मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : आर्थिक लाभाचा दिवस; पण 'या' राशींनी जपून करावा खर्च

Money Mantra : आर्थिक लाभाचा दिवस; पण 'या' राशींनी जपून करावा खर्च

17 सप्टेंबर 2022 रोजीचं अंकशास्त्र.

17 सप्टेंबर 2022 रोजीचं अंकशास्त्र.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (17 सप्टेंबर 2022) राशिभविष्य मेष (Aries) : पती-पत्नीमध्ये वाद वाढू शकतील. त्यामुळे घरातलं वातावरण तणावपूर्ण असेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. रखडलेल्या कामांबद्दल चिंता वाटेल; मात्र वेळ जसजसा पुढे जाईल, तसतशी कामं व्हायला सुरुवात होईल. लकी नंबर : 7 लकी कलर : Golden उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला. वृषभ (Taurus) : नशिबामुळे संधी मिळतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. तुमच्याशी संबंधित एखाद्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात. पैसे खर्च करण्यापूर्वी विचार करा. अन्यथा भविष्यात पश्चात्तापाची वेळ येऊ शकेल. लकी नंबर : 9 लकी कलर : Violet उपाय : पिवळ्या रंगाचा खाद्यपदार्थ दान करा. मिथुन (Gemini) : शारीरिक समस्यांमुळे कामावर परिणाम होईल. वडिलधाऱ्या मंडळींचे शब्द तुमच्या मनाला दुःख देतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभाची शक्यता. लकी नंबर : 7 लकी कलर : Sky Blue उपाय : श्रीकृष्ण मंदिरात बासरी अर्पण करा. कर्क (Cancer) : कामाच्या ठिकाणी खूप कष्ट करावे लागतील. त्याचे सुखद परिणाम भविष्यात दिसतील. आरोग्यात सुधारणेची शक्यता आहे. गंभीर आजारापासून सुटका होईल. तुमच्याशी संबंधित गोष्टीवरून वाद वाढू शकतात. लकी नंबर : 5 लकी कलर : Yellow उपाय : हनुमान चालिसा पठण करा. सिंह (Leo) : कामात यश मिळाल्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांशी भेट होणं शक्य आहे. वैवाहिक जीवनात ऊर्जा असेल. लकी नंबर : 4 लकी कलर : Badami उपाय : भगवान शिवशंकरांवर पंचामृताचा अभिषेक करा. कन्या (Virgo) : बिझनेस डील्समध्ये नफा होईल. अनपेक्षित पैसे मिळाल्याने आनंद होईल. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. एका वेळी दोन गोष्टी करू नका. कुटुंबात उत्सवी वातावरण असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Firouzzi उपाय : वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडा. तूळ (Libra) : प्रिय व्यक्तींचे शब्द मनाला वेदना करू शकतात. शारीरिक समस्या वाढू शकतात. रखडलेल्या कामांबद्दल चिंता वाटणं स्वाभाविक आहे; मात्र संयम राखावा. आर्थिक तोट्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. लकी नंबर : 8 लकी कलर : White उपाय : ॐ नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. वृश्चिक (Scorpio) : एकापाठोपाठ एक समस्या उद्धभवत राहतील. आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते. विचारपूर्वक खर्च करा. अनपेक्षित तोट्याची शक्यता आहे. कुटुंबाला सहकार्य, पाठिंबा मिळेल, ही चांगली गोष्ट आहे. लकी नंबर : 5 लकी कलर : Green उपाय : श्रीराम मंदिरात बसून रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. धनू (Sagittarius) : सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. बदलाबद्दल काळजी वाटेल. भावांमध्ये कोणत्या तरी मुद्द्यावरून ताण-तणाव वाढेल. बऱ्याच काळापासून अडकून पडलेले पैसे अगदी सहजपणे परत मिळवता येतील. लकी नंबर : 2 लकी कलर : Blue उपाय : हनुमानासाठी तुपाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसा पठण करा. मकर (Capricorn) : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस खास असेल. आज नफा होण्याची शक्यता आहे. आज एखादं स्पेशल डील फायनल होण्याची शक्यता आहे. चांगल्या आकारात राहा. प्रिय व्यक्तींशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. लकी नंबर : 6 लकी कलर : Green उपाय : भैरव मंदिरात मिठाई दान करा. कुंभ (Aquarius) : दीर्घ काळासाठी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्ती यशस्वी होतील. क्षमतेत वाढ होईल. आर्थिक लाभ मिळण्याची तीव्र शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. लकी नंबर : 2 लकी कलर : Sky Blue उपाय : श्री दुर्गा मंदिरात दुर्गा चालिसा पठण करा. मीन (Pisces) : आज तुमच्या मनात काही नवे प्लॅन्स येतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कामामध्ये एखाद्या वरिष्ठाची मदत घेण्याचा प्रयत्न करा. वडिलधाऱ्या मंडळींचा आदर करा. कौटुंबिक समस्या बोलून सोडवायला हव्यात. लकी नंबर : 7 लकी कलर : Light Pink उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा आणि गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya

पुढील बातम्या