Home /News /astrology /

'या' राशींसाठी पुढचा महिना ठरणार फायद्याचा, होईल मोठा धनलाभ; वाचा जुलै महिन्याचं राशीभविष्य

'या' राशींसाठी पुढचा महिना ठरणार फायद्याचा, होईल मोठा धनलाभ; वाचा जुलै महिन्याचं राशीभविष्य

जुलै महिन्यात ज्योतिषशास्त्रानुसार बऱ्याच घडामोडी घडत आहेत.

मुंबई, 02 जुलै: आजपासून जुलै महिना सुरू होतो आहे. या महिन्यात ज्योतिषशास्त्रानुसार बऱ्याच घडामोडी घडत आहेत. शनी आणि गुरूसारखे मोठे ग्रह आपली चाल बदलत आहेत. तसंच कित्येक ग्रहांचं दुसऱ्या राशींमध्ये गोचर होत आहे. यामुळे हा महिना कित्येक राशींसाठी फायद्याचा ठरणार आहे. मेष, वृषभ, मिथुन यांसह आणखी काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर, कन्या राशीच्या लोकांना नवी गाडी वा घर खरेदी करण्याचे योग आहेत. महर्षि कपि गुरुकुलचे संस्थापक ज्योतिषाचार्य आलोक अवस्थी ‘वेदाश्वपती’ यांनी या महिन्याचं 12 राशींचं राशिभविष्य सांगितलं आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पाहूयात सर्व राशींसाठी हा महिना कसा असेल. मेष : मेष राशीच्या (Aries July horoscope) व्यक्तींची आर्थिक स्थिती या महिन्यात उत्तम असणार आहे. मात्र, खर्चही त्याच प्रमाणात होत राहील. वैवाहिक संबंधांमध्ये विवाद होण्याची शक्यता आहे. भूतकाळात दिलेली वचनं, किंवा भूतकाळातील नातेसंबंध यांमुळे तणाव निर्माण होईल. यासाठी केतू ग्रहाचा प्रभाव कारणीभूत ठरेल. व्यवसायाच्या दृष्टीने छोटीशी सहल कराल, जी फायद्याची ठरेल. वृषभ : जुलै महिन्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना (Taurus July horoscope) नोकरीमध्ये आर्थिक फायदा संभवतो. जोडीदाराशी वाद-विवाद होतील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आई-वडिलांची साथ आणि मार्गदर्शन लाभेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाग्याचा महिना. गुप्तशत्रू तुमचं नुकसान करण्याच्या प्रयत्नात असतील, सावध रहा. मिथुन : मिथुन राशींच्या व्यक्तींनाही (Gemini July horoscope) जुलै महिन्यात आर्थिक फायदा होईल. भूतकाळातील एखाद्या गुंतवणुकीतून वा रखडलेल्या व्यवहारांतून फायदा मिळू शकतो. या महिन्यात कुटुंबीयांसोबत अधिक वेळ व्यतीत कराल. कामाच्या ठिकाणी व समाजात पत-प्रतिष्ठा वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. कर्क : या राशीच्या व्यक्तींना (Cancer July Horoscope) जुलै महिन्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास भरपूर राहील. कुटुंबाचं प्रेम मिळेल, भावनिक अनुभव येतील. जमिनीशी संबंधित प्रकरणं कोर्टात जाण्याची शक्यता आहे. स्पर्धांमध्ये तुम्हाला यश मिळेल. सिंह : या राशीच्या व्यक्तींनी जुलैमध्ये (Leo July horoscope) आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एखादा जुना आजार पुन्हा उफाळून येऊ शकतो. लक्ष्मीदेवीची कृपा राहील, मात्र काही आव्हानांमुळे कामात विलंब होण्याची शक्यता आहे. या महिन्यात कोणताही वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कुटुंबामध्ये एकी दिसेल, एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन कराल. शिक्षण किंवा स्पर्धेमध्ये मोठं यश मिळेल. कन्या : जुलै महिन्यात नवीन गाडी, घर इत्यादी खरेदी करण्याचे योग (Virgo July horoscope) आहेत. व्यवसाय वाढीमुळे खर्चदेखील अधिक असेल. वैवाहिक जीवनात एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या आगमनामुळे समस्या वाढतील. आर्थिक व्यवहार करताना खबरदारी बाळगा. आरोग्य उत्तम राहील. तूळ : तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात परदेशवारीचे योग (Libra July horoscope) आहेत. मान-सन्मान, उच्च पद लाभण्याची शक्यता आहे. एखादा मोठा गुंतवणुकीचा निर्णय घेणं सध्या टाळा. या महिन्यात गुरू ग्रहाचा प्रभाव असेल, त्यामुळे प्रेमसंबंधांची नवी सुरूवात होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये अधिक खर्च करणं टाळा. वातावरणातील बदलामुळे तब्येतीच्या समस्या जाणवतील. वृश्चिक : या महिन्यात (Scorpio July horoscope) संपत्तीच्या कारणांमुळे भांडण-तंटे होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवी आव्हानं येतील. वैवाहिक जीवनात भाग्य तुमच्यासोबत असेल. कुटुंबामध्ये नवा सदस्य येण्याची शक्यता आहे. या महिन्यात प्रवास करताना वा वाहन चालवताना खबरदारी घेण्याची गरज आहे. धनु : हा महिना बराच धावपळीचा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी खांद्यावर पडेल, अर्थात त्या प्रमाणात धनलाभ (Sagittarius July horoscope) होईल. अतिघाई केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्य समस्यांमुळे खर्च आणि ताण वाढेल. मकर : सुरू असलेल्या कामांमध्ये अचानक अडथळे येण्याची शक्यता (Capricorn July horoscope) आहे. बोलण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे, अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात. मुलांमुळे कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. विशेषतः रक्तदाब असलेल्या रुग्णांची अधिक खबरदारी घ्या. कुंभ : जुन्या योजना या महिन्यात पूर्ण होतील. व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून मोठा धनलाभ (Aquarius July horoscope) मिळवाल. परदेशवारी किंवा लांबच्या प्रवासातून चांगली कमाई होईल. वैवाहिक जीवन सुखी राहील. वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. मीन : मीन राशीच्या व्यक्तींसाठी (Pieces July horoscope) जुलै महिना फायद्याचा ठरणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये एखाद्या मंगलकार्यामुळे प्रसन्न वातावरण राहील. लॉटरीमधून धनलाभ संभवतो. विवाहाचा विचार करत असाल, तर या महिन्यात यश मिळेल. आईकडून किंवा आजोळच्या व्यक्तीकडून मोठं गिफ्ट मिळेल. एकूणच, जुलै महिन्यात अनेक राशीच्या व्यक्तींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर, काही राशीच्या व्यक्तींनी तब्येत जपण्याची गरज आहे.
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या