मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल कसा असेल तुमचा 23 मार्चचा दिवस?

Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल कसा असेल तुमचा 23 मार्चचा दिवस?

Numerology किंवा अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. 23 मार्च 2022 चा तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या.

Numerology किंवा अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. 23 मार्च 2022 चा तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या.

Numerology किंवा अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. 23 मार्च 2022 चा तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या.

पत्रिकेप्रमाणेच अंकशास्रालाही ज्योतिषात महत्त्व आहे. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. 23 मार्च 2022 चा तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या.

# दिनांक 1 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1,10,19,28 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

व्यावसायिक वचनबद्धतेची आज कायदेशीररीत्या पडताळणी करणं आवश्यक आहे. कुठल्या तरी कारणामुळे कामांना उशीर होत आहे. वैयक्तीक आयुष्यातदेखील आज तुमचा मूड चांगला नसेल.

शुभ रंग - नारंगी (Orange)

# दिनांक 2 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2,12, 20, 29 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज महिलांना आपल्या नेतृत्वगुण सिद्ध करता येईल. पुरुषांना त्यांच्या आत्मविश्वासामुळे आनंद मिळेल. मात्र, तरीही त्यांना त्यांच्या कामाचा रिझल्ट मिळण्यास उशीर होईल.

शुभ रंग - सी ग्रीन (Sea Green)

# दिनांक 3 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3,12, 21,30 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पणाची आवश्यकता असेल. नात्यांमध्ये संवाद साधला गेला नाही तर त्याचा त्रास होईल, त्यामुळे आज मौन बाळगू नये.

शुभ रंग - नारंगी (Orange)

# दिनांक 4 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4,13, 22, 31तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

एखादी योजना आखण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे परंतु, त्या अंमलात आणू नका. आजचा दिवस काहीसा कंटाळवाणा आणि दिशाहीन वाटू शकतो.

शुभ रंग - हिरवा (Green)

# दिनांक 5 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 5,14,23 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नातेसंबंधांचा रमण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही सर्व सुखसोयींसह एखाद्या छोट्या ट्रिपसाठी जाऊ शकाल.

शुभ रंग - सी ब्लू (Sea Blue)

# दिनांक 6 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6,15,24 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आजची सर्व कामं पूर्ण होतील आणि तुम्हाला एखाद्या हिरोप्रमाणं ओळख मिळेल.

शुभ रंग - आकाशी (Sky Blue)

# दिनांक 7 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सभोवताली असणाऱ्या प्रेम आणि आपुलकीमुळे आज तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होऊ शकतील. आज पिवळ्या रंगाच्या डाळी दान करायला विसरू नका.

शुभ रंग - नारंगी (Orange)

# दिनांक 8 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 8,17,26 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचा आत्मविश्वास आज तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर येण्यास मदत करेल. मुक्या जनावरांसाठी दानधर्म करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

शुभ रंग - हिरवा (Green)

# दिनांक 9 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9,18,27 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी किंवा मुलाखत देण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरुण लोकांकडे आज त्यांच्या जोडीदारांना प्रभावित करण्याची संधी आहे.

शुभ रंग - ब्राऊन (Brown)

23 मार्चला जन्मलेल्या सुप्रसिद्ध व्यक्ती - कंगना रनौत (Kangana Ranaut), स्मृती इराणी (Smriti Irani), किरण मुजुमदार-शॉ (Kiran Mazumdar Shaw), राम मनोहर लोहिया (Ram Manohar Lohia), अरमान कोहली (Armaan Kohli).

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya