मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : तुमची जन्मतारीख 'ही' असेल तर आज यश आणि धनलाभ दोन्हीही मिळणार

Numerology : तुमची जन्मतारीख 'ही' असेल तर आज यश आणि धनलाभ दोन्हीही मिळणार

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 सप्टेंबर 2022चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 सप्टेंबर 2022चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्तर दिशेला पिवळ्या वस्तू आणि फुलं ठेवा. सध्याचा काळ तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या ताकदीचा वापर करण्याचा आहे. हालचाली पूर्णतः तुम्हाला अनुकूल अशा घडतील. मालमत्तेच्या विक्रीतून पैसे कमावण्यासाठी चांगला दिवस. खेळात जिंकण्याची शक्यता मोठी. टूल्स, मशीन्स, ट्रॅव्हल एजन्सीज, फर्निचर, पुस्तकं, औषधं, ग्लॅमर आणि कपडे आदी उद्योगांमध्ये परतावा सहज मिळेल. राजकीय नेते आणि पायलट्स लीडरशिप मिळवतील आणि त्याचे परिणामही चांगले असतील. मुलांचं शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून कौतुक होईल. शुभ रंग : Blue & Yellow शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : भिकाऱ्यांना केशरी मिठाई दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सेन्सिटिव्ह होणं थांबवा आणि तर्कनिष्ठ विचार करा. असे विषय किंवा क्षेत्रं शोधून काढा, ज्यातून तुम्हाला नफा कमावता येईल, मग ते विषय तुमच्या आवडीचे नसले तरी चालतील. तुमच्या भावना आणि महत्त्वाकांक्षा दाबून टाकण्याचा प्रयत्न अन्य व्यक्तींकडून केला जाईल. लीगल कमिटमेंट्स अगदी सहज पूर्ण केल्या जातील. अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे, जी तुमचा आत्मसन्मान दुखावू शकेल. त्यामुळे सावध राहा. महिलांनी जोडीदारांच्या काटेकोर स्वभावाकडे दुर्लक्ष करावं. जुन्या ओळखींचा वापर करून सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी आजचा दिवस वापरावा. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आणि राजकीय नेते नवी उंची गाठतील. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : मंदिरात पांढऱ्या रंगाची मिठाई दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं इन्ट्यूशन आणि विश्लेषणक्षमता उत्तम रीतीने काम करील. त्यातून मित्र आणि कुटुंबीयांसमवेत चांगले नातेसंबंध तयार होतील. तुमचं अभिनयकौशल्य दाखवण्यासाठी उत्तम दिवस आहे. कामाच्या ठिकाणी रिक्रूटमेंट असेल. पब्लिक फिगर्स असलेल्या व्यक्ती भाषणातून प्रभाव टाकू शकतील. खासकरून संगीतकार आणि लेखक यांनी आज घेतलेले सर्व निर्णय भविष्यात अनुकूल ठरतील. आज केलेली गुंतवणूक उच्च परतावा देईल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या भावना खुल्या दिलाने व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीबाबत सावध राहावं. दिवसाची सुरुवात करताना तुमच्या गुरूचं नाव घ्यायला आणि कपाळावर चंदन लावायला विसरू नका. शुभ रंग : Orange & Blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : महिला मदतनीसाला तुळशीचं रोप दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा. आज तुमची ऊर्जा उच्च असेल. ती एका दिशेने केंद्रित केल्यास चांगला रिझल्ट मिळेल. उत्पादक आणि शेतकऱ्यांनी मालमत्ता खरेदीचा निर्णय काही काळ थांबवावा. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींना आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे. वैद्यकीय, सॉफ्टवेअर, हस्तकला, धातू आदी क्षेत्रांत सकारात्मक बदल दिसतील. उद्दिष्टपूर्तीच्या धोरणावर विद्यार्थी कष्ट घेतील. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती त्यांचं महिनाअखेरीचं उद्दिष्ट पूर्ण करतील. शाकाहारी राहा आणि ध्यानधारणा करा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : घरगुती मदतनीसाला झाडू दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या भावना आणि कृती यांतून तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि कष्टांचं दर्शन घडतं. त्यामुळे तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकाल. वैयक्तिक आयुष्य कमिटमेंट्स आणि रोमान्समुळे बहरत आहे. पूर्वी केलेल्या कामाची दखल घेतली जाण्याचा आणि त्याचा लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. जुना मित्र किंवा नातेवाईक मदतीसाठी दार ठोठावेल आणि तुम्ही साह्य केलं पाहिजे. डिझायनर्स, ब्रोकर्स, प्रॉपर्टी डीलर्स, बँकर्स, खेळाडू, राजकीय नेते आदींना नशीब खास साथ देईल. विक्री आणि खासकरून क्रीडा क्षेत्रात असलेल्यांच्या आयुष्यात वेगवान, अनुकूल घडामोडी घडतील. विद्यार्थी आज शैक्षणिक बाबतीत 'अप टू द मार्क' असतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गरिबांना दही दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या सहसावातल्या व्यक्तींकडून तुमचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि बाकीच्या व्यक्ती काय देत आहेत याकडे दुर्लक्ष करा. मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. व्हिसासाठी वाट पाहत असलात, तर आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. नवं घर किंवा नवी नोकरी शोधत असलेल्या व्यक्ती चांगला पर्याय निवडू शकतील. अभिनेते आणि माध्यमकर्मी यशाचा आनंद घेतील. दिवसाच्या उत्तरार्धात तुम्हाला अधिक समाधानी आणि निवांत वाटेल. आयुष्याबद्दलच्या तुमच्या शंका दूर झालेल्या असतील. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : महिलेला कॉस्मेटिक वस्तू दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तरुण राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, संरक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती, वकील, शास्त्रज्ञ, शेतकरी, वितरक आणि सीए करिअरमध्ये मोठी झेप घेतील. क्रीडा क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवाल. त्यासाठी ज्येष्ठांचे आशीर्वाद कामी येतील. नातेसंबंध बहरतील आणि विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरतील. गुरूमंत्राचं पठण करा. मृदू वाणी हे आज सर्व ठिकाणी विजयाचं सूत्र आहे. राजकीय नेत्यांना सार्वजनिक सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींवर प्रभाव टाकण्यासाठी चांगला दिवस आहे. महिलांना स्टॉक मार्केटमध्ये नशीब साथ देईल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात कच्ची हळद दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) महत्त्वाचे निर्णय घेताना ठाम राहा. त्यातून निश्चित आर्थिक लाभ मिळतील. तुम्ही पूर्वी केलेली सगळी सकारात्मक कामं तुमच्याबद्दलचं गुडविल तयार करत आहेत. व्यापक सोशल नेटवर्कच्या आधारे तुम्हाला आज दिवसअखेर यश मिळेल. उच्च पातळीवरचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही अधिक काळ व्यतीत कराल. सेमिनार्स देताना डॉक्टर्सना गौरवलं जाईल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत अधिक लोकप्रियता मिळेल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्यांना लाल फळं दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) स्टॉक ब्रोकर्स, ज्वेलर्स, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेते, गायक, नर्तक, चित्रकार, प्रॉपर्टी डीलर्स, डॉक्टर्स आदींची विशेष दखल घेतली जाईल किंवा अप्रैझल होईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी मध्यस्थांपासून सावध राहावं आणि त्यांचे हेतू ओळखावेत. आजचा दिवस कौतुकाचा आणि प्रगतीचा आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रमोशन्स, इंटरव्ह्यू किंवा ऑडिशन्स देणं, सरकारी ऑर्डरसाठी अर्ज करणं आदींसाठी दिवस चांगला आहे. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटेशनसाठी पावलं उचलावीत. त्यासाठी दिवस चांगला आहे. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू, हॉटेलियर्स आदींना नशिबाची साथ मिळेल. शुभ रंग : Red & Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3, 9 दान : गरिबांना कपडे दान करा. 22 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : उन्नी मुकुंदन, भाऊराव पाटील, संजय जगदाळे, राजश्री ठाकूर, बिश्नोई
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या