मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /नोव्हेंबर महिना या चार राशींसाठी धोकादायक, धनहानीचे संकेत

नोव्हेंबर महिना या चार राशींसाठी धोकादायक, धनहानीचे संकेत

 जवळपास प्रत्येकालाच आपल्या भविष्यात (November Astrology) काय आहे हे जाणून घ्यायला आवडतं. काही चांगलं घडणार आहे का? किंवा काही वाईट घटनांचे संकेत मिळत आहेत का? याबद्दल जाणून घ्यायला अनेक जण उत्सुक असतात.

जवळपास प्रत्येकालाच आपल्या भविष्यात (November Astrology) काय आहे हे जाणून घ्यायला आवडतं. काही चांगलं घडणार आहे का? किंवा काही वाईट घटनांचे संकेत मिळत आहेत का? याबद्दल जाणून घ्यायला अनेक जण उत्सुक असतात.

जवळपास प्रत्येकालाच आपल्या भविष्यात (November Astrology) काय आहे हे जाणून घ्यायला आवडतं. काही चांगलं घडणार आहे का? किंवा काही वाईट घटनांचे संकेत मिळत आहेत का? याबद्दल जाणून घ्यायला अनेक जण उत्सुक असतात.

  मुंबई, 7 नोव्हेंबर : जवळपास प्रत्येकालाच आपल्या भविष्यात (November Astrology) काय आहे हे जाणून घ्यायला आवडतं. काही चांगलं घडणार आहे का? किंवा काही वाईट घटनांचे संकेत मिळत आहेत का? याबद्दल जाणून घ्यायला अनेक जण उत्सुक असतात. तसंच राशीनुसार आपल्या भविष्यात काय आहे, हे समजून घेणं अनेकांना आवडतं. महिन्याच्या सुरुवातीलाच भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज आला, तर त्याप्रमाणे मानसिक तयारीही करणं काही जणांना सोपं जातं.

  वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी सांगितल्या आहेत. या प्रत्येक राशीचा राशीस्वामी विशिष्ट ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांवरून राशिफळ किंवा राशीभविष्य काय असेल याचा अंदाज बांधला जातो. नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. म्हणजेच एका राशीतून हे ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. ग्रह-नक्षत्रांच्या परिवर्तनाचा थेट परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो. आता नोव्हेंबर महिन्यात राहिलेल्या 25 दिवसांत कोणत्या राशीच्या व्यक्तींना अधिक सावध राहण्याची गरज आहे, हे जाणून घेऊ या.

  वृश्चिक : मन अशांत राहील. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. व्यवसायाकडे लक्ष द्या. संकटांचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्न कमी होऊ शकतं. अधिक कष्ट करावे लागतील. 17 नोव्हेंबरपासून धीर थोडा कमी होईल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. 21 नोव्हेंबरपासून शिक्षणात प्रगती होईल.

  मीन : मन अशांत राहील. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. व्यवसायात संकटं येतील. कौटुंबिक आयुष्यात कष्ट वाढू शकतील. शिक्षणाकडे लक्ष द्या. घराच्या सजावटीवरील खर्च वाढू शकतो. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते.

  वृषभ : मन चिंतातुर होईल. मानसिक शांतता मिळवण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या आरोग्यकडे लक्ष द्या. शिक्षणात अडथळे येऊ शकतात. 16 नोव्हेंबरनंतर आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. दैनंदिन आयुष्य सुरळीत होईल. घरात-कुटुंबामध्ये धार्मिक कार्यं होतील. गोड खाण्याची आवड वाढेल. तब्येतीची काळजी घ्या.

  कर्क : मनात आशा-निराशेची आंदोलनं सुरू राहतील. व्यवसायात सतर्क राहा, काळजी घ्या. पैशांची कमतरता जाणवेल. 17 नोव्हेंबरपासून संयम ठेवा. थोडा धीर खचेल. आरोग्याची काळजी घ्या. 21 नोव्हेंबरपासून शिक्षण क्षेत्रात अडथळे जाणवतील. घरात-कुटुंबात धार्मिक कार्यं होतील. घराची देखभाल, दुरुस्ती आणि सजावटीवरचा खर्च वाढू शकतो.

  एकूणच, या चार राशींच्या व्यक्तींनी जरा सांभाळून राहावं, म्हणजे दिवस आनंदात जातील.

  First published:

  Tags: Astrology and horoscope