मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : कुणाला तोटा, कुणाला नफा? पाहा आजचं आर्थिक राशिभविष्य

Money Mantra : कुणाला तोटा, कुणाला नफा? पाहा आजचं आर्थिक राशिभविष्य

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 सप्टेंबर 2022) राशिभविष्य मेष (Aries) : आज तुम्ही जे कोणतं काम समर्पण वृत्तीने कराल, त्याची फळं तुम्हाला तातडीने मिळतील. विचारपूर्वक काम करा. आर्थिक तोट्याची शक्यता. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येतील. लकी नंबर : 9 लकी कलर : Saffron उपाय : भगवान कृष्णाला साखर अर्पण करा. वृषभ (Taurus) : आज तुमचं मन काहीसं विचलित राहील. ताण दूर करण्यासाठी तुम्ही छोट्या ट्रिपला जाऊ शकाल. त्यातून आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबासमवेत पूर्ण वेळ व्यतीत कराल. लकी नंबर : 3 लकी कलर : Light Yellow उपाय : मोहरीचं तेल लावलेली रोटी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. मिथुन (Gemini) : अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवणूक करू नका, अन्यथा तोट्याची शक्यता आहे. तुमच्याभोवतीच्या व्यक्तींसोबत वाद होऊ शकतो. घरात एखाद्या चांगल्या कामाबद्दल चर्चा होऊ शकेल. लकी नंबर : 9 लकी कलर : White उपाय : हनुमान चालिसा पठण करा. कर्क (Cancer) : आजचा दिवस खूप लाभदायक असेल. कामाच्या वर्तनाशी संबंधित सर्व वाद आज सोडवले जातील. नव्या प्रोजेक्टवर काही काम सुरू होईल. प्रॉपर्टीच्या संदर्भात कुटुंबीय आणि तुमच्याभोवतीच्या काही व्यक्ती अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. लकी नंबर : 0 लकी कलर : Black उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. सिंह (Leo) : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुम्हाला दिवसभरात नफा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. आज तुम्ही खूप क्रियाशील असाल. कुटुंबात शांतता आणि स्थिरतेचा आनंद घ्या. लकी नंबर : 5 लकी कलर : Light Blue उपाय : सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा 7 वेळा पठण करा. कन्या (Virgo) : आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. बिझनेसमध्ये कोणतीही मोठी रिस्क घेऊ नका. तोटा होण्याची शक्यता आहे. काही जणांना स्वतःसाठी काही पैशांची जमवाजमव करावी लागेल. कुटुंबात काळजीचं वातावरण असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Red उपाय : पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यांना मोकळं करा. तूळ (Libra) : पार्टनरशिपमधला बिझनेस आज बराच नफा देईल. आज तुम्हाला दैनंदिन घरकामांशी निगडित मुद्द्यांसाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या अपत्याच्या संदर्भात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. लकी नंबर : 9 लकी कलर : Firouzzi उपाय : भगवान श्री गणेशाला लाडू अर्पण करा. वृश्चिक (Scorpio) : आरोग्याची काळजी घ्या. हवामानातल्या बदलामुळे आरोग्याची समस्या उद्भवेल. आजचा दिवस बिझनेसच्या अनुषंगाने सुखद असेल. घाई-गडबड टाळा. कुटुंबीयांसमवेत मौजमजेचा कालावधी व्यतीत कराल. लकी नंबर : 4 लकी कलर : Purple धनू (Sagittarius) : आजचा दिवस फायद्याचा आहे. आज रिस्क घेऊन नफा मिळेल. संयमाच्या आणि तुमच्या मृदू वर्तनाच्या साह्याने समस्या सोडवता येतील. समस्याग्रस्त, तणावातल्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. लकी नंबर : 7 लकी कलर : Green उपाय : आईला काही तरी गोड खाऊ घाला. मकर (Capricorn) : महत्त्वाचे प्रलंबित निर्णय प्रलंबित ठेवू नका. हितचिंतकाच्या योग्य सल्ल्यांचा आदर कराल. आर्थिक मुद्द्यांमध्ये कृतिशीलता आणाल. सलोख्याने काम केल्यास अनपेक्षित नफा मिळू शकतो. तुमचं बजेट लक्षात घेऊन विचारपूर्वक, शहाणपणाने खर्च कराल. लकी नंबर : 7 लकी कलर : Grey उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा. कुंभ (Aquarius) : नशिबाची मजबूत साथ राहील. करिअर बिझनेसमध्ये प्रगती होईल. नफा आणि प्रभाव यांमध्ये वाढ होईल. संतुलन साधाल. नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन चांगलं राहील. सहकारी जोडीदार बनतील. जोखीम घेण्याची क्षमता वाढेल. मोठे प्रयत्न केले जातील. लकी नंबर : 5 लकी कलर : Light Red उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. मीन (Pisces) : कष्ट आणि समर्पण भावनेने काम यांमुळे कामाच्या ठिकाणी तुमचं स्थान निर्माण कराल आणि कायम राखाल. व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. अन्यथा आर्थिक तोट्याची शक्यता. बिझनेसमधला नफा चांगला राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. लकी नंबर : 3 लकी कलर : Blue उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या