मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra: अडकलेले पैसे असो वा पैशांची चणचण आज 'हे' उपाय कराल तर होईल फायदा

Money Mantra: अडकलेले पैसे असो वा पैशांची चणचण आज 'हे' उपाय कराल तर होईल फायदा

आर्थिक राशिभविष्य

आर्थिक राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (4 डिसेंबर 2022) राशिभविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (4 डिसेंबर 2022) राशिभविष्य.

मेष (Aries) : व्यवसायासंबंधी कागदपत्रं आणि फाइल जपून ठेवा, त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण यासंबंधी तुमची चौकशी होऊ शकते. तुम्ही करीत असलेल्या कामाचा अधिक विचार करण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम करावं लागू शकतं.

उपाय : श्री हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर अर्पण करा.

वृषभ (Taurus) : ऑफिसमध्ये काही अडचणी आणि गुंतागुंत होऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं चांगलं. आर्थिक स्थिती सामान्य राहील. नोकरदारांवर कामाचा अतिरिक्त ताण येऊ शकतो.

उपाय : देवी सरस्वतीची पूजा करा.

मिथुन (Gemini) : व्यवसायाशी संबंधित सार्वजनिक व्यवहार, संपर्क स्रोत मजबूत करण्यावर भर द्या. मोठी ऑर्डर मिळू शकते. भागीदाराशी संबंधित व्यवसायात तुम्हालाच बहुतांश निर्णय घ्यावे लागतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामापुरते काम ठेवावे, फार संबंध वाढवू नयेत.

उपाय : योग, प्राणायामाचा सराव करा.

कर्क (Cancer) : व्यावसायिक कामं पूर्ण करण्यात अडचणी येतील. अशावेळी तुमच्या कार्यपद्धतीत काही बदल करण्याची गरज आहे. नोकरीच्या ठिकाणी कौटुंबिक तणावामुळे कामावर परिणाम होऊ देऊ नका. मार्केटिंगशी संबंधित कामावर विशेष लक्ष द्या.

उपाय : भगवान शिव चालिसाचं पठण करा.

सिंह (Leo) : मार्केटिंग संबंधित काम किंवा कोणत्याही प्रकारचा नियोजित प्रवास पुढे ढकला. मशिनरी आणि मोटर पार्ट्सशी संबंधित व्यवसायात उत्कृष्ट ऑर्डर मिळतील. एखाद्याला पैसे उधार दिल्यानं तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे सावध राहा.

उपाय : सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या.

कन्या (Virgo) : व्यावसायिक कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही करीत असलेल्या कामाच्या तसेच व्यावसायिक कामाच्या दर्जाकडे अधिक लक्ष द्या. टॅक्स संबंधित सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवा. कारण निष्काळजीपणामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात.

उपाय : भगवान गणेशाची आराधना करा.

तूळ (Libra) : तुम्ही काही काळ व्यावसायिक कामात खूप मेहनत करत होता, आज त्याचे सकारात्मक परिणाम समोर येतील. कुटुंबातील वरिष्ठांचे सहकार्य आणि सल्ला तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल. परंतु कोणतीही कामासंबंधी नवीन योजना बनवण्यासाठी ही योग्य वेळ नाही. फक्त चालू क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करा.

उपाय : भगवान श्री हनुमान चालिसा पाठ करा.

वृश्चिक (Scorpio) : व्यवसायात गाफिल राहू नका. नुकसानाची परिस्थिती निर्माण होत आहे. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. गैरसमजामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. तुमच्या व्यवसायावर जास्त पैसा खर्च करू नका, सध्या परिस्थिती अनुकूल नाही.

उपाय : भगवान श्री हनुमान चालिसा पाठ करा.

धनू (Sagittarius) : व्यावसायिक कामांत इतरांच्या मागे न जाता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कारण दुसऱ्याच्या चुकीचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो. ऑफिसमधील फाइल्स आणि कागदपत्रं सुरक्षित ठेवा.

उपाय : गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

मकर (Capricorn) : मालमत्तेशी संबंधित किंवा कोणत्याही विशिष्ट कामाशी संबंधित व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. ऑर्डर थांबवल्यानं नुकसानदेखील होऊ शकते. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतल्यास फायदा होईल.

उपाय : मुंग्यांना पीठ खायला द्या.

कुंभ (Aquarius) : ग्रहांचे संक्रमण अनुकूल राहील. आज सार्वजनिक व्यवहार, मीडिया, मार्केटिंग इत्यादींशी संबंधित व्यवसाय फायदेशीर स्थितीत असतील. कामाच्या प्रचंड ताणामुळे कार्यालयीन कामे घरी केल्याने वैयक्तिक कामे पुढे ढकलावी लागतील.

उपाय : भगवान श्री गणेशाची आराधना करा.

मीन (Pisces) : नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे वर्चस्व कायम राहील. मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित कामापासून दूर राहा. या वेळी फायदा होण्याची शक्यता आहे. या सकारात्मक परिस्थितीचा योग्य वापर करा.

उपाय : योग प्राणायामाचा सराव करा.

First published:

Tags: Horoscope, Money