मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : कुणाला नफा, कुणाला तोटा; आर्थिकदृष्ट्या तुमचा आजचा दिवस कसा असेल पाहा

Money Mantra : कुणाला नफा, कुणाला तोटा; आर्थिकदृष्ट्या तुमचा आजचा दिवस कसा असेल पाहा

आर्थिकदृष्ट्या 13 ऑगस्ट, 2022 रोजीचं तुमचं राशिभविष्य.

आर्थिकदृष्ट्या 13 ऑगस्ट, 2022 रोजीचं तुमचं राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (13 ऑगस्ट 2022) राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (13 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : महत्त्वाचे निर्णय प्रलंबित ठेवू नका. हितचिंतकांच्या योग्य सल्ल्यांचा आदर करा. आर्थिक बाबींमध्ये कृतिशीलता आणा. सलोख्याने काम केल्यास अनपेक्षित नफाही मिळवता येऊ शकतो. तुमच्या बजेटचा अंदाज घ्या आणि विचारपूर्वक खर्च करा. लकी नंबर : 7 लकी कलर : करडा उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा. वृषभ (Taurus) : नशिबाची मजबूत साथ असेल. करिअर आणि बिझनेसमध्ये प्रगती कराल. तुमचा नफा आणि प्रभाव वाढेल. सर्वांशी मिळून-मिसळून वागा. नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन कौशल्य वाढीला लागेल. सहकारी भागीदार बनतील. जोखीम पत्करणाची मानसिकता वाढेल. तुमच्या मोठ्या कष्टांना फळ मिळेल. लकी नंबर : 5 लकी कलर : सौम्य लाल उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. मिथुन (Gemini) : तुमचे कष्ट आणि समर्पण भावनेने काम करण्याच्या पद्धतीमुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं असं स्वतंत्र स्थान प्राप्त कराल. सावधगिरी बाळगली नाहीत, तर आर्थिक तोटा होऊ शकतो. बिझनेसमधला नफा चांगला राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. लकी नंबर : 3 लकी कलर : निळा उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा. कर्क (Cancer) : कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी तुमच्या प्रिय व्यक्तींशी चर्चा करा. खूप कमी काळात कोणावरही विश्वास ठेवू नका. अन्यथा तोटा होऊ शकेल. आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता असणं भविष्यासाठी चांगलं राहील. आरोग्याच्या बाबतीत हयगय/तडजोड करू नका. लकी नंबर : 1 लकी कलर : हिरवा उपाय : दुर्गामातेला लाल ओढणी (Lal Chunari) अर्पण करा. सिंह (Leo) : खूप प्रयत्न केल्यामुळे उद्योग-व्यवसाय मजबूत होतील. प्रिय व्यक्ती, तसंच कामात सुपेरियर असलेल्या व्यक्तींशी भेट होऊ शकते. कुटुंबीयांचा पाठिंबा घरापुरता राहील. जमीन-इमारतीच्या संदर्भात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. लकी नंबर : 9 लकी कलर : लाल उपाय : छोट्या मुलींना खीर खाऊ घाला. कन्या (Virgo) : परस्पर नातेसंबंध दृढ होतील. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण वाढीला लागतील. त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. दैनंदिन जीवनात शिस्त राखा. कुटुंबीयांना आधार/पाठिंबा मिळेल. पैसे मिळवण्यासाठी आवश्यक ते कष्ट करा. लकी नंबर : 0 लकी कलर : नारिंगी उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. तूळ (Libra) : निर्णय विचारपूर्वक, बारीकसारीक गोष्टींचा विचार करून घ्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा कर्ज घ्यावं लागेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुमच्याकडे खूप ऊर्जा आणि उत्साह असेल. मोठा विचार करा. लकी नंबर : 8 लकी कलर : सोनेरी उपाय : सकाळी लवकर उठा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. वृश्चिक (Scorpio) : भौतिक गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जाईल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, की जास्त हाव धरल्यास कर्जबाजारी होऊ शकाल. पूर्ण विश्वास ठेवून कोणतंही काम करा. कौटुंबिक प्रकरणात आदर-सन्मान पाळला जाईल. लकी नंबर : 2 लकी कलर : पर्पल उपाय : लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण करा. धनू (Sagittarius) : प्रत्येकाशी सलोख्याने वागल्यास, हा सलोखा वाढवल्यास करिअर आणि बिझनेसमध्ये उपयुक्त ठरेल. संवाद चांगला राहील. त्यामुळे पैसे मिळवण्याच्या नव्या संधी मिळू शकतील. भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं. भाऊ-बहिणींशी जवळीक वाढेल. लकी नंबर : 6 लकी कलर : पांढरा उपाय : काळ्या कुत्र्याला तेलात बनवलेली इमरती खाऊ घाला. मकर (Capricorn) : आज तुमचा आत्मविश्वास सर्वोच्च पातळीवर असेल. कुटुंबीयांचा पाठिंबा असेल. सर्व बाजूंनी चांगल्या बातम्या मिळतील. आयुष्यात भव्यता असेल. प्रॉपर्टीशी संबंधित कामांशी संपत्ती निगडित असेल. समानतेचा गुण अंगी बाणवा. लकी नंबर : 9 लकी कलर : काळा उपाय : दिव्यांग व्यक्तीला साह्य करा. कुंभ (Aquarius) : कोणत्याही गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची समज वाढेल. जीवनशैली सुधारेल. त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील. करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळतील. आर्थिक कृत्यांना प्रोत्साहन मिळेल. प्रिय व्यक्तींसोबत संस्मरणीय क्षण व्यतीत कराल. लकी नंबर : 8 लकी कलर : निळा उपाय : मुंग्यांना साखर आणि पिठाचं मिश्रण खाऊ घाला. मीन (Pisces) : अन्य कोणी लालूच दाखवल्यास त्यास बळी पडू नका. तोटा होऊ शकेल. धोरणात्मक नियम पाळा. नातेवाईकांचा आदर राखला जाईल. संस्कृतीला प्रोत्साहन द्याल. पारंपरिक कामात व्यग्र व्हाल. प्रिय व्यक्तींचा सल्ला घ्याल. लकी नंबर : 6 लकी कलर : गुलाबी उपाय : माशांना खाऊ घाला.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या