मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

देवीच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट होणार; पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

देवीच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट होणार; पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

ऑक्टोबर महिन्याचा पहिला आणि नवरात्रीचा सहावा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार पाहा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 1 ऑक्टोबर 2022 शनिवार. आज आश्विन शुक्ल षष्ठी. आज सहावी माळ असून चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात भ्रमण करेल. आज आदिमायेचे कात्यायनी स्वरूप पूजलं जाईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

चंद्र मित्रमैत्रिणी आणि प्रवास बाबतीत आज शुभ फळ देईल. राशीतील राहू मानसिक क्लेश देईल त्यादृष्टीने सावध असावं. द्वितीय मंगळ आर्थिकदृष्ट्या जपून रहा असे संकेत देत आहे. कुटुंबासोबत आनंदात दिवस व्यतीत होईल. दिवस मध्यम.

वृषभ

आज राशीच्या सप्तम स्थानातील चंद्र कार्यक्षेत्रात काही विशेष लाभ मिळवून देईल. आनंद मिळेल. वैवाहिक जीवन सुखद राहिल. पंचम शुक्र घरात उत्तम खरेदीचे योग आणेल. उत्तम दिवस.

मिथुन

चंद्र भ्रमण भाग्य योग करीत आहे, उच्च प्रतीचे कौटुंबिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. आर्थिक बाजू उत्तम. व्यय मंगळ खर्च वाढवेल.दिवस उत्तम जाईल.

कर्क

पंचम स्थानातील चंद्र आणि तृतीय शुक्र काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन आनंदी होईल. मित्रमंडळ भेटेल. लाभाचे योग येतील. मात्र खर्च ही होईल. दिवस शुभ.

सिंह

आज चतुर्थ चंद्र गृह सुख, प्रकृती बाबत कष्ट देईल. मन अस्थिर राहिल. आर्थिक सुख लाभेल. वाचन, लेखन यात वेळ घालवा. संतती आनंदी राहिल. दिवस मध्यम.

कन्या

आज चंद्र तृतीय स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही व्यग्र राहाल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू विवाह जमण्याकरता मदत करेल. दिवस मध्यम.

तूळ

आज चंद्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक भरभराट होईल. संततीचे मन सांभाळा. प्रकृती जपा. दिवस शुभ.

वृश्चिक

आज मानसिक ताणात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी मध्यम फळ देईल. निरुत्साह वाटेल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार मदत करेल. दिवस मध्यम.

धनु

आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

मकर

शनी मकर राशीमध्ये वक्री असून ताणतणाव निर्माण करील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. उत्तम दिवस.

कुंभ

दशम चंद्र योग आज दिवस आनंदात घालवा असं सुचवत आहे. कार्यक्षेत्राकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. सामाजिक प्रतिष्ठा. आर्थिक लाभ. दिवस शुभ.

मीन

आज चंद्र मानसिक स्थैर्य देईल. मन घरामध्ये काही विशेष घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. खर्च संभवतात. भावंडाना त्रास. दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs