आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (1 जानेवारी 2023) राशिभविष्य
मेष (Aries) : आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता राखा. ऑफिसच्या कामाला उशीर करू नका. आज तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला नफा मिळेल. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न वाढतील. निर्णय शहाणपणाने घ्याल. हाव आणि मोहाला बळी पडू नका.
उपाय : छोट्या मुलींना गोड खाऊ घाला.
वृषभ (Taurus) : तुमच्या बिझनेसमध्ये तुमचा नफा आणि प्रभाव वाढेल. लोकांचा विश्वास संपादित करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार व्यक्ती छोटी बचत करण्यात यशस्वी होतील. दीर्घकालीन प्रकरणांमध्ये सक्रियता आणाल. आज तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील.
उपाय : वडीलधाऱ्या व्यक्ती आणि गुरूंचा आदर करा.
मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी यशाची टक्केवारी चांगली असेल. आर्थिक, कमर्शियल प्रकरणं घडतील. कामाच्या ठिकाणी सकारात्मकता असेल. कामाच्या ठिकाणी प्रभावी कामगिरी राखली जाईल. आर्थिक बचतीच्या संधी मिळतील.
उपाय : पर्समध्ये चांदीचं नाणं ठेवा.
कर्क (Cancer) : ऑफिसमध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये क्रियाशीलता आणाल. आज तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळतील. बेरोजगार व्यक्तीला चांगल्या ऑफर्स मिळतील. तुम्हाला इतरांकडून प्रोत्साहन मिळेल. नफावाढीवर लक्ष केंद्रित कराल.
उपाय : श्री यंत्राचं पूजन करा आणि ते तुमच्यासोबत ठेवा.
सिंह (Leo) : कमर्शियल कामामध्ये स्वार्थीपणा टाळा. कृती आराखड्याला ऑफिसमध्ये गती प्राप्त होईल. नोकरीत तुम्हाला अनुभवाचा फायदा मिळेल. बिझनेस करण्यातली सुलभता कायम राखा. वैयक्तिक विषयांवर लक्ष केंद्रित राखाल. मोठं प्लॅनिंग करा. कारण बिझनेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : कामाच्या ठिकाणी भगवान श्री गणेशाचं पूजन करा.
कन्या (Virgo) : आर्थिक क्षेत्रात आधुनिक विचांरासह पुढे जाल. उद्दिष्ट वेगाने पूर्ण कराल. करिअरच्या संधींमध्ये वाढ होईल. तुमच्या बिझनेसमध्ये नफ्याचं प्रमाण चांगलं असेल. नोकरीत नव्या संधी असतील. वर्क बिझनेसमध्ये चांगलं काम कराल.
उपाय : वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करा.
तूळ (Libra) : आज गुंतवणुकीत तोटा होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणं टाळा. आर्थिक बाबींवरचं नियंत्रण वाढवाल. वर्क बिझनेसमध्ये जागरूकता वाढवाल. वर्किंग मॅटर्समध्ये संयम दाखवाल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचं सहकार्य असेल.
उपाय : अनाथाश्रमात अन्नदान करा.
वृश्चिक (Scorpio) : आज तुम्हाला अनपेक्षित नफा आणि तुमच्या बिझनेसमधल्या इतरांकडून आदर मिळेल. परदेशातून तुम्हाला नवी संधीही मिळेल.
उपाय : मोहरीचं तेल लावलेला ब्रेड काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.
धनू (Sagittarius) : ऑफिसमधल्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये घाईगडबड करू नका. गुंतवणुकीच्या संदर्भात सल्लागारांशी संपर्क साधा. कामाच्या क्षेत्रात बिझनेसमन्सना चांगले रिझल्ट्स मिळतील. वैयक्तिक खर्चांकडे लक्ष द्याल. शिस्तबद्ध काम कराल. बचतीवर भर द्याल.
उपाय : भगवान श्रीकृष्णाला साखर अर्पण करा.
मकर (Capricorn) : आज तुमचे प्रयत्न तुम्हाला वृद्धीसाठी संधी देतील. तुमच्या संपर्कातली एखादी व्यक्ती वर्क बिझनेसमध्ये उत्तम असेल. नोकरीत धैर्य आणि शूरपणा वाढवाल. तुमच्या क्षेत्रातल्या सकारात्मक काळाचा जास्तीत जास्त लाभ घ्याल. प्रोफेशनल प्रयत्न सुरूच ठेवाल. नफ्याचे विविध स्रोत खुले होतील.
उपाय : वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्या.
कुंभ (Aquarius) : आज तुमच्या बिझनेसमध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या बिझनेसची आश्चर्यकारक प्रगती होईल. नवी उद्दिष्टं गाठण्यासाठी उत्साही असाल. कामाच्या ठिकाणी नफा मिळेल. सेवा क्षेत्रात चांगलं काम कराल.
उपाय : शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा.
मीन (Pisces) : उत्पन्नाचे एकाहून अधिक स्रोत खुले होतील. ऑफिसमधल्या व्यक्तींना नव्या संधी खुल्या होतील. उच्चपदस्थ अधिकारी वर्ग आनंदी असेल. बिझनेसमन्स त्यांच्या बिझनेसमध्ये उत्तम कामगिरी करू शकतील. ऑफिसमध्ये सकारात्मकता राहील. संपत्तीत वाढ होईल.
उपाय : भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.