मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : धार्मिक कार्य करा, आर्थिक लाभ होईल; राशीनुसार तुमचं आजचं भविष्य

दैनंदिन राशिभविष्य : धार्मिक कार्य करा, आर्थिक लाभ होईल; राशीनुसार तुमचं आजचं भविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज आश्विन शुक्ल सप्तमी. आज गुरू-चंद्र शुभ योग होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 02 ऑक्टोबर 2022. रविवार, तिथी आश्विन शुक्ल सप्तमी. आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. आज गुरू-चंद्र शुभ योग होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीतले राहू आणि धन स्थानातील मंगळ सात्विक आचरण करा असं सांगत आहेत. चंद्र भाग्य स्थानात प्रकृतीला आराम देईल. गुरूदेखील व्ययात आहे, धार्मिक कामासाठी वेळ द्यावा लागेल. दिवस मध्यम.

वृषभ

चंद्र तुम्हाला व जोडीदाराला आर्थिक भरभराट देईल. स्वतःवर खर्च कराल. घरासाठी चैनीच्या वस्तू खरेदी कराल. धार्मिक कामासाठी वेळ द्याल. दिवस उत्तम आहे.

मिथुन

दशम स्थानात गुरू आर्थिक आणि मानसिक लाभ देईल. जोडीदाराशी काही तरी कुरबुर होईल. व्यवसाय वृद्धीचे संकेत आहेत. प्रकृती ठिक राहिल. दिवस शुभ.

कर्क

आज दिवस कुटुंबीयांसोबत, संततीसोबत घालवा. स्वतःला वेळ द्या. काही आर्थिक प्रश्न सोडवावे लागतील. धार्मिक आस्था वाढीस लागेल. दिवस उत्तम आहे.

सिंह

चंद्र सामाजिक क्षेत्रात नाव करील. काही चिंता असेल तर ती आता दूर होईल. घरामध्ये समारंभ होतील. नोकरीसाठी उत्तम काल. जोडीदार आनंदी राहिल. दिवस मध्यम.

कन्या

आज दिवस खूप काही नवीन घटना घेऊन येईल. थोडी हुरहूर मनात राहिल. चंद्र कामाचा ताण देईल. घरामध्ये काही नवीन बदल कराल. जोडीदारासोबत खरेदी होईल. दिवस मध्यम आहे

तूळ

आज दिवस संपर्क, प्रवास घडवून आणेल. संतती सुख मिळेल. सूर्य बुध काही विशेष अनुभव देईल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस मध्यम.

वृश्चिक

आज कार्यालयीन प्रश्नांचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. जास्त दगदग करू नका. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला.

धनु

आज राशी स्थानात चंद्र कुटुंबात ताण निर्माण करेल. आर्थिक देणेघेणे होईल. नातेवाईक भेट होण्याचे संकेत आहेत. दिवस उत्तम.

मकर

आजचा दिवस हा घर आणि कुटुंब यांना वेळ देण्याचा आहे. बंधुभेट होईल. व्यय चंद्र प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक बाजू ठिक राहिल. दिवस मध्यम आहे.

कुंभ

शनी घरात काही खास अनुभव देईल. आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. संततीचे सुख मिळेल. घरात जास्तीची काम निघतील. आर्थिक घडामोडी घडतील. आनंदात दिवस जाईल.

मीन

आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल. भावंडं भेटतील. महत्त्वाचे निरोप मिळतील.  राशीतील गुरू आणि तृतीय मंगळ भावंडाना आर्थिक प्राप्ती करून देतील. दिवस शुभ आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs