मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून कसा असेल तुमचा उद्याचा दिवस; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून कसा असेल तुमचा उद्याचा दिवस; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (29 जुलै 2022) राशिभविष्य

Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (29 जुलै 2022) राशिभविष्य

Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (29 जुलै 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (29 जुलै 2022) राशिभविष्य.

मेष (Aries) : तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल. विनाकारण खर्च केल्यास समस्या वाढतील. व्यावसायिकांना आज तोटा सहन करावा लागेल. कामाच्या ठिकाणचे विरोधक तुमच्या कामावर परिणाम करण्याचा प्रयत्न करतील. ऑफिसमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल.

वृषभ (Taurus) : तुमच्या आर्थिक समस्या सोडवल्या जातील. तुमची सगळी प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी मित्र तुम्हाला मदत करील. आज प्रवास करणं फायद्याचं ठरेल.

मिथुन (Gemini) : दैनंदिन उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला आंतरराष्ट्रीय ट्रिपची संधी मिळू शकेल. करिअरशी संबंधित निर्णयांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

कर्क (Cancer) : तुम्ही बिझनेसमध्ये असलात, तर आज तुम्ही चांगला नफा कमावण्याची शक्यता आहे. परदेशाशी निगडित मुद्दे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अनुकूल ठरतील. तुम्ही जॉबच्या शोधात असलात, तर आजचा दिवस तुमच्यासाठी लकी असेल. तुमच्यासमोर चांगल्या संधी चालून येतील.

सिंह (Leo) : काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज गौरवलं जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांची दखल घेतली जाईल. तुमचा आदर केला जाईल. आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या समाधानी असाल.

कन्या (Virgo) : आज तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान असाल. तुम्ही वाहन घेण्याचा विचार करत असलात, तर पुढे जाऊ शकता. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे.

तूळ (Libra) : आज तुम्हाला जॉबमध्ये पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जॉबच्या चांगल्या संधीही मिळतील. कोणताही निर्णय घाई-गडबडीत घेऊ नये. काळजीपूर्वक विचार करूनच घ्यावा. तुमचे कायदेविषयक अडचणी आणि समस्या सोडवल्या जातील.

वृश्चिक (Scorpio) : आर्थिक स्थिती सुधारेल. बिझनेसमध्ये चांगले पैसे कमावण्याची मोठी शक्यता आहे. खूप तीव्र इच्छा असल्यास पूर्ण होईल. एखाद्या ठिकाणी जाण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने संधी मिळू शकेल.

धनू (Sagittarius) : आजचा दिवस व्यवहारांसाठी आणि पैशांशी संबंधित गोष्टींसाठी चांगला नाही. तुमच्या मौल्यवान वस्तू सांभाळा. तुमच्या मौल्यवान वस्तू गमावल्या जाऊ नयेत म्हणून गर्दीची ठिकाणं टाळा.

मकर (Capricorn) : उत्पन्नात वाढ झाल्याचं तुम्हाला जाणवेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल आणि आदर मिळेल.

कुंभ (Aquarius) : बिझनेसमध्ये एखादं प्रॉफिटेबल डील आज तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बॉसकडून तुमच्या कष्टांसाठी तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमच्या निर्धाराचा गौरव केला जाईल.

मीन (Pisces) : मोठ्या खर्चामुळे बजेट कोलमडू शकेल. तुमच्या खर्चांच्या बाबतीत तुम्ही हिशेबी होण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणच्या व्यक्ती तुम्हाला सहकार्य करतील.

First published:

Tags: Astrology and horoscope, Money