मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : या राशींचं दैनंदिन उत्पन्न वाढणार; ती तुमची रास तर नाही ना?

Money Mantra : या राशींचं दैनंदिन उत्पन्न वाढणार; ती तुमची रास तर नाही ना?

भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत. त्यांनी दिलेला सांगितलेलं हे आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य.

भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत. त्यांनी दिलेला सांगितलेलं हे आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य.

भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत. त्यांनी दिलेला सांगितलेलं हे आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य.

पुढे वाचा ...
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (7 ऑगस्ट 2022) राशिभविष्य मेष (Aries) : आज तुम्ही बिझनेसमध्ये उल्लेखनीय प्रगती कराल. तुम्हाला परदेशी स्रोतांतून उत्पन्न मिळवण्याच्या संधी मिळू शकतील. तुमचं दैनंदिन उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबांशी निगडित खर्च बऱ्यापैकी स्थिर असतील. वृषभ (Taurus) : आज बिझनेसमधला कामाचा ताण बऱ्यापैकी कमी असेल; मात्र तरीही तुम्ही दैनिक उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा करू शकाल. अविवाहित व्यक्ती आज त्यांच्या कुटुंबीयांवर खर्च करण्याची शक्यता आहे. पूर्वजांच्या संपत्तीत वाटण्या झाल्यामुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मिथुन (Gemini) : आज तुमच्या दिवसाची सुरुवात खर्चानेच होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं हा खर्च ठरू शकतो. पैसे उभे करण्यासाठी तुम्ही जुनी प्रॉपर्टी विकू शकाल. कुटुंबातल्या सदस्यांकडून तुम्ही आर्थिक नफ्याची अपेक्षा करू शकता. कर्क (Cancer) : ट्रान्स्पोर्ट बिझनेस किंवा जॉब आज नफा देणारा ठरेल. विनाकारण पैसे खर्च करणं तुम्हाला कर्जात नेऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कंपनीच्या नफ्यासाठी काम करतील. तुम्ही सोन्याची किंवा चांदीची ज्वेलरी खरेदी करण्याचं नियोजन करण्याची शक्यता आहे. सिंह (Leo) : बिझनेसमधले खर्च वाढतील. प्रकृतीच्या जुन्या त्रासासाठी आज तुम्हाला खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. परदेशातून तुम्ही काही पैसे कमावण्याची शक्यता आहे. विवाहितांचा आज मुलांवर खर्च होईल. रिअल इस्टेट आज नफा देणारी ठरेल. कन्या (Virgo) : आज तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. जीवनशैलीत केलेल्या बदलांमुळे खर्च वाढू शकतील. सरकारी योजनांमधून मिळालेल्या नफ्यात काही अडथळे येतील. आज तुमच्यासाठी परदेशी गुंतवणूक नफ्याची ठरेल. तूळ (Libra) : मजबूत आर्थिक परिस्थितीमुळे जीवनशैलीत सुधारणा होईल. आर्थिक गुंतवणुकीपासून दूर राहावं लागण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमधून नफ्याची अपेक्षा करू शकता. बिझनेसमध्ये भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता भासेल. वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमधली आर्थिक वृद्धी मंदावण्याची शक्यता आहे. कोलॅबोरेशन्समधून नफा मिळेल. दैनिक उत्पन्नाच्या बाबतीत आज तुम्ही नशिबवान ठराल. कौटुंबिक खर्च अत्यंत संतुलित असतील. सरकारी योजना किंवा प्रकरणामध्ये पैसे अडकू शकतील. धनू (Sagittarius) : आर्थिकदृष्ट्या बिझनेसेस उत्तम कामगिरी करतील. बिझनेस परदेशात वाढवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पार्टनरशिप्स आर्थिकदृष्ट्या निराशा करणाऱ्या ठरतील. कुटुंबावर होणाऱ्या खर्चाचं प्रमाण आज जास्त असेल. मकर (Capricorn) : वडिलांच्या प्रॉपर्टीमुळे तुम्हाला काही तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरदार मंडळींच्या दैनिक उत्पन्नात घसरण पाहायला मिळेल. कोर्टाशी निगडित प्रकरणांमध्ये बरेच पैसे खर्च करावे लागतील. ऑटोमोबाइल बिझनेसेसमध्ये तोटा होण्याची शक्यता आहे. कुंभ (Aquarius) : जुगार किंवा जुगारसदृश गोष्टींमुळे मोठ्या कर्जात जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिप बिझनेसेसमध्ये चांगलं उत्पन्न मिळेल. तुम्ही एखाद्या परदेशी व्यापाऱ्याच्या संपर्कात असलात, तर नशीब तुम्हाला चांगली साथ देण्याची शक्यता आहे. मीन (Pisces) : आजचं उत्पन्न खूप समाधानकारक असेल. खासगी उद्योगांमधून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. छोट्या पातळीवरचे उद्योग मोठा नफा कमावतील. धार्मिक सहली किंवा तीर्थयात्रांमुळे आज तुमचा मोठा खर्च होण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या