Home /News /astrology /

Numerology : राग, खर्चावर नियंत्रण ठेवा; जन्मतारखेनुसार तुम्ही आज काय करावं आणि काय नको पाहा

Numerology : राग, खर्चावर नियंत्रण ठेवा; जन्मतारखेनुसार तुम्ही आज काय करावं आणि काय नको पाहा

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 6 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तसंच, अति खर्च करण्यावरही नियंत्रण ठेवलं पाहिजे. इतरांच्या कृती जोखण्यासाठी डोळे उघडा. नातेवाईकाच्या माध्यमातून तुमची एखाद्या व्यक्तीशी भेट होईल. त्या व्यक्तीची सरकारदरबारी चांगली ओळख असेल. त्यामुळे तुमच्या कायदेशीर किंवा ऑफिसविषयक समस्या सोडवण्यात त्या व्यक्तीची मदत होऊ शकेल. अभिनेते, ज्वेलर्स, शास्त्रज्ञ, डिझायनर्स, हार्डवेअर ट्रेडर्स आदींना ऑफर मिळेल. त्यांनी ती स्वीकारायला हवी. आकर्षक दिसण्यासाठी चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. वैयक्तिक आयुष्यात समाधानी नसाल; पण संयम राखा. शुभ रंग : Off white & sky blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : आश्रमात सूर्यफूल तेल दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घरातल्या ओल्या जागा पुसत राहा. त्यामुळे चंद्राचे आशीर्वाद मिळतील. तुमच्या मनाच्या निर्मळतेमुळे तुम्ही कायम आकर्षक असता. आजचा दिवस ऑफिसमध्ये जबाबदारी घेण्याचा, एंगेजमेंटचा, नवा बिझनेस सुरू करण्याचा आणि ब्युटिफिकेशनसाठी पैसे खर्च करण्याचा आहे. तुमच्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा रोमँटिक दिवस. बिझनेस कमिटमेंट्स आश्वासक आहेत. शक्य तितकं सोशलायझेशन करा. कामं वाटून देणं टाळा. राजकीय नेत्यांनी विरोधकांपासून सावध राहायला हवं आणि प्रवास टाळायला हवा. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2, 6 दान : गरिबांना गोड दही दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आकर्षणासाठी तुमच्या जेवणात कायम हळदीचा समावेश करा. कोणत्याही क्षेत्रातल्या कलाकारांसाठी कौतुक मिळण्याचा दिवस. नवी रिलेशनशिप सापडेल. नशीब साथ देईल; मात्र रिलेशनशिपकडे गांभीर्याने पाहा. ती भविष्यासाठी उत्तम ठरेल. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, अभिनेते, रेस्तराँचे मालक, गृहिणी, हॉटेलियर्स, लेखक आदींना करिअरच्या विकासाच्या दृष्टीने खास घोषणा होईल. शुभ रंग : Orange & Peach शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : गरजू व्यक्तींना कच्ची हळद दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांमुळे नशिबाचं चाक तुमच्या बाजूने फिरेल. देशभक्तीची भावना आज तुमचा माइंडसेट बदलून टाकेल. समाजासाठी काम करावं, दानधर्म करावा, असं तुम्हाला वाटेल. तुमच्याकडे खूप ज्ञान आहे, दयाळूपणा आहे. त्यामुळे तुम्ही एकमेवाद्वितीय बनता. आज अन्नदान केल्यास जादुई परिणाम दिसतील. बांधकाम, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर, ब्रोकर्स, आदी बिझनेसमधल्या व्यक्तींनी आज करारावर स्वाक्षऱ्या करणं टाळावं. उत्तम प्रोफेशनल लाइफ अनुभवाल. पालकांना आज त्यांच्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रत्येक बुधवारी श्री गणेशमंत्राचं पठण करायला विसरू नका. आज मंदिरात हिरवी पानं अर्पण करा. वैयक्तिक आयुष्यात पूर्णत्व मिळवण्याचा आजचा दिवस आहे. समृद्धी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे. प्रॉपर्टी किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. कारण लवकरच आर्थिक लाभांची शक्यता आहे. क्रीडापटू, चित्रपट दिग्दर्शक, ज्वेलर्स, फायनान्सर्स, निर्यातदार, रिटेल