मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

बिझनेसमध्ये विरोधकांवर लक्ष ठेवाच पण आज जवळच्या व्यक्तीपासूनही सावध राहा; आजचा Money Mantra

बिझनेसमध्ये विरोधकांवर लक्ष ठेवाच पण आज जवळच्या व्यक्तीपासूनही सावध राहा; आजचा Money Mantra

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगिलेलं आजच्या दिवसाचं (30 जुलै 2022) राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगिलेलं आजच्या दिवसाचं (30 जुलै 2022) राशिभविष्य.

मेष (Aries) : आर्थिक दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला आहे. बिझनेस वाढेल आणि तुम्हाला प्रॉपर्टीशी संबंधित नफाही मिळू शकेल.

वृषभ (Taurus) : बिझनेसमधली एखादी जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. तुमच्या मौल्यवान वस्तूंची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी लागेल.

मिथुन (Gemini) : महत्त्वाचं काम पूर्ण करताना तुम्हाला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागेल. दर्शनी चेहऱ्यावर वेगळं आणि आतून वेगळं स्वरूप असलेल्या लोकांपासून सावध राहा. विनाकारण प्रवास करणं टाळा.

कर्क (Cancer) : परदेशाशी संबंधित मुद्दे नफा देणारे ठरतील. योग्य दिशेने कष्ट केल्यास उत्पन्नात सुधारणा होईल. तुम्ही वाहन विकत घेण्याचा विचार करू शकाल.

सिंह (Leo) : परदेशात नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. तुमचे सहकारी आणि पीअर्समध्ये तुमचा आदर केला जाईल. नवं काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

कन्या (Virgo) : बिझनेस पार्टनर तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकेल. आज तुम्हाला बिझनेसमध्ये तोटा सहन करावा लागू शकतो. कठीण काळात तुम्हाला जवळचा मित्र मदत करील.

तूळ (Libra) : आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबातल्या सदस्याच्या उत्पन्नात वाढ होईल. धार्मिक समारंभासाठी पैसे खर्च होतील.

वृश्चिक (Scorpio) : आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये खूप काळजी घेण्याची गरज आहे. जॉब शोधणाऱ्यांसाठी आजचा दिवस काहीसा निराशाजनक असू शकतो.

धनू (Sagittarius) : खाद्यपदार्थ, तसंच कापडाशी संबंधित उद्योगांमध्ये चांगला नफा होईल. बिझनेसचं उत्पन्न अन्य दिवसांच्या तुलनेत चांगलं असेल. रिअल इस्टेटशी संबंधित नफा मिळण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn) : प्रवास, तसंच बिझनेस ट्रिप्स आज खूपच फायद्याच्या ठरतील. आज विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकेल. तुम्ही काळजी घेण्याची, सावध राहण्याची गरज आहे.

कुंभ (Aquarius) : आर्थिक परिस्थिती खालावू शकेल. बिझनेसविषयक आणि आर्थिक मोठे निर्णय सध्या घेऊ नका. तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी उभं राहील.

मीन (Pisces) : कायदेविषयक अडचणी सोडवल्या जातील. अनपेक्षित परिस्थिती उद्भवेल आणि त्यातून तुम्हाला चांगला नफा कमावण्यासाठी मदत होईल. दैनंदिन उत्पन्नात सुधारणा होईल. इंटरनॅशनल ट्रिप्स अजेंडावर असू शकतील.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya