मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra - शॉपिंग किंवा इतर आर्थिक व्यवहार करताना सावधान! तुमच्या राशीत फसवणुकीचा धोका

Money Mantra - शॉपिंग किंवा इतर आर्थिक व्यवहार करताना सावधान! तुमच्या राशीत फसवणुकीचा धोका

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (23 सप्टेंबर 2022) राशिभविष्य मेष (Aries) : बिझनेसविषयक गोष्टींमध्ये निर्णय घेताना तुम्हाला स्पष्ट आणि स्वच्छ मनाने काम करावं लागेल. अनेक समस्या तुम्ही सहज आणि वेगाने सोडवाल. उत्तुंग स्थानी पोहोचण्यासाठी तुमचं सर्वोत्तम द्या. वायफळ गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. तसं केलंत, तर पैसे गमावून बसाल आणि संधीही घालवून बसाल. लकी नंबर : 6 लकी कलर : Black उपाय : भगवान शिवशंकराला जल अर्पण करा. वृषभ (Taurus) : आर्थिक बाबींमध्ये नशीब खेचून आणण्याचा आजचा दिवस आहे. प्रस्थापित व्यवसायाचा विस्तार होईल. रिसोर्सेसची हलवाहलव करून तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत केली पाहिजे. कामाच्या ठिकाणी चोरीची शक्यता आहे. ऑनलाइन फसवणुकीला तुम्ही बळी पडण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 3 लकी कलर : Pink उपाय : श्री भैरव मंदिरात नारळ अर्पण करा. मिथुन (Gemini) : आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला नाही. आर्थिक बाबतींत अडचणी येतील. एखाद्या तातडीच्या कामासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कागदपत्रावर सह्या करण्याआधी ते काळजीपूर्वक वाचा. लकी नंबर : 1 लकी कलर : Red उपाय : सूर्याला अर्घ्य द्या. कर्क (Cancer) : आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. रखडलेल्या कामांबद्दल चिंता वाटेल; मात्र जसजसा वेळ पुढे जाईल तसतशी कामं व्हायला सुरुवात होईल. दीर्घ काळ प्रलंबित राहिलेले पैसे मिळतील. ते पैसे घरखर्चासाठी वापरू नका. योग्य सल्ला घेऊन त्यांची गुंतवणूक करा. भविष्यात तुम्हाला मोठे लाभ मिळतील. लकी नंबर : 7 लकी कलर : Golden उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला. सिंह (Leo) : नशिबाने संधी मिळतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. तुमच्याशी संबंधित काही गोष्टींमुळे वाद वाढू शकतील. पैसे खर्च करण्यापूर्वी विचार करा. अन्यथा भविष्यात पश्चात्तापाची वेळ येईल. बचतीचा प्रयत्न करा. लकी नंबर : 9 लकी कलर : Violet उपाय : पिवळ्या रंगाचा खाद्यपदार्थ दान करा. कन्या (Virgo) : शारीरिक समस्येमुळे ऑफिसमधल्या कामावर दुष्परिणाम होऊ शकेल. त्यामुळे ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून तुमची प्रतिमा उतरेल. तरीही आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. लकी नंबर : 7 लकी कलर : Sky Blue उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा. तूळ (Libra) : कामाच्या ठिकाणी बरेच कष्ट करावे लागतील. भविष्यात त्याचे परिणाम सुखद असतील. आरोग्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. गंभीर आजारांपासून सुटका होईल. तुमच्याशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दलचे वाद वाढू शकतात. लकी नंबर : 5 लकी कलर : Yellow उपाय : हनुमान चालिसा पठण करा. वृश्चिक (Scorpio) : कामामध्ये यश मिळाल्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमची Bargaining Power वाढेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात ऊर्जा असेल. लकी नंबर : 4 लकी कलर : Badami उपाय : भगवान शिवशंकरांना पंचामृताचा अभिषेक करा. धनू (Sagittarius) : बिझनेस डील्समध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. एका वेळी दोन कामं करू नका. कुटुंबात उत्सवी वातावरण असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Firouzzi उपाय : घरातून बाहेर पडताना वडिलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्या. मकर (Capricorn) : छोट्या उद्योजकांसाठी दिवस उत्तम आहे. त्यांना चांगली डील्स मिळतील. नोकरदार व्यक्तींना मात्र दिवस चांगला नाही. आर्थिक तोट्याची शक्यता असल्याने सावध राहा. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राखा. कोणालाही पैसे कर्जाऊ देताना विचार करा. लकी नंबर : 8 लकी कलर : White उपाय : 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा 108 वेळा जप करावा. कुंभ (Aquarius) : एकापाठोपाठ एक समस्या उद्धभवत राहतील. आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते. विचारपूर्वक खर्च करा. अनपेक्षित तोट्याची शक्यता आहे. कुटुंबाला सहकार्य, पाठिंबा मिळेल, ही चांगली गोष्ट आहे. लकी नंबर : 5 लकी कलर : Green उपाय : श्रीराम मंदिरात बसून रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. मीन (Pisces) : सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. बदलाबद्दल काळजी वाटेल. भावांमध्ये कोणत्या तरी मुद्द्यावरून ताण-तणाव वाढेल. बऱ्याच काळापासून अडकून पडलेले पैसे अगदी सहजपणे परत मिळवता येतील. लकी नंबर : 2 लकी कलर : Blue उपाय : हनुमानासाठी तुपाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसा पठण करा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या