Home /News /astrology /

Money Mantra: कोर्टातील आर्थिक प्रकरणांमधून आज मिळेल सुटका; वाचा आजचं आर्थिक राशीभविष्य

Money Mantra: कोर्टातील आर्थिक प्रकरणांमधून आज मिळेल सुटका; वाचा आजचं आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (1 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (1 ऑगस्ट 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खूपच लकी ठरणार आहे. आज गुंतवणूक करणं फायद्याचं ठरणार आहे. बिझनेसमध्ये घेतलेले निर्णय नफा देणारे ठरतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता खूप जास्त आहे.

वृषभ (Taurus) : एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं गरजेचं आहे. विनाकारण काही खर्च करत गेलात, तर आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. ड्रायव्हिंग करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मिथुन (Gemini) : आज कोणालाही पैसे कर्जाऊ देऊ नका. आजचे प्रवास नफा देणारे ठरतील. आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने समाधानाचा, गौरवाचा आणि एकंदरीतच महत्त्वाचा ठरेल. तुम्हाला तुमची संपत्ती वाढत असल्याचा अनुभव घेता येईल.

कर्क (Cancer) : समाजात तुमच्याविषयी असलेला आदरभाव वाढीला लागेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवी कामं सुरू करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. ही कामं नक्कीच पूर्ण होतील.

सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींना आज जोखीम घ्यावी लागेल किंवा धोका पत्करावा लागण्याची शक्यता आहे. कोणतीही गोष्ट घाईघाईत करण्याचं टाळा. जोडीदाराचं उत्पन्न वाढेल. तुम्ही नवं वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo) : या राशीच्या व्यक्तींची बिझनेस पार्टनर्सकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. संपत्तीत घट होण्याची, तोटा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. कोणाकडून पैसे उसने घेऊ नयेत आणि कोणाला उसने देऊही नयेत.

तूळ (Libra) : कोर्टाशी संबंधित प्रकरणं सुटतील. जमीन किंवा रिअल इस्टेटशी संबंधित नोकऱ्यांमध्ये असलेल्या व्यक्ती आज नशीबवान ठरतील.

वृश्चिक (Scorpio) : आज जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षितपणे फायदा होईल. उत्पन्न वाढेल आणि चांगली आर्थिक वृद्धी होईल.

धनू (Sagittarius) : अचानक खर्चांमध्ये वाढ झाल्यामुळे तुमचं बजेट कोलमडेल. खर्च करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जॉब शोधणाऱ्या व्यक्तींचं नशीब आज फारसं चांगलं नसेल; मात्र कष्टांतून चांगल्या संधी मिळू शकतील.

मकर (Capricorn) : बेरोजगार व्यक्तींना आज नोकरीच्या अनेक संधी समोर चालून येतील. आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारेल. नवं व्हेंचर सुरू करण्यासाठी आज चांगला दिवस आहे.

कुंभ (Aquarius) : बिझनेसमध्ये किरकोळ चढउतार येतील; मात्र खाद्यपदार्थ आणि शिक्षणाशी संबंधित क्षेत्रातल्या उद्योगांना चांगला नफा होईल. अन्य दिवसांशी तुलना करता उत्पन्न चांगलं असेल.

मीन (Pisces) : कामाच्या ठिकाणी मिळालेल्या नव्या संधींमुळे तुमचं उत्पन्न वाढेल. तुम्ही परदेश प्रवासाचाही विचार करू शकाल. रिअल इस्टेटशी संबंधित मुद्दे फायद्याचे ठरतील.

First published:

Tags: Astrology and horoscope, Money

पुढील बातम्या