मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : आज 'या' राशीला गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी, तुमची रास आहे का?

Money Mantra : आज 'या' राशीला गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी, तुमची रास आहे का?

भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (8 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : बिझनेसशी संबंधित निर्णय घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे. बिझनेसमधली पार्टनरशिप तोट्याची ठरेल. दैनिक उत्पन्नासारख्या काही आर्थिक बाबींच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला असेल. वृषभ (Taurus) : आज तुम्हाला गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळतील. आज कौटुंबिक खर्चांना मर्यादा नसेल. तुम्ही बिझनेसमधली उद्दिष्टं गाठून चांगली प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. खास मित्राला कर्जाऊ दिलेले पैसे परत मिळतील. मिथुन (Gemini) : जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे कौटुंबिक खर्च वाढतील. शैक्षणिक कारणासाठी पैसे खर्च केले जातील. बिझनेसमधली आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरदार मंडळी पगारवाढीची अपेक्षा करू शकतात. कर्क (Cancer) : घरखर्च बऱ्यापैकी प्रमाणात नियंत्रित असतील. पैशांशी निगडित कोणताही चुकीचा निर्णय तोट्यात नेणारा ठरेल. घरखर्चांची नोंद ठेवणं अवघड होईल. सिंह (Leo) : तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्हाला पैसे कर्जाऊ घ्यावे लागण्याची शक्यता आहे. आज बिझनेसमधलं उत्पन्न बऱ्यापैकी सर्वसाधारण असेल. आज तुम्हाला आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. तुम्ही या संधींचा लाभ करून घेण्याबद्दल काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कन्या (Virgo) : पूर्वजांच्या प्रॉपर्टीमुळे आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. आज उत्पन्नात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. हे निर्णय दीर्घकालीन फायद्याचे ठरतील. तूळ (Libra) : आज तुमचे कौटुंबिक खर्च बऱ्यापैकी जास्त असतील. तुम्हाला कौटुंबिक सोहळ्यासाठी खर्च करावा लागेल. तुम्ही तुमच्या धाकट्या भावंडांना आर्थिक मदत कराल. तुमच्या जवळून जाणाऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही तुम्ही मदत करण्याची शक्यता आहे. वृश्चिक (Scorpio) : पूर्वीच्या तुलनेत आजचं उत्पन्न कौतुकास्पद असेल. बचतीसाठी नियोजन करण्याची गरज आहे. बिझनेसमधल्या कोणाला तरी तुम्हाला पैसे कर्जाऊ द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीचं संतुलन बिघडेल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृतीसाठी तुम्हाला काही खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. धनू (Sagittarius) : तुमच्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या बिझनेसेस खूप चांगली कामगिरी करतील. कर्जाऊ दिलेले पैसे परत मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे. आजोळकडची मंडळी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या संधी आणतील. कुंभ (Aquarius) : उत्पन्न आणि खर्च आज संतुलित असतील. एखाद्या अनपेक्षित स्रोतातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. खासगी उद्योगातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरखर्च कमीत कमी असतील. मीन (Pisces) : आज तुमचं उत्पन्न बेसिक असेल. तुम्ही जवळच्या मित्राला आर्थिक मदत करू शकाल. कौटुंबिक समस्यांतून मोठे खर्च होऊ शकतील. आज तुम्हाला एखाद्या बिझनेस ट्रिपवर जावं लागण्याची शक्यता आहे. ही ट्रिप तुमच्यासाठी खूप उत्पादक आणि नफा देणारी ठरेल.
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या