मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra - नवरात्रीच्या आजच्या दिवशी करा 'हे' उपाय; आर्थिकदृष्ट्या होईल फायदा

Money Mantra - नवरात्रीच्या आजच्या दिवशी करा 'हे' उपाय; आर्थिकदृष्ट्या होईल फायदा

आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य.

आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (29 सप्टेंबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. एखादं काम रखडण्याची आणि त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तीला नव्या संधी मिळू शकतील.

उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीला उपयुक्त वस्तू द्या.

वृषभ (Taurus) : नोकरी किंवा कामाच्या संदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला आदर मिळेल. नव्या काँट्रॅक्ट्सच्या माध्यमातून पद आणि प्रतिष्ठा वाढेल.

उपाय : दुर्गामातेच्या मंदिरात लाल ओढणी दान करा.

मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी महत्त्वाचं कागदपत्र हरवण्याची भीती आहे. रखडलेलं काम पूर्ण होऊन नफा होईल. ऑनलाइन फसवणुकीची शक्यता. ती टाळण्याचा प्रयत्न करा. गुंतवणुकीबद्दल सल्ला घ्या.

उपाय : भैरव मंदिरात नारळ अर्पण करा.

कर्क (Cancer) : उपजीविकेच्या साधनाच्या अनुषंगाने प्रगती होईल. प्रतिष्ठेत वाढ होईल. ऑफिसच्या कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावं लागेल आणि त्यात नफा होईल. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता.

उपाय : सरस्वती देवीला पिवळी फुलं अर्पण करा.

सिंह (Leo) : आज उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील. ऑफिसमधल्या अतिरिक्त कामामुळे अतिरिक्त धावपळ होईल. त्यामुळे थकवा येईल. शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत.

उपाय : भगवान शिवशंकरांची उपासना करा.

कन्या (Virgo) : ऑफिसचं काम पूर्ण झाल्याने मनात आनंदाची भावना असेल. नोकरी किंवा उद्योग-व्यवसायात सुरू असलेल्या कष्टांमुळे अकल्पित यश प्राप्त कराल. काही चांगलं काम करण्याच्या दृष्टीने मन आनंदी असेल.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

तूळ (Libra) : गेले काही दिवस सुरू असलेली व्यवहाराबद्दलची मोठी समस्या सोडवली जाईल. हातात पुरेसे पैसे मिळण्याचा आनंद घेता येईल. विरोधकांचे हेतू सफल होणार नाहीत. जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाचं नियोजन कराल.

उपाय : पिंपळाच्या झाडाला पाणी घाला.

वृश्चिक (Scorpio) : आज नफा होईल आणि पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. स्टॉक मार्केटमधून नफ्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसह चांगले नातेसंबंध ठेवा. भविष्यात तुम्हाला त्याचे लाभ मिळतील.

उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.

धनू (Sagittarius) : आज कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधकदेखील तुमचं कौतुक करतील. आज सरकारी काम करून घेण्यात यशस्वी व्हाल.

उपाय : श्री लक्ष्मीमातेची उपासना करा.

मकर (Capricorn) : आज तुम्हाला आर्थिक बाबतींत यश मिळेल. उपजीविकेच्या बाबतीत सुरू असलेले नवे प्रयत्न फळाला येतील. हाताखालच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळेल. कोणाहीसोबत वाद घालू नका.

उपाय : पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला.

कुंभ (Aquarius) : आजचा दिवस चांगला नाही. ऑफिसमध्ये विनाकारण वाद होऊ शकतात. गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते. सावध राहा. कोणावरही विश्वास ठेवू नका.

उपाय : कुत्र्याला ब्रेड खाऊ घाला.

मीन (Pisces) : आजचा दिवस गोंधळाचा असेल. आज कोणाशीही कसलाही व्यवहार करू नका. नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. दानधर्म करावा.

उपाय : बजरंग बाण स्तोत्राचं पठण करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs