मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

देवीच्या आशीर्वादाने कुणाला काय मिळणार? नवरात्रीतील शेवटच्या दिवसाचं राशिभविष्य

देवीच्या आशीर्वादाने कुणाला काय मिळणार? नवरात्रीतील शेवटच्या दिवसाचं राशिभविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज आश्विन शुक्ल नवमी. महानवमी पारणे. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 04 ऑक्टोबर 2022 वार मंगळवार. आज आश्विन शुक्ल नवमी. महा नवमी पारणे. आज देवीचे सिद्धिदात्री या स्वरूपात पूजन केले जाईल. आज नवरात्रोत्थापन सायंकाळनंतर करावे. आज चंद्र मकर राशीत भ्रमण करेल. तिथे तो शनीसोबत विष योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य.

मेष

आर्थिक घडामोडींना वेग येईल. काही कर्ज वगैरे देऊ नका. प्रवास योग येतील. मानसिक द्वंद्व जाणवेल. कार्यालयीन कामकाज सुरळीत राहिल. लाभ होतील. दिवस उत्तम.

वृषभ

आयुष्यात नवीन शुभ घटनांची सुरवात होईल. रवी, बुध आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देतील. गुरू महाराज काही नवीन जबाबदारी निर्माण करतील. परदेशसंबंधी घटना घडतील. दिवस शुभ.

मिथुन

चंद्र शनी मानसिक अशांती निर्माण करेल. आज कुठलाही आर्थिक व्यवहार जपून करा. परदेशबाबत शुभ फल मिळेल. लाभ होतील. दिवस शांततेत घालवा.

कर्क

आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. सप्तम स्थानात चंद्र शनी कार्यालयीन कामात जपा, असे संकेत देत आहे. दिवस शुभ आहे.

सिंह

राशी स्वामी रवी सध्या सकारात्मक मानसिकता देईल. शरीरात ऊर्जा वाटेल. चंद्र शनी कार्यक्षेत्रात विशेष घटना घडेल. आज दिवस उत्तम जाईल.

कन्या

पंचम चंद्र शनीसोबत असून आज संततीविषयक काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी होईल. दिवस चांगला.

तूळ

घरात अशांतता निर्माण होईल असं वागू नका. कलह टाळा. जास्तीचं काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील. आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. पूजनात दिवस घालवा.

वृश्चिक

अतिशय धावपळीचा असा हा दिवस असणार आहे. खूप महत्त्वाचे निर्णय, फोनवर संवाद होतील. पण प्रवास टाळा. नुकसान होईल. दिवस बरा आहे.

धनु

आर्थिक बाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे. काही व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. संततीला काही अडचणी येतील. दिवस मध्यम.

मकर

वक्री शनी, सोबत चंद्र आहे. दिवस जरा मध्यम जाईल. मन काहीसं उदास राहिल. जोडीदाराची मदत घ्या. संततीला जपा. घरात जास्तीचं काम निघेल. दिवस संथ आहे.

कुंभ

व्यय स्थानात झालेली शनी ग्रहाची वक्री स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. व्यय चंद्र आहे. प्रवास होतील. द्वितीय गुरू परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल. दिवस मध्यम आहे.

मीन

आज दिवस नातेवाईकांना भेट, मेजवानी करण्याचा आहे. काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत रहा. कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. आर्थिक लाभ होतील. प्रवास टाळा. दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs