Home /News /astrology /

Horoscope 2021 Libra : तूळ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर ठेवा अंकुश

Horoscope 2021 Libra : तूळ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर ठेवा अंकुश

Rashifal: तूळ किंवा Libra राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवण्याला पर्याय नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. काय आहे या राशीचं वार्षिक भविष्य?

    येणाऱ्या 2021 या नव्या वर्षात (new year 2021) तूळ राशीसाठी (Libra) परिस्थितीचं चित्र काय असेल ते आम्ही सविस्तर सांगतो आहोत. करिअर आणि व्यवसाय (Career and business) हे वर्ष या राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी बर्‍याच उत्कृष्ट संधी समोर आणणारं असेल. तुमची कामगिरी अतिशय चांगली राहील. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, आपण कठोर परिश्रम करालच. मात्र, यावर्षी आपला रागदेखील जास्त प्रमाणात प्रकट होऊ शकतो. यामुळे कामात चुकाही होऊ शकतात. म्हणून रागावर नियंत्रण ठेवण्याला पर्याय नाही. हे वर्ष या राशीच्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी बरं जाईल. पण जे लोक भागीदारीने व्यवसाय करतात त्यांनी सावधगिरी बाळगावी. कागदपत्राच्या व्यवहारात विशेषतः सावधगिरी बाळगा. आर्थिक आणि कौटुंबिक जीवन वर्षाच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत या राशीच्या लोकांचे आर्थिक जीवन खूप चांगले राहील. त्यानंतर मात्र तुमच्या खर्चात अचानक वाढ दिसून येईल. या काळात तुम्ही एक चांगली बजेट योजना तयार केली पाहिजे. नाहीतर हा पैसा कुठे आणि केव्हा खर्च झाला हे तुम्हाला कळणारही नाही. या सगळ्यात तुमची आर्थिक बाजू डळमळीत होऊ शकते. यावर्षी कौटुंबिक पातळीवर तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आईची तब्येतही बिघडण्याची शक्यता आहे, तिची काळजी घ्या. मात्र असं असलं तरी, वर्षाच्या चौथ्या महिन्यात, कुटुंबात नक्कीच काही सकारात्मक बदल होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन या राशीच्या लोकांचं प्रेम जीवन यंदा समृद्ध राहील. आपण प्रियकर किंवा प्रेयसीबरोबर वेळ घालवण्याच्या संधी शोधत रहाल. यासोबतच आपण यंदा आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या रोमँटिक ठिकाणी भेट देण्याचा प्लॅनही आखू  शकता. या राशीच्या विवाहित व्यक्तींना या वर्षाच्या सुरूवातीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीबाबत वाद होण्याची शक्यता आहे. यावर्षी आपल्या जोडीदाराला मनातल्या गोष्टी सांगण्याऐवजी त्याच्या भावना ऐकण्यावर भर द्या. वर्षाच्या मध्यावधीत वैवाहिक जीवनात सकारात्मकता येऊ शकते. गैरसमज दूर करण्यासाठी जोडीदारासह क्वालिटी टाईम घालवा. शिक्षण आणि आरोग्य या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले असेल. तुमची स्मरणशक्ती चांगली राहील आणि कठीण विषयसुद्धा तुम्ही सहज समजून घ्याल. जे उच्चशिक्षण घेत आहेत त्यांना या काळात इच्छित यश मिळू शकते. तुळ राशीच्या लोकांना यंदा त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. वाईट दर्जाचं अन्न तुमचं आरोग्य खराब करू शकतं. या कालावधीत घराबाहेरचं अन्न खाणं टाळा. संतुलित आहार आपल्या अनेक समस्या दूर करत निरोगी बनवू शकतो. नव्या वर्षाच्या तुम्हाला सदिच्छा!
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Career, New year, Rashibhavishya

    पुढील बातम्या