मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

झटपट पैसे कमावण्याच्या नादात 'ही' चूक करू नका; राशीनुसार तुमच्यासाठी आजचा Money Mantra

झटपट पैसे कमावण्याच्या नादात 'ही' चूक करू नका; राशीनुसार तुमच्यासाठी आजचा Money Mantra

आर्थिकदृष्ट्या 20 ऑगस्ट 2022 रोजीचं राशिभविष्य.

आर्थिकदृष्ट्या 20 ऑगस्ट 2022 रोजीचं राशिभविष्य.

पैसे कमावण्याचा शॉर्टकट मारताना जरा जपूनच राहा. तुमचं आजचं आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (20 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : घरामध्ये प्रेम आणि सामंजस्य पहायला मिळेल. सध्या काम करत असलेल्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. भाग्य तुमच्या बाजूने असेल. बिझनेस क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक फायदा होईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आज वेळेवर पार पाडू शकाल. लकी नंबर : 2 लकी कलर : Light Red उपाय : गायीला हिरवा चारा द्या. वृषभ (Taurus) : रखडलेली तातडीची कामं आज आरामात पार पडतील. एकमेकांप्रति विश्वासामुळे कौटुंबिक नातेसंबंध आणखी मजबूत होतील. कमाई चांगली राहील, धनलाभ होण्याची शक्यता आहे. झटपट यश मिळवण्याच्या प्रयत्नात अयोग्य कृती करू नका. लकी नंबर : 8 लकी कलर : Brown उपाय : देवी लक्ष्मीची पूजा करा. मिथुन (Gemini) : आजचा दिवस अगदी उत्तम आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमची पत वाढवेल आणि तुम्हाला आदर मिळवून देईल. प्रगतीसाठी नवीन पर्याय शोधणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी डीलर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचा दिवस. खर्च टाळा. लकी नंबर : 3 लकी कलर : Light Yellow उपाय : हनुमान चालिसाचं पठण करा. कर्क (Cancer) : अधिकाऱ्यांकडून तुमचे विशेष कौतुक होईल. आज इतरांना दिलेले पैसे परत मिळू शकतील. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी झालेले बदल तुमच्या सोयीचे असतील. एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी मित्रांची मदत होईल. लकी नंबर : 0 लकी कलर : Sky Blue उपाय : गुरूंचा किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. सिंह (Leo) : आज भरपूर आनंदात असाल. मित्रांसोबत आणि कुटुंबीयांसोबत अगदी छान वेळ व्यतीत कराल. ट्रेडर असणाऱ्या व्यक्तींनी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. आर्थिक प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने वाढेल. कमाईमध्ये वाढ होईल. लकी नंबर : 5 लकी कलर : Orange उपाय : भगवान गणेशाला लाडू अर्पण करा. कन्या (Virgo) : आज कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका आणि तुमच्या कामावर लक्ष द्या. काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनात असेल. एखाद्या व्यक्तीवर अति विश्वास ठेवल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. कुटुंबात आनंदी आणि समाधानी वातावरण राहील. लकी नंबर : 9 लकी कलर : Golden उपाय : शिव चालिसाचे पठण करा. तूळ (Libra) : उदार स्वभाव ठेवल्यामुळे लोकांवर चांगली छाप पडेल. झटपट पैसे कमवण्यासाठी एखाद्या चुकीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवू नका. अभ्यासात तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल. विवाहितांना संततीचं सौख्य लाभेल. लकी नंबर : 7 लकी कलर : Black उपाय : कोणतीही पांढरी वस्तू दान करा. वृश्चिक (Scorpio) : कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तुमची कमाई वाढवण्यासाठी काही चांगल्या संधी मिळतील. बिझनेसमन असणाऱ्या व्यक्तींना भाग्य साथ देईल. कुटुंबामध्ये तुमचं सकारात्मक वर्तन इतरांवर चांगली छाप पाडेल. लकी नंबर : 6 लकी कलर : Violet उपाय : भगवान गणेशाला मोदक अर्पण करा. धनू (Sagittarius) : आजचा दिवस भरपूर यश मिळवण्याचा आहे. दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. जमिनीशीसंबंधित व्यवसायातील व्यक्ती आपले काम वाढवू शकतात. बिझनेसमध्ये एखादा बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या, अन्यथा नुकसान होईल. लकी नंबर : 3 लकी कलर : Red उपाय : शिव चालिसाचं पठण करा. मकर (Capricorn) : तुमच्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. एखादं नवीन काम सुरू करण्यासाठी मनाची तयारी करा. आर्थिक कामात लक्ष दिलं तर मन शांत राहील, आणि यश मिळेल. आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. लकी नंबर : 5 लकी कलर : White उपाय : देवी सरस्वतीची पूजा करा. कुंभ (Aquarius) : आज संयम बाळगणं गरजेचं आहे, तसंच लहान-सहान गोष्टींवर चिडचिड करणं टाळावं. ऑनलाईन बिझनेस करत असाल, तर वृद्धीसाठी नवीन प्लॅन आखणं गरजेचं आहे. एखादी रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्यासाठी आताच चांगली वेळ आहे. यामधून भरपूर फायदादेखील होईल. लकी नंबर : 8 लकी कलर : Pink उपाय : पांढऱ्या गोष्टी दान करा. मीन (Pisces) : कृपया पैशांसंबंधी करार विचारपूर्वक करा. अडकलेले पैसे मिळतील. तब्येतीबाबत निष्काळजी राहू नका. कोणत्याही व्यक्तीशी वाद टाळा. वैवाहिक जीवनात सौदार्हाचे संबध राहतील. लकी नंबर : 2 लकी कलर : Saffron उपाय : एखाद्या गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या