Home /News /astrology /

Money Mantra: आज बिनधास्त सुरु करा नवी कामं; भाग्य 'या' राशींसोबत; अशी असेल आर्थिक बाजू

Money Mantra: आज बिनधास्त सुरु करा नवी कामं; भाग्य 'या' राशींसोबत; अशी असेल आर्थिक बाजू

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (31 जुलै 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (31 जुलै 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल. केवळ गरजेच्या वस्तूंवरच खर्च करावा लागेल. तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. दैनंदिन उत्पन्न स्थिर राहील. बिझनेस पार्टनरशिप नफा देणारी ठरेल.

वृषभ (Taurus) : आज नवी कामं सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. ऑफिसमधलं वातावरण थोडं अस्वस्थ असेल. बॉसशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण न ठेवल्यास तुम्हाला सगळं अवघड होईल.

मिथुन (Gemini) : घरातल्या कामाच्या उपकरणांमध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी खर्च होईल आणि घरखर्च वाढेल. वाहनांचे अपघात होऊ शकतील. त्यामुळे प्रचंड सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. योग्य विचार केल्याशिवाय कुठेही तुमच्या पैशांची गुंतवणूक करू नका.

कर्क (Cancer) : आज तुम्हाला प्रवास करण्याची गरज भासेल; मात्र सर्व ट्रिप्स यशदायी ठरतीलच असं नाही. वर्किंग प्रोफेशनल्सना आजचा दिवस बऱ्यापैकी आव्हानात्मक असेल. त्यांना नेहमीपेक्षा अधिक कष्ट करावे लागतील.

सिंह (Leo) : तुमचं दैनंदिन उत्पन्न वाढल्यामुळे तुम्हाला आर्थिक विकासाचा अनुभव घेता येईल. तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळू शकेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आजचा दिवस खूपच लकी आहे.

कन्या (Virgo) : कायदेविषयक प्रकरणं सोडवली जातील. खर्च कमी होतील आणि तुम्ही बचत किंवा गुंतवणुकीबद्दल विचार करू शकाल. तुम्हाला त्रासदायक ठरणारी छोटी कर्जं तुम्ही फेडू शकाल.

तूळ (Libra) : व्यावसायिक व्यक्तींना चांगला नफा होईल. अन्य दिवसांच्या तुलनेत उत्पन्न चांगलं असेल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल; मात्र तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल.

वृश्चिक (Scorpio) : काही जण जवळच्या व्यक्तींच्या साह्याने नवं व्हेंचर सुरू करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं रेप्युटेशन वाढेल आणि समाजात तुमचा आदर केला जाईल. आर्थिक स्थिरतेची अपेक्षा करू शकता.

धनू (Sagittarius) : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला लहान मुलांवर बऱ्यापैकी खर्च करावा लागेल. तुमच्या जोडीदारालाही चांगलं उत्पन्न मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. त्यामुळे तुमचा खर्च वाढू शकेल.

मकर (Capricorn) : तुम्ही आज गरजू व्यक्तींना मदत करायलाच हवी. त्याचा तुम्हाला भविष्यात उपयोग होईल आणि तुम्हाला मदतीची गरज असेल, तेव्हा मदत मिळेल. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या आरोग्यासाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius) : तुम्ही जॉबच्या शोधात असलात, तर आज तुम्हाला चांगला जॉब मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या कामात अडथळे तयार करणाऱ्यांपासूनही सावध राहा.

मीन (Pisces) : सामाजिक कार्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्तींच्या नजरेत तुमच्याप्रति आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी जागेत बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल आणि राहणीमानात सुधारणा होईल.


First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या