मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : या क्षेत्रातील व्यक्तींचं आज नशीब फळफळणार; जन्मतारखेनुसार पाहा तुमचं भविष्य

Numerology : या क्षेत्रातील व्यक्तींचं आज नशीब फळफळणार; जन्मतारखेनुसार पाहा तुमचं भविष्य

अंकशास्त्रानुसार आजचा दिवस या क्षेत्रातील लोकांसाठी प्रसिद्धी, यश आणि आर्थिक फायद्याचा आहे.

अंकशास्त्रानुसार आजचा दिवस या क्षेत्रातील लोकांसाठी प्रसिद्धी, यश आणि आर्थिक फायद्याचा आहे.

अंकशास्त्रानुसार आजचा दिवस या क्षेत्रातील लोकांसाठी प्रसिद्धी, यश आणि आर्थिक फायद्याचा आहे.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 9 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस नाव आणि प्रसिद्धी कमावण्यासाठी उत्तम आहे. काही गोष्टींमध्ये तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स द्याल. स्पर्धांमध्ये जिंकण्याची भरपूर संधी आहे. सभेमध्ये समोर बोलण्यासाठी चांगला दिवस. तुमची बोलण्याची शैली इतरांवर चांगली छाप पाडेल. जोडप्यांमध्ये प्रेमसंबंध चांगले राहतील. सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. तुमच्या मतांवर ठाम राहा. शुभ रंग : Orange and Green शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार शुभ अंक : 1 आणि 9 दान : कृपया डाळिंबं दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सोशल वर्क केल्यामुळे भरपूर आशीर्वाद आणि सदिच्छा मिळतील. कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या मनाचं ऐका. तुम्ही अगदी निरागस असल्यामुळे काही क्षणी लगेच दुखावले जाण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट आणि एक्सपोर्ट व्यवसायातली गुंतवणूक फायद्याची ठरेल. नात्यांमध्ये रोमान्स वाढेल; मात्र आंधळेपणाने विश्वास ठेवणं टाळा. शुभ रंग : Pink शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया मंदिरात चांदीचं नाणं दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नवीन संधी समोरून चालून येतील. तुमच्या मेहनतीची फळं मिळवण्याचा हा काळ आहे. सरकारी विभागांसोबत करार करणं फायद्याचे ठरेल. तुमच्या योजना कागदावरून प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योग्य वेळ आहे. राजकारणी आणि वकील असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचा दिवस. शॉपिंग करणं, प्रवेश घेणं, घर किंवा वाहन खरेदी आणि कपडे किंवा शोभेच्या वस्तू विकत घेण्यासाठी चांगला दिवस. डिझायनर, हॉटेल व्यावसायिक, निवेदक, प्रशिक्षक, फायनान्सर आणि संगीतकार असणाऱ्या व्यक्तींना आज विशेष यश मिळेल. कृपया दिवसाची सुरुवात पिवळा भात खाऊन करा. शुभ रंग : Red and Violet शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरात चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बिझनेस आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच दिवसांनी समाधान मिळेल. तुमची कामं आरामात पार पडण्यासाठी ओळखीचा फायदा करून घ्याल. बिझनेस व्यवहार वेळेवर पार पडतील. मोठे आर्थिक निर्णय फायद्याचे ठरतील. नाट्यकलाकार किंवा अभिनेते, निवेदक आणि डान्सर यांनी आज ऑडिशन चुकवू नये. मेटल उत्पादक, बांधकाम व्यावसायिक, वितरक, इन्फ्रास्ट्रक्चर व्यावसायिक, आयटी कर्मचारी, कापड उद्योजक यांना भरपूर आर्थिक फायदा होईल. कृपया हिरव्या पालेभाज्यांचा जेवणात समावेश करा. मांसाहार टाळणं उत्तम. