मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra: आर्थिक समस्या येताहेत ना? मग आज हनुमान चालिसाचं पठण करा; मिळेल लाभच लाभ

Money Mantra: आर्थिक समस्या येताहेत ना? मग आज हनुमान चालिसाचं पठण करा; मिळेल लाभच लाभ

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : दीर्घ काळासाठी स्थलांतर करण्याचं नियोजन करणाऱ्या व्यक्ती यशस्वी होतील. क्षमतेत वाढ होईल. आर्थिक लाभ मिळण्याची तीव्र शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Sky Blue उपाय : श्री दुर्गादेवीच्या मंदिरात दुर्गा चालिसा पठण करा. वृषभ (Taurus) : आज काही नवे प्लॅन्स तुमच्या डोक्यात येतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कामामध्ये तुमच्या कोणा वरिष्ठांचा पाठिंबा/सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करा. वडिलधाऱ्या मंडळींचा आदर करा. कौटुंबिक समस्यांवरही संवादातून तोडगा काढण्याची गरज आहे. लकी नंबर : 7 लकी कलर : Light Pink उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा आणि गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा. मिथुन (Gemini) : आज तुम्ही जे कोणतं काम समर्पण भावनेने कराल, त्याची फळं तुम्हाला लगेचच मिळतील. विचारपूर्वक काम करा. आर्थिक तोट्याची शक्यता. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. लग्नाचे प्रस्ताव/स्थळं येऊ शकतील. लकी नंबर : 9 लकी कलर : Saffron उपाय : भगवान श्रीकृष्णाला साखर अर्पण करा. कर्क (Cancer) : आज तुमचं चित्त काहीसं विचलित असेल. ताणतणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही छोट्या ट्रिपला जाऊ शकता. त्यामुळे आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. कुटुंबीयांसमवेत पूर्ण वेळ व्यतीत कराल. लकी नंबर : 3 लकी कलर : Light Yellow उपाय : मोहरीचं तेल लावलेली चपाती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. सिंह (Leo) : अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करू नका. अन्यथा तोट्याची शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. घरात चांगल्या कामाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. लकी नंबर : लकी कलर : White उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा. कन्या (Virgo) : आजचा दिवस खूप फायद्याचा ठरेल. कामासंदर्भात वर्तनाशी संबंधित सर्व वाद आज सोडवले जाऊ शकतील. नव्या प्रोजेक्टवर काही काम सुरू होऊ शकेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात कुटुंबीय आणि आजूबाजूच्या व्यक्ती काही अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील. लकी नंबर : 0 लकी कलर : Black उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. तूळ (Libra) : आर्थिक बाबतीत आजचा दिवस खूप चांगला असेल. आज दिवसभरात नफ्याच्या अनेक संधी मिळतील. आज तुम्ही खूप क्रिशाली असाल. कुटुंबातली शांतता आणि स्थिरता यांचा आनंद घ्या. लकी नंबर : 5 लकी कलर : Light Blue उपाय : सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं 7 वेळा पठण करा. वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस काळजी घेण्याचा, सावधगिरी बाळगण्याचा आहे. आज बिझनेसमध्ये मोठी रिस्क घेऊ नका. तोट्याची शक्यता आहे. काही जणांना स्वतःसाठी पैसे गोळा करावे लागण्याची शक्यता आहे. कुटुंबात काळजीचं वातावरण असण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 2 लकी कलर : Red उपाय : पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना मोकळं करा. धनू (Sagittarius) : पार्टनरशिपमधल्या बिझनेसमधून आज खूप नफा मिळेल. आज तुम्हाला घरातल्या कामांसाठी सुवर्णसंधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मुलासंदर्भात मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 9 लकी कलर : Firozi उपाय : श्री गणेशाला लाडू अर्पण करा. मकर (Capricorn) : आरोग्याची काळजी घ्या. हवामानातल्या बदलामुळे आरोग्याची समस्या उद्भवेल. आजचा दिवस बिझनेसच्या अनुषंगाने सुखद असेल. घाई-गडबड टाळा. कुटुंबीयांसमवेत मौजमजेचा कालावधी व्यतीत कराल. लकी नंबर : 4 लकी कलर : Purple कुंभ (Aquarius) : आजचा दिवस फायद्याचा आहे. आज रिस्क घेऊन नफा मिळेल. संयमाच्या आणि तुमच्या मृदू वर्तनाच्या साह्याने समस्या सोडवता येतील. समस्याग्रस्त, तणावातल्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. लकी नंबर : 7 लकी कलर : Green उपाय : आईला काही तरी गोड खाऊ घाला. मीन (Pisces) : महत्त्वाचे निर्णय प्रलंबित ठेवू नका. हिचचिंतकाच्या योग्य सल्ल्यांचा आदर करा. आर्थिक मुद्द्यांमध्ये कृतिशीलता आणा. सलोख्याने काम केल्यास अनपेक्षित नफा मिळू शकतो. तुमचं बजेट लक्षात घेऊन विचारपूर्वक, शहाणपणाने खर्च करा. लकी नंबर : 7 लकी कलर : Grey उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या