मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra: आजचा दिवस झक्कास; आर्थिक नफा होण्याची शक्यता तर अडकलेले पैसेही मिळतील परत

Money Mantra: आजचा दिवस झक्कास; आर्थिक नफा होण्याची शक्यता तर अडकलेले पैसेही मिळतील परत

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (11 ऑगस्ट 2022) राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (11 ऑगस्ट 2022) राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (11 ऑगस्ट 2022) राशिभविष्य.

    आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (11 ऑगस्ट 2022) राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत. मेष (Aries) : तुमचा संवाद तुम्ही स्वतःच वाढवू शकता. उपयुक्त नसलेल्या गोष्टींसाठी तुमचा वेळ वाया घालवू नका. तसं केलंत, तर तुमचं आर्थिक नुकसान होईल आणि तुमच्याकडे येऊ शकणाऱ्या संभाव्य संधीही तुम्ही गमावू शकाल. आरोग्याविषयी काळजी घ्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल. लकी नंबर : 6 लकी कलर : Black उपाय : भगवान शिवशंकराला जल अर्पण करा. वृषभ (Taurus) : शारीरिक समस्या वाढू शकतात. कर्जाची चिंता सतावेल. दैनंदिन गरजा भागवण्यासाठीही कदाचित पैसे उधार/उसने घ्यावे लागतील. समस्येमुळे कामावर दुष्परिणाम होईल. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. लकी नंबर : 3 लकी कलर : Pink उपाय : भैरव मंदिरात नारळ अर्पण करावा. मिथुन (Gemini) : दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अधिक खर्च येऊ शकेल. कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा भविष्यात समस्या वाढतील. सूडाची भावना मनात स्थान घेणार नाही, असं पाहा. लकी नंबर : 1 लकी कलर : Red उपाय : सूर्याला जल अर्पण करा. कर्क (Cancer) : पती-पत्नीमध्ये वाद वाढतील. त्यामुळे घरातलं वातावरण तणावाचं असेल. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. रखडलेल्या कामांबद्दल चिंता वाटेल; मात्र वेळेनुसार काम व्हायला सुरुवात होईल. लकी नंबर : 7 लकी कलर : Golden उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला. सिंह (Leo) : नशिबाने संधी मिळू शकतात. नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उपयोगी नसलेल्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. काही तरी कारणामुळे वाद वाढू शकतात. पैसे खर्च करण्यापूर्वी विचार करा. अन्यथा भविष्यात पश्चात्ताप करावा लागेल. लकी नंबर : 9 लकी कलर : Violet उपाय : पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा. कन्या (Virgo) : शारीरिक समस्येमुळे कामावर दुष्परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचे शब्द झोंबतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभाची शक्यता. लकी नंबर : 7 लकी कलर : Sky Blue उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा. तूळ (Libra) : कामाच्या ठिकाणी खूपच कष्ट करावे लागतील. भविष्यात त्याचे खूपच चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. गंभीर आजारातून बरे व्हाल. तुमच्याशी संबंधित काही गोष्टींचे वाद आणखी तीव्र होऊ शकतात. लकी नंबर : 5 लकी कलर : Yellow उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा. वृश्चिक (Scorpio) : कामात यशस्वी झाल्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल, उत्साह वाढेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमची बार्गेनिंग पॉवर वाढू शकेल. जुने मित्र भेटणं शक्य आहे. वैवाहिक जीवनात ऊर्जा असेल. लकी नंबर : 4 लकी कलर : Badami (Almond) उपाय : भगवान शिवशंकराला पंचामृताचा अभिषेक करा. धनू (Sagittarius) : बिझनेस डील्समध्ये नफा होत आहे. अडकलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. उपयुक्त नसलेल्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. एका वेळी दोन गोष्टी करू नका. कुटुंबात उत्सवी वातावरण असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Firouzzi (turquoise-blue) उपाय : घरातून बाहेर पडताना घरातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. मकर (Capricorn) : प्रिय व्यक्तींचे शब्द मनात घुसतील, मनाला वेदना करतील. शारीरिक समस्या वाढू शकतात. थांबलेल्या, रखडलेल्या कामांमुळे चिंता वाटणं स्वाभाविक आहे; पण संयम बाळगावा. आर्थिक तोट्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. लकी नंबर : 8 लकी कलर : White उपाय : 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा 108 वेळा जप करावा. कुंभ (Aquarius) : एकापाठोपाठ एक समस्या उद्भवतील. आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकेल. विचारपूर्वक खर्च करा. अनपेक्षित तोट्याची शक्यता आहे. कुटुंबाला सपोर्ट मिळेल. लकी नंबर : 5 लकी कलर : Green उपाय : श्रीराम मंदिरात बसून रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. मीन (Pisces) : सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. बदलाबद्दल चिंता वाटेल. दोन भावांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून ताण वाढू शकेल. बऱ्याच काळापासून अडकून पडलेले पैसे अगदी सहजपणे परत मिळू शकतील. लकी नंबर : 2 लकी कलर : Blue उपाय : श्री हनुमानासाठी तुपाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचं पठण करावं.
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Money

    पुढील बातम्या