मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : कर्ज घेण्याच्या तयारीत; तुमची रास 'ही' असेल तर आज बिलकुल घेऊ नका रिस्क

Money Mantra : कर्ज घेण्याच्या तयारीत; तुमची रास 'ही' असेल तर आज बिलकुल घेऊ नका रिस्क

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (27 सप्टेंबर 2022) राशिभविष्य.

मेष (Aries) : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खास असेल. एखादं स्पेशल डील फायनल होईल. वायफळ खर्च वाढू शकतात. नोकरदार व्यक्तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

उपाय : गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला.

वृषभ (Taurus) : कर्जांबद्दलची चिंता वाढू शकेल. नशिबाने संधी मिळू शकतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तीला रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : दुर्गा मंदिरात तुपाचा दिवा लावा.

मिथुन (Gemini) : रखडलेल्या कामाबद्दल चिंता करू नका. काम पूर्ण होईल. कर्मचाऱ्यांमध्ये कामाच्या संदर्भात काही वाद होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीत गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल.

उपाय : गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा.

कर्क (Cancer) : आज कामाच्या ठिकाणी ऑफिरसशी किंवा बिझनेस क्षेत्रामध्ये व्यावसायिकाशी फूट पडू शकेल. तुमच्या कामाच्या कौशल्यांनी तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय प्राप्त कराल. आज नवा बिझनेस सुरू करण्याचा विचार करू शकाल.

उपाय : पक्ष्यांना धान्य खाऊ घाला.

सिंह (Leo) : नव्या नोकरीच्या संधी आणि नवी बिझनेस डील्स समोर येऊ शकतील. समस्यांशी दोन हात करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला नवी ऑफरही मिळू शकेल. शहाणपणाने काम सुरू करा. लवकरच तुमचं काम पूर्ण होईल.

उपाय : काळ्या कुत्र्याला काही तरी गोड खाऊ घाला.

कन्या (Virgo) : सुरू असलेले प्रोजेक्ट्स आणि कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा संघर्ष टाळा. गुंतवणूक पुढे ढकलणं चांगलं राहील. प्रॉपर्टीसंदर्भातलं डील फायनल करण्यापूर्वी सर्व कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.

उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीची सेवा करा.

तूळ (Libra) : ऑफिसमध्ये राग आणि ताणाचं वातावरण असेल. कुटुंबात पैशांवरून वाद होऊ शकतील. भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणतंही काम करू नका, तोटा होईल.

उपाय : मुंग्यांना पीठ आणि साखरेचं मिश्रण खाऊ घाला.

वृश्चिक (Scorpio) : नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींना नव्या संधी मिळतील. बिझनेसमधल्या काही नव्या प्लॅन्सवर काम सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटू शकाल.

उपाय : पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

धनू (Sagittarius) : आजचा दिवस संमिश्र आहे. चालू असलेल्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. तुमच्या क्षेत्रात प्रभाव तयार करण्यासाठी संधी मिळतील. विरोध झाला, अडथळे आले, तरी जिद्दीने केलेलं काम सिद्ध होईल.

उपाय : लाल गायीला गूळ खाऊ घाला.

मकर (Capricorn) : कोणतीही व्यक्ती, बँक किंवा संस्थेकडून तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असलात, तर घेऊ नका. आज घेतलेल्या कर्जाची परतफेड मुश्कील होईल. जुन्या मित्रांना सपोर्ट मिळेल आणि चांगल्या मित्रांची संख्या वाढेल.

उपाय : सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा.

कुंभ (Aquarius) : तुमच्या निर्णयक्षमतेचा आज तुम्हाला लाभ मिळेल. प्रलंबित कामं आज पूर्ण होऊ शकतील. एखाद्या कामात गुंतवणूक करायची असली, तर ती उघडपणे करा. त्याचा भविष्यात पूर्ण लाभ मिळेल. आर्थिक समस्या सोडवल्या जातील.

उपाय : रामाच्या मंदिरात ध्वज अर्पण करा.

मीन (Pisces) : कामाच्या नव्या ठिकाणी जॉइन होण्यासाठी किंवा नव्या प्रोजेक्टवर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. रूटीन कामांतून पैसे मिळवता येतील. कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमची मानसिकता तयार कराल. बिझनेस पार्टनर किंवा जवळच्या सहकाऱ्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील.

उपाय : श्री हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs