनंतर करा. सेल्स आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींनी जलदगतीने हालचाल करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांना मोठं शैक्षणिक यश मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींचं लक्ष दुसरीकडे वेधणाऱ्या काही संधी उपलब्ध होतील; मात्र त्यांकडे दुर्लक्ष करून जोडीदाराशी प्रामाणिक राहा. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरवी फळं आणि भाज्या दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शुक्र ग्रहाची शक्ती वाढवण्यासाठी शुक्रपूजा करणं उत्तम राहील. विद्यार्थी आणि राजकीय व्यक्तींनी नव्या संधी सोडू नयेत, भविष्यात फायदा होईल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये अस्वस्थता आणि असुरक्षित वाटेल. नवीन फॅक्टरी उभारण्यासाठी जागा शोधत असाल, तर आज चांगला पर्याय मिळेल. भूतकाळात गुंतून राहणं फायद्याचं नाही. त्यामुळे मन दुसरीकडे वळवण्यासाठी घराबाहेर पडा. एखादा खेळ खेळल्याने किंवा प्रेझेंटेशनला उपस्थित राहिल्याने फायदा होईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया आश्रमांमध्ये पांढरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) राजकीय व्यक्ती, पब्लिक फिगर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनीअर, बिल्डर, ज्योतिषी, मेकअप आर्टिस्ट आणि खेळाडू असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात नवी सुरुवात होईल. कायदेशीर प्रकरणांमध्ये तुमचाच विजय होईल. नातेसंबंधांमध्ये वाद टाळणं गरजेचं आहे. अन्यथा ब्रेकअप होण्यापर्यंत मजल जाऊ शकते. खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळतील. राजकीय व्यक्ती आणि अभिनेत्यांसाठी आज उत्तम दिवस; लोकांवर आणि वरिष्ठांवर चांगली छाप पडेल. बँकिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. आज गुरुमंत्राचा जप करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Teal शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया तांब्याची वा पितळेची एखादी गोष्ट दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून आज फसवणूक किंवा गैरवर्तन होऊ शकतं. त्यामुळे सावध राहा. कामं वेळेवर पूर्ण करू शकाल, ज्यामुळे फायदा होईल. तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, हुशारी, आदर आणि कुटुंबीयांचं प्रेम मिळवून देणाऱ्या देवाचे मंदिरात जाऊन आभार माना. प्रवासाचे बेत आरामात पार पडतील. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कामात व्यग्र राहाल. डॉक्टर आणि फायनान्सर व्यक्तींना चांगल्या कामासाठी पुरस्कार मिळेल. तुमच्या मनातल्या रोमँटिक भावना सत्यात उतरवण्यासाठी सुंदर दिवस. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना कलिंगड दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अभिनय, मीडिया, निवेदन, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींना आज भरपूर प्रसिद्धी आणि कौतुक मिळेल. एखादं टेंडर किंवा प्रॉपर्टीसाठी मध्यस्थाची मदत घ्या. खेळाडू, बिझनेसमन, शिक्षक, बँक कर्मचारी, संगीतकार, अभिनेते आणि विद्यार्थ्यांनी आज कागदपत्रांशी संबंधित कामं उरकून घ्यावीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल, तर बल्कमध्ये स्टॉक घेणं फायद्याचं ठरेल. लाल आणि जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन स्थैर्य लाभण्यासाठी फायद्याचं ठरेल. आज डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आज प्रवास टाळा. शक्यतो घरून काम करणं उत्तम. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 दान : कृपया घरगुती कामगाराला लाल मसूर दान करा. 30 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : मंदाकिनी, सोनू सूद, सोनू निगम, रम्या सुब्रमण्यन, वाजिद अली शाह, सुलोचना लाटकर
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या