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया लहान मुलांना रोपं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्यामध्ये विविध प्रकारच्या माणसांसोबत काम करण्याचं कौशल्य आहे. त्यामुळे इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक नफा मिळवू शकता. आज गुंतवणूक करण्यात रिस्क घेणं फायद्याचे ठरेल. एखादी दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट व्यवसायात नफा संभवतो. तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा आदर लक्षात घेणं गरजेचं आहे. राजकारण, बांधकाम, अभिनय, शेअर मार्केट, एक्सपोर्ट, डिफेन्स, इव्हेंट, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखती या गोष्टींमध्ये नशीब आजमावण्यासाठी उत्तम दिवस. तुमचा जोडीदार आज पूर्णपणे तुमचा असेल. शुभ रंग : Green and Orange शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरिबांना तांदूळ दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) गायक आणि फायनान्सर यांच्यासाठी आज भाग्याचा दिवस. आज भरपूर काम असेल; मात्र ते आरामात पूर्ण होईल. आजचा दिवस अगदी ऐशोआरामाचा आहे. दिवसाच्या शेवटी भरपूर समाधानी असाल. जोडीदारासोबत असलेले वाद मिटवून एकत्र शॉपिंगला जाल. डिझायनर, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर, शेफ, विद्यार्थी यांना आपापल्या क्षेत्रातील फायद्याच्या दृष्टीने नवीन काम मिळेल. घरात रोमँटिक वातावरण असल्यामुळे आनंदी असाल. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया महिला मदतनीसाला सौंदर्यप्रसाधनं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवायला शिका, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. वकील, सीए, डिफेन्स अधिकारी, ट्रॅव्हलर, इंजिनीअर आणि बिझनेसमन यांना समाजात भरपूर प्रसिद्धी मिळेल. आज सर्व काही सुरळीत पार पडेल. त्यामुळे सहकाऱ्यांवर संशय घेणं टाळा. आज समोर येणारं आव्हान स्वीकारा. त्यावर आरामात मात कराल. कामाच्या ठिकाणी विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला सल्ला खुल्या मनाने स्वीकारा. एखादी व्यक्ती ऑफर करत असलेलं प्रपोझल नक्की स्वीकारा. वकील, नाट्य कलाकार, सीए, सॉफ्टवेअर इंजिनीअर यांच्यासाठी विशेष भाग्याचा दिवस आहे. शुभ रंग : Brown शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 आणि 9 दान : कृपया तांब्याची एखादी वस्तू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घरातल्या कामगारांवर आगपाखड करणं टाळा, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आज पद आणि पैसा दोन्ही तुम्हाला मिळेल. प्रॉपर्टीसंबंधी निर्णय तुमच्या बाजूने असतील. कायदेशीर वाद सोडवण्यासाठी पैशांची गरज भासेल. उत्पादक, आयटी कर्मचारी, सरकारी अधिकारी, ब्रोकर, ज्वेलर्स, डॉक्टर आणि पब्लिक स्पीकर यांना भरपूर यश मिळेल. जोडीदारासोबत वाद संभवतो, त्यामुळे डोकं शांत ठेवा. धान्य दान करणे, आणि संत्री खाणं गरजेचं आहे. शुभ रंग : Deep Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना कपडे दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भाग्य तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे बिझनेसमध्ये रिस्क घेऊ शकता. आज नाव आणि प्रसिद्धी दोन्ही कमावण्याचा दिवस आहे. तुमच्याकडे पाहून इतरांना प्रेरणा मिळते. त्यामुळे त्या दृष्टीने काम करा. प्रेमात असलेल्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस. बिझनेस रिलेशन्स वेगळ्या उंचीवर पोहोचतील. ग्लॅमर आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठ्या संधी मिळतील. प्रशिक्षक, बेकर्स, हॉटेल व्यावसायिक, स्टॉक ब्रोकर्स, डिझायनर, डॉक्टर, वकील, इंजिनीअर आणि अभिनेत्यांना भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया लाल मसूर दान करा. 9 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : हंसिका मोटवानी, महेश बाबू, प्रीतम मोटल, किशोर बियाणी, सावन कुमार टाक
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या