मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : गुंतवणूक करणार असाल तर सावधान! आधी तुमचं आर्थिक राशिभविष्य जरूर वाचा

Money Mantra : गुंतवणूक करणार असाल तर सावधान! आधी तुमचं आर्थिक राशिभविष्य जरूर वाचा

मनी मंत्रा

मनी मंत्रा

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 सप्टेंबर 2022) राशिभविष्य मेष : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस खास असेल. आज नफा होण्याची शक्यता आहे. आज एखादं स्पेशल डील फायनल होण्याची शक्यता आहे. तरुणांना उत्साही वाटेल. कामाच्या ठिकाणी तरुणांना प्रोत्साहन देण्यात तुम्ही यशस्वी ठराल. लकी नंबर : 6 लकी कलर : Green उपाय : भैरव मंदिरात मिठाई दान करा. वृषभ (Taurus) : सध्याचा काळ आर्थिक बाबतींत संस्मरणीय ठरेल असा आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि नशीबही चांगलं साथ देईल. आज तुम्ही मोकळेपणाने खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करायला तुम्हाला आवडतं. दीर्घ काळासाठी स्थलांतर करू इच्छित असलेल्या व्यक्ती यशस्वी होतील. आर्थिक लाभ होण्याची तीव्र शक्यता आहे. लकी नंबर : 2 लकी कलर : Sky Blue उपाय : दुर्गा मंदिरात दुर्गा चालिसा पठण करा. मिथुन (Gemini) : आजचा दिवस वेगवान बदलाचा असेल. यश मिळवण्यासाठी शक्य ते सर्व कराल. आज काही नव्या योजना तुमच्या मनात येतील आणि त्यातून आर्थिक लाभ होतील. कामामध्ये कोणा वरिष्ठ व्यक्तीचं सहकार्य घेण्याचा प्रयत्न करा. बचत आणि गुंतवणूक करा. लकी नंबर : 7 लकी कलर : Light Pink उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा आणि गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा. कर्क (Cancer) : आज तुम्ही जे कोणतं काम समर्पण वृत्तीने कराल, त्याची फळं तुम्हाला तातडीने मिळतील. विचारपूर्वक काम करा. आर्थिक तोट्याची शक्यता. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 9 लकी कलर : Saffron उपाय : भगवान कृष्णाला साखर अर्पण करा. सिंह (Leo) : नोकरदार व्यक्ती ताण दूर करण्यासाठी छोट्या ट्रिपला जाऊ शकतात. त्यातून आर्थिक प्रगतीसाठी नव्या संधी मिळतील. कुटुंबावरचा खर्च वाढेल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकेल. व्यापाऱ्यांचा व्यवहारात तोटा होण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 3 लकी कलर : Light Yellow उपाय : मोहरीचं तेल लावलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. कन्या (Virgo) : ऑफिसमध्ये अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावरून गुंतवणूक करू नका. तोटा होईल. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींसोबत वाद होण्याची शक्यता आहे. घरी एखाद्या चांगल्या कामाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 9 लकी कलर : White उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा. तूळ (Libra) : आजचा दिवस खूपच फायद्याचा ठरेल. कामाच्या वर्तनाशी संबंधित वाद आज सोडवले जाऊ शकतात. नव्या प्रोजेक्टचं काही काम सुरू होऊ शकेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात कुटुंबीय आणि आजूबाजूच्या व्यक्ती काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. लकी नंबर : 0 लकी कलर : Black उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. वृश्चिक (Scorpio) : आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस खूपच चांगला असेल. आज दिवसभरात नफ्याच्या संधी मिळतील. आज तुम्ही खूप सक्रिय राहाल. कुटुंबात शांतता आणि स्थिरता असेल. त्याचा आनंद घ्या. लकी नंबर : 5 लकी कलर : Light Blue उपाय : हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचं 7 वेळा पठण करा. धनू (Sagittarius) : आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. बिझनेसमध्ये कोणतीही मोठी रिस्क घेऊ नये. तोट्याची शक्यता आहे. काही जणांना स्वतःसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. कुटुंबात चिंतेचं वातावरण असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Red उपाय : पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना सोडून द्या. मकर (Capricorn) : पार्टनरशिपमधला बिझनेस आज बराच नफा देईल. आज तुम्हाला दैनंदिन घरकामांशी निगडित मुद्द्यांवर काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या अपत्याच्या संदर्भात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. लकी नंबर : 9 लकी कलर : Firouzzi उपाय : भगवान श्री गणेशाला लाडू अर्पण करा. कुंभ (Aquarius) : आरोग्याची काळजी घ्या. हवामानात झालेल्या बदलामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. बिझनेसच्या संदर्भात आजचा दिवस आनंददायी असू शकतो. घाई-गडबड टाळा. कुटुंबासमवेत मजेत वेळ व्यतीत कराल. लकी नंबर : 4 लकी कलर : Purple मीन (Pisces) : आजचा दिवस फायदा देणारा आहे. जोखीम घेतली, तर नफा होईल. संयम आणि मृदू वर्तनाच्या साह्याने तुम्ही समस्या सोडवू शकाल. ताण-तणावात, निराशेत असलेल्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. लकी नंबर : 7 लकी कलर : Green उपाय : आईला काही तरी मिठाई द्या.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या