बिझनेसमन, ट्रॅव्हलर्स आदींना चांगलं उत्पन्न मिळेल. मीटिंगमध्ये नशिबाची साथ मिळण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोझ करावं. आज जीवन तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी देणार आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथाश्रमात दूध दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं भावनिक अवलंबित्व आज वाढेल. आजचा दिवस रोमान्सचा आहे. तसंच, तुमच्या कामावर डॉमिनेशन असलेल्या प्रॉमिसेसचा आहे. संधींचा आनंद घेण्याचा, समृद्धी, ऐशोआराम, आदर, सत्ता आदींचा आनंद घेण्याचा आजचा दिवस आहे. आई-वडिलांना मुलांचं सहकार्य मिळेल. मुलांना आई-वडिलांचे आशीर्वाद मिळतील. बऱ्याच जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊ नका. एकाच वेळी तुम्ही सर्वांना खूश करू शकणार नाही. ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी, डॉक्टर्स आदींनी त्यांच्या कौशल्यांचं प्रदर्शन करावं. आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. वडील मुलांना त्यांच्या भविष्याविषयी मार्गदर्शन करतील. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरीब महिलेला बांगड्या दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बिझनेसमध्ये शक्य तितकी जोखीम घ्या. सारं काही तुमच्या नियोजनानुसार होण्याचे संकेत आहेत. आर्थिक निर्णयांसंदर्भात दिवस कृतिशील असेल. कामाच्या ठिकाणी बॉस किंवा ज्येष्ठ व्यक्तींशी वाद टाळा. रिलेशनशिपमध्ये तुमच्या प्रामाणिकपणाला आदर आणि विश्वासरूपाने परतावा मिळेल. आज तुम्ही सर्व डॉक्युमेंट्सवर विश्वास ठेवू शकता. आजचा दिवस निष्ठेला साह्यकारी आहे. सरकारी टेंडर्स, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरिअर्स, धान्य आदी क्षेत्रांत काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोपर्यंत तुम्ही भावनिक होत नाही, तोपर्यंत बिझनेस रिलेशन्स हेल्दी राहतील. शुभ रंग : Orange & Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात तांब्याचं नाणं दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कुटुंबातल्या अन्य सदस्यांना जबाबदाऱ्या वाटून देण्याची वेळ आहे. बिझनेसमधले व्यवहार यशस्वी होतील; मात्र आरोग्याला वेळ द्यायलाही विसरू नका. करार किंवा इंटरव्ह्यू आदींना जरूर उपस्थित राहायला हवं. आज कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत केल्याने समृद्धी मिळेल. आज बाहेर खाणं टाळा. आज पैशांचं संतुलन साधलं जाईल आणि प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गायींना हिरवं धान्य खाऊ घाला. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ग्लॅमर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना नवं यश मिळेल. क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अचीव्हमेंट्सचा आणि अप्रैझलचा असेल. जुने मित्र किंवा पीअर्सना भेटून बिझनेस किंवा जॉबमध्ये अधिकारपद मिळवण्यासाठी चांगला दिवस. कारण चांगला प्रतिसाद वाट पाहत आहे. दिवसाची सुरुवात करताना लाल रंगाचे कपडे घालावेत. धातू क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी लायाबिलिटीज स्वीकाराव्यात. कारण भविष्यात फायद्याचं ठरू शकेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : मंदिरात कुंकू दान करा. 6 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : दीपिका कक्कर, आदित्य नारायण, अभिषेक कपूर, धान्या बालकृष्णा, सायरस साहूकार, राजेंद्रसिंह, जी. परमेश्वरा
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या