मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra - तुमच्या राशीत आज आर्थिक लाभ आहे की नाही? एका क्लिकवर पाहा भविष्य

Money Mantra - तुमच्या राशीत आज आर्थिक लाभ आहे की नाही? एका क्लिकवर पाहा भविष्य

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

30 सप्टेंबर 2022 आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (30 सप्टेंबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : आज हातात खूप मोठी रक्कम मिळाल्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. कुटुबीयांवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अधिकारी कामाचं कौतुक करतील. पैशांची गुंतवणूक योग्य प्रकारे करा.

उपाय : भैरव मंदिरात नारळ अर्पण करा.

वृषभ (Taurus) : ऑफिसमध्ये आळशीपणा सोडून द्या. अन्यथा तोटा होऊ शकतो. कोणी तरी तुमच्यासमोर पैशांशी निगडित प्रस्ताव ठेवला, तर त्या व्यक्तीकडून फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या.

उपाय : उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.

मिथुन (Gemini) : आज आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकता. आरोग्यविषयक आणि आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करू नका. सध्या तुमच्यासाठी रिअर इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं चांगलं राहील.

उपाय : भगवान श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.

कर्क (Cancer) : आज नशीब महत्त्वाची भूमिका निभावेल. सर्व क्षेत्रांत प्रगती कराल. योजनेशी संबंधित प्रपोझलला मंजुरी मिळाल्यानंतर आणि पैसे मिळाल्यानंतर तुम्ही बिझनेस प्रोग्राम पुढे न्याल.

उपाय : तेल लावलेली चपाती कुत्र्याला खाऊ घाला.

सिंह (Leo) : ऑफिसमध्ये अनावश्यक अतिरिक्त काम करावं लागणं आणि त्याचं श्रेयही न मिळणं यामुळे आज तुमचं मन दुःखी असेल. आर्थिक तोट्याचीही शक्यता आहे. कोणतंही डील फायनल करताना शहाणपणाने करा.

उपाय : गरिबांना अन्नधान्य दान करा.

कन्या (Virgo) : आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. सर्जनशील क्षमता वाढेल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला नशीब साह्य करील.

उपाय : गायींना गवत खाऊ घालावं.

तूळ (Libra) : आज Triangular बिझनेस पार्टनरशिप्स आणि रिलेशनशिप्समध्ये तुम्हाला लाभ होईल. छोट्या व्यावसायिकांना लाभ होईल. नोकरदार व्यक्तीला नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : श्री हनुमानाच्या मंदिरात ध्वज अर्पण करा.

वृश्चिक (Scorpio) : शारीरिक अडचणी येऊनही तुम्ही प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण कराल. तुमच्या धीराचा आदर केला जाईल. गुंतवणुकीच्या नव्या संधी तुमची वाट पाहत आहेत. आर्थिक प्रगती होईल.

उपाय : दुर्गामातेला ओढणी अर्पण करा.

धनू (Sagittarius) : आज तुम्हाला आर्थिक स्रोतांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. इतरांच्या कामावर बराच वेळ वाया घालवू नका. पूर्वी केलेली गुंतवणूक चांगला नफा देईल.

उपाय : लक्ष्मीमातेची प्रार्थना करा.

मकर (Capricorn) : बऱ्याच काळापासून बदलाची किंवा प्रमोशनची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या संधी येतील. तुम्ही फक्त उघड्या डोळ्यांनी त्या पाहण्याची गरज आहे. भविष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

उपाय : माशांना खाऊ घाला.

कुंभ (Aquarius) : आज तुमच्या कामाच्या क्षेत्रात काही अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल. तुम्ही तुमचं स्वतःचं काम डिझाइन करू शकाल. नव्या व्यक्तींशी भेट होईल.

उपाय : तृतीयपंथीयांना मूग दान करा.

मीन (Pisces) : कामाच्या क्षेत्रात तुम्ही अधिकाऱ्यांकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर तुम्ही निराश व्हाल. आर्थिक तोट्याचीही शक्यता आहे. डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

उपाय : विष्णुसहस्रनामाचं पठण करा किंवा श्रवण करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs