Home /News /astrology /

Money Mantra: पार्टनरशिप्समध्ये बिझिनेस करत असाल तर सावधान! आजचा दिवस या राशींसाठी आर्थिक तोट्याचा

Money Mantra: पार्टनरशिप्समध्ये बिझिनेस करत असाल तर सावधान! आजचा दिवस या राशींसाठी आर्थिक तोट्याचा

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (2 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (2 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : आज बिझनेसमध्ये तोटा होऊ शकतो. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी. गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर खर्च करणं टाळा. कोणालाही पैसे उधार देणं टाळा. वृषभ (Taurus) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. बचत आणि बिझनेसमधलं उत्पन्न वाढेल. पूर्वजांच्या मालमत्तेचा गैरवापर केल्यास नुकसान होईल. घरखर्च कमीत कमी असतील. मिथुन (Gemini) : बिझनेसमध्ये आर्थिक वाढ होईल; मात्र पार्टनरशिप फायद्याची ठरणार नाही. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये उधार दिलेले पैसे परत मिळतील. कर्क (Cancer) : एखादी अत्यंत मौल्यवान मालमत्ता तुमच्याकडे चालून येईल. पार्टनरशिप्समुळे आर्थिक तोटा होईल. ऑफिसमध्ये तुमची प्रगती होईल आणि तुमचं उत्पन्न वाढेल. खासगी बिझनेसची कामगिरी खूप चांगली होईल. सिंह (Leo) : दैनंदिन उत्पन्न घटेल. उत्पन्नाच्या स्रोतामध्ये अनेक अडचणी येतील. ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक खर्च वाढतील. बिझनेसमधली अत्यंत जवळची व्यक्ती तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. कन्या (Virgo) : कामाच्या ठिकाणी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी मिळू शकतील. बिझनेस आर्थिककदृष्ट्या उत्पादक ठरतील. अत्यंत जवळच्या व्यक्तीला तुम्हाला कदाचित पैसे उसने/उधार द्यावे लागण्याची शक्यता आहे. जमिनीशी संबंधित कामांतून तुम्हाला संपत्ती मिळेल. तूळ (Libra) : आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या अत्यंत चांगला आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला भावनिक आणि आर्थिक पाठिंबा मिळेल. पूर्वजांच्या मालमत्तेतून तुम्हाला अनपेक्षित नफा मिळेल. वृश्चिक (Scorpio) : तुम्हाला किरकोळ आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. तुमच्या बिझनेसमधून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. पार्टनरशिप्स धोकादायक ठरतील. तुमचं कुटुंब तुम्हाला आर्थिकदृष्ट्या साह्य करील, पाठिंबा देईल. धनू (Sagittarius) : आज अनपेक्षित परिस्थितीतून तुम्हाला चांगले पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होईल. सरकारी योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. चुकीची गुंतवणूक तोटा करणारी ठरेल. घरखर्च, कौटुंबिक खर्च वाढतील. मकर (Capricorn) : तुम्हाला तुमचे फंड्स जमीन किंवा रिअल इस्टेटसाठी वापरावे लागतील. बचत केलेले पैसे गरजेच्या नसलेल्या गोष्टींवर खर्च होतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या साह्य करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल. कुंभ (Aquarius) : आजोळकडचे नातेवाईक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मार्गदर्शन करतील. आज तुम्ही किरकोळ कर्जांची परतफेड करू शकाल. बिझनेसमध्ये आधी झालेला तोटा तुम्ही भरून काढू शकाल. मीन (Pisces) : कौटुंबिक खर्च वाढू शकतील. बऱ्याच काळापासून तुम्हाला अडचणीत आणणारं कर्ज तुम्ही फेडून टाकाल. बिझनेसमधलं दैनंदिन उत्पन्न घटेल. विनाकारण केलेल्या खर्चांमुळे पैशांची उधळपट्टी होईल. Keywords : Money Mantra, Horoscope, Financial Horoscope, Astrology, Money Astrology, Bhumika Kalam अनिकेत
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money

पुढील बातम